AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला सुखद धक्का, पुढच्या 24 तासांत होणार इराणसोबत युद्ध समाप्तीची घोषणा, अखेर डील फायनल?

अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारावर एक मत झाल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला सुखद धक्का, पुढच्या 24 तासांत होणार इराणसोबत युद्ध समाप्तीची घोषणा, अखेर डील फायनल?
अमेरिका इराण युद्ध थांबणार?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 13, 2026 | 6:16 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी देखील अजूनही संघर्ष सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी इराणकडून अमेरिकेच्या तब्बल 22 सैन्य तळांवर मिसाईल आणि ड्रोनने भीषण हल्ले करण्यात आले होते. ज्यामध्ये अमेरिकेच्या जॉर्डनमधील सैन्य तळाचा देखील समावेश होता. त्यानंतर अमेरिकेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं. दरम्यान जोपर्यंत इराण अणु करार करणार नाही, तोपर्यंत हे युद्ध पूर्णपणे थांबणं अशक्य असल्याचं आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आम्ही इराणला कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही अणुबॉम्ब बनवू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता मध्यपूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुढच्या 24 तासांमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये एक मोठी डील होणार असून, त्यानंतर युद्ध कायम स्वरुपी थांबण्याची शक्यता आहे. याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दावा केला आहे.

नेमकं काय म्हणाले शरीफ?

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराणमधील डील संदर्भात मोठा दावा केला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाच्या प्रस्तावावर एकमत झालं आहे. पुढील 24 तासांमध्ये अमेरिका आणि इराणकडून एका मोठ्या डीलवर हस्ताक्षर होणार आहेत. पाकिस्तानकडून या प्रस्तावावर डिजिटल स्वरुपात सही करण्याची तयारी सुरू आहे, त्यानंतर युद्ध समाप्तीची घोषणा होऊ शकते, असा दावा शरीफ यांनी केला आहे. दरम्यान यावेळी बोलताना हा करार पाकिस्तानच्याच मध्यस्थीने होत आहे, असा देखील दावा शरीफ यांनी केला आहे. परंतु अमेरिका आणि इराणने आतापर्यंत या करारासंदर्भात कुठेही पाकिस्तानचं नाव घेतलेलं नाहीये.

या संदर्भात शरीफ यांनी एक पोस्ट ट्विट केली आहे, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आता आम्ही युद्धविरामाच्या खूप जवळ पोहोचलो आहोत. पुढील 24 तासांमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये एक मोठी डील होणार आहे, दोन्ही देशांकडून शांततेच्या प्रस्तावावर आणि अटींवर एक मत झालं आहे. आम्ही त्यासाठी तयारी देखील सुरू केली आहे, असा दावा शरीफ यांनी केला आहे.

Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?