पुतिन अमेरिकेत जाणार? युक्रेन रशिया युद्धाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता, थेट डोनाल्ड ट्रम्प..

गेल्या अनेक वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. रशियाला अडचणीत आणण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न अमेरिकेकडून केली जात आहेत.

पुतिन अमेरिकेत जाणार? युक्रेन रशिया युद्धाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता, थेट डोनाल्ड ट्रम्प..
donald trump and vladimir putin
| Updated on: Dec 19, 2025 | 1:44 PM

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसत आहेत. दोन देशांमध्ये युद्ध सुरू असले तरीही संपूर्ण जग या युद्धामुळे दोन विभागात विभागले गेले आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे, जो सोडवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही संघर्ष करावा लागला आहे. युक्रेनला रशियाविरोधात युद्ध लढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत केली हे जाहीर आहे. अनेक शस्त्रे त्यांनी युक्रेनला पुरवली. मात्र, आता त्यांच्याकडून हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः रशियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आणि करार करण्यासाठी आपला सर्वात हुशाल सल्लागार रशियाला पाठवला आहे. अमेरिकेचे सध्याचे प्रयत्न बघता रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने जो युद्धबंदीचा पहिला करार रशिया आणि युक्रेनला दिला होता तो करार रशियाने मान्य असल्याचे म्हटले होते. मात्र, त्या प्रस्तावाला युक्रेनने विरोध दर्शवला. युक्रेन संकटावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी रशियन आणि अमेरिकन प्रतिनिधी पुन्हा एकदा भेटणार आहेत. व्हाइट हाऊसच्या माहितीनुसार, युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन प्रस्तावाबद्दल चर्चा करण्यासाठी अमेरिकन आणि रशियन अधिकारी या आठवड्याच्या अखेरीस भेटणार आहेत.

ही बैठक फ्लोरिडा राज्यातील मियामी शहरात होईल. अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर करतील. रशियन बाजूचे नेतृत्व किरील दिमित्रीव्ह करण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव सर्व पक्षांना स्वीकारार्ह बनवण्यासाठी आणि युद्ध संपवण्यासाठी आहे. आता दोन्ही देश याला कशाप्रकारे प्रतिसाद देतात, याकडे जगाच्य नजरा लागल्या आहेत.

ट्रम्प यांच्या प्रस्तावामध्ये युक्रेनला नाटोसारख्याच सुरक्षा हमी देऊ केल्या आहेत, परंतु रशियाने ताब्यात घेतलेल्या प्रदेशाबाबत अद्याप कोणताही करार झालेला नाही. मात्र, रशियाच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांसाठी युक्रेन आग्रही आहे. नाटो देशातून युक्रेनला काढावे, असेही रशियाचे म्हणणे आहे. ज्याला थेट विरोध युक्रेनचा आहे. मात्र, सध्याच्या घडामोडींनुसार हे युद्ध थांबवण्याचे संकेत आहेत.