FlyDubai Flight प्रकरणासाठी कोण जबाबदार? डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट नाव घेतले अन्…

Donald Trump On Flydubai: फ्लायदुबई प्रकरणात विमान पाडण्यामागे कोण जबाबदार आहे हे आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवलं आहे.

FlyDubai Flight प्रकरणासाठी कोण जबाबदार? डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट नाव घेतले अन्...
| Updated on: Oct 06, 2026 | 9:53 AM

FlyDubai: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुबई ते तेल अवीव या फ्लायदुबई विमानात घडलेल्या घटनेसाठी इराणला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. माझा वैयक्तिक विश्वास आहे की या हल्ल्यामागे इरानचाच हात आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांनी या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा विश्वास आहे का, असे विचारले असता, ट्रम्प यांनी उत्तर दिले, “होय, माझा वैयक्तिक विश्वास आहे.” या घटनेसाठी ट्रम्प यांनी इराणला जबाबदार धरण्याची ही पहिली वेळ नाही.

३० सप्टेंबर रोजी दुबई ते तेल अवीव या फ्लायदुबई विमान FZ1073 चे हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला. हायजॅक करणारा फ्लायदुबईचा सह-वैमानिकच होता. ओमानच्या वैमानिकाने भारतीय वैमानिकावर अचानक हल्ला केला. गंभीर जखमी असूनही, कॅप्टन स्मित मच्छार यांनी धैर्य दाखवून कॉकपिटचा दरवाजा उघडला. इतर कर्मचाऱ्यांनी हल्ला करणाऱ्या ओमानी वैमानिक हमाम अल-हमामीला पकडले. विमानावर कंट्रोल मिळवत ते  सौदी अरेबियातील तबूक या जवळच्या विमानतळावर विमान उतरवले. विमानाने तबूक विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. यानंतर स्मिथ मच्छार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. विमानातील सर्व १७४ प्रवासी सुखरूप बाहेर पडले.

Loading...

वृत्तानुसार, अल-हमामीने चौकशीदरम्यान आपले दुष्ट हेतू उघड केले. त्याने सांगितले की, माझा हेतू विमान पाडण्याचा होता, बेन गुरियन विमानतळावर विमान उतरव असताना ते दुसऱ्या विमानावर कोसळवायचे होते. हा हल्ला घडवून आणण्यासाठी तो अनेक वर्षांपासून प्लॅनिंग करत आहे. तो विमान पाडण्याच्या उद्देशानेच वैमानिक झाला होता. त्याने हा कट रचण्यासाठी खूप वर्षांपासून प्लॅनिंग केले होते. तो जुलैमध्ये हा भयंकर मोठा हल्ला घडवून आणणार होता पण काही कारणास्तव त्याला तेव्हा हल्ला करता आला नाही. स्मिथ मच्छार यांच्या शौर्याने हा हल्ला झाला नाही आणि लोकांचे प्राण वाचले. सध्या या प्रकरणात तपास सुरु असून रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us