
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीकता वाढल्याचे सध्या बघायला मिळतंय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांची पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक देखील आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तानच्या बाजूने निर्णय घेताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत. अमेरिकेच्या भूमिवरून पाकिस्तानने भारताला परमाणू हल्ल्याची धमकी दिली. टॅरिफ आणि पाकिस्तानसोबत वाढलेली अमेरिकेची जवळीकता यामुळे भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे संबंध तणावात आहेत.
आता नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचे काैतुक करताना दिसले. हमास आणि इस्त्रायलच्या युद्धाबाबत बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, पाकिस्तानी नेते या प्रस्तावामध्ये सुरुवातीपासून त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांनी त्याला 100 टक्के पाठिंबा दिला. ही पहिली वेळ नाही की, डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे काैतुक केले. कायमच ते दहशतवादी देश पाकिस्तानचे काैतुक करताना दिसतात.
ट्रम्प यांनी ब्रीफिंगमध्ये सांगितले, पाकिस्तानचे पंतप्रधान आणि असीम मुनीर हे या प्रस्तावात माझ्यासोबत होते. ते दोघेही अत्यंत खास आहेत, इस्त्रायलचे पंतप्रधान अमेरिकेत पोहोचले. त्यांनी अमेरिकेचा प्रस्ताव मंजूर केलाय. आता हमास काय निर्णय घेते, याकडे जगाच्या नजरा आहेत. इस्त्रायल आणि हमासचे गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू असून हे युद्ध टोकाला पोहोचले आहे. शेवटी डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धात मध्यस्थी करत आहेत. मात्र, युद्ध थांबल्याचे घोषणा अजूनही करण्यात आली नाहीये.
युद्ध संपण्याच्या अगोदरच डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानच्या नेत्यांचे काैतुक करताना दिसले. त्यांची स्पष्ट म्हटले की, पाकिस्तान या प्रस्तावात माझ्यासोबत 100 टक्के उभा होता. डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानला हाताशी धरून काहीतरी मोठे घडवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. चीन आणि भारतामधील जवळीकता टॅरिफच्या निर्णयानंतर वाढलीये. ट्रम्प यांचे बोलणे ऐकून भारताला मोठा धक्का बसला आहे.