AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! टॅरिफपेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा धक्का, उडाली झोप, थेट म्हणाले, पाकिस्तान…

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबातच भरोसा नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकार्यांकडून भारताबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहेत. शिवाय मोठा टॅरिफ देखील भारतावर लावण्यात आला.

जग हादरलं! टॅरिफपेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा धक्का, उडाली झोप, थेट म्हणाले, पाकिस्तान...
Donald Trump
| Updated on: Sep 30, 2025 | 8:38 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीकता वाढल्याचे सध्या बघायला मिळतंय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांची पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक देखील आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तानच्या बाजूने निर्णय घेताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत. अमेरिकेच्या भूमिवरून पाकिस्तानने भारताला परमाणू हल्ल्याची धमकी दिली. टॅरिफ आणि पाकिस्तानसोबत वाढलेली अमेरिकेची जवळीकता यामुळे भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे संबंध तणावात आहेत.

आता नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचे काैतुक करताना दिसले. हमास आणि इस्त्रायलच्या युद्धाबाबत बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, पाकिस्तानी नेते या प्रस्तावामध्ये  सुरुवातीपासून त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांनी त्याला 100 टक्के पाठिंबा दिला. ही पहिली वेळ नाही की, डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे काैतुक केले. कायमच ते दहशतवादी देश पाकिस्तानचे काैतुक करताना दिसतात.

ट्रम्प यांनी ब्रीफिंगमध्ये सांगितले, पाकिस्तानचे पंतप्रधान आणि असीम मुनीर हे या प्रस्तावात माझ्यासोबत होते. ते दोघेही अत्यंत खास आहेत, इस्त्रायलचे पंतप्रधान अमेरिकेत पोहोचले. त्यांनी अमेरिकेचा प्रस्ताव मंजूर केलाय. आता हमास काय निर्णय घेते, याकडे जगाच्या नजरा आहेत. इस्त्रायल आणि हमासचे गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू असून हे युद्ध टोकाला पोहोचले आहे. शेवटी डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धात मध्यस्थी करत आहेत. मात्र, युद्ध थांबल्याचे घोषणा अजूनही करण्यात आली नाहीये.

युद्ध संपण्याच्या अगोदरच डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानच्या नेत्यांचे काैतुक करताना दिसले. त्यांची स्पष्ट म्हटले की, पाकिस्तान या प्रस्तावात माझ्यासोबत 100 टक्के उभा होता. डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानला हाताशी धरून काहीतरी मोठे घडवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. चीन आणि भारतामधील जवळीकता टॅरिफच्या निर्णयानंतर वाढलीये.   ट्रम्प यांचे बोलणे ऐकून भारताला मोठा धक्का बसला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.