
इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धात अमेरिकेची पिछेहाट होत आहे. युद्ध सुरु झाल्यानंतर पाच-सहा दिवसात सगळं चित्र आपल्या बाजूने असेल असं डोनाल्ड ट्रम्प यांना वाटलं होतं. युद्धाची सुरुवात झाल्यानंतर इराणी जनता रस्त्यावर उतरेल. तिथे सत्ता बदल होईल. आपण इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाचा शेवट करु. हा अमेरिका-इस्रायलचा संपूर्ण अंदाज चुकला आहे. त्यामुळे हे युद्ध वाढतच चाललय. युद्ध सुरु होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. इस्रायल-अमेरिकेच्या फायटर जेट्सनी तेहरानसह इराणच्या अन्य शहरात मोठं नुकसान केलय. पण त्यामुळे इस्रायल-अमेरिकेचं रणनितीक उद्दिष्टय साध्य होऊ शकलेलं नाही. उलट आता युद्धात असा टप्पा आलाय, जिथे इराण भक्कम होत चालला असून अमेरिकेची पिछेहाट होतेय.
इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा मार्ग बंद केलाय. तिथून इराणच्या मर्जीशिवाय एकही जहाज पुढे जाऊ शकत नाहीय. हा प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प इतर देशांना तिथे आपलं नौदल पाठवण्याची विनंती करतायत. हाच युद्धात अमेरिकेची पिछेहाट सुरु असल्याचा पुरावा आहे. मायदेशासह अन्य युरोपियन देशांनी सुद्धा या युद्धाला विरोध केलाय. आंतरराष्ट्रीय मंचावर अमेरिका-इस्रायल एकटे पडले आहेत. सगळ्याच बाजूनी अपेक्षित गोष्टी घडत नसताना आता डोनाल्ड ट्रम्प यांना अजून एक धक्का बसलाय.
कोणाला झाला कॅन्सर?
व्हाइट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सूसी वाइल्स यांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. सूसी यांच्या कॅन्सरचा सुरुवातीचा टप्पा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च सोमवारी ही माहिती दिली. “सूसी वाइल्स यांना कॅन्सरचं निदान झालं असलं, तरी त्या पूर्णवेळ व्हाइट हाऊसमध्येच राहणार आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून माझ्यासाठी ही चांगली बाब आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
जे सांगणं गरजेच आहे ते सांगितलं जाईल
“सूसी वाइल्स चीफ ऑफ स्टाफ म्हणून उत्तम आहेत. व्यक्ती म्हणूनही तितक्याच चांगल्या आहेत आणि व्यक्ती म्हणून सुद्धा मजबूत आहेत. पण दुर्देवाने त्यांना सुरुवातीच्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. त्यांनी लगेचच हे आव्हान स्वीकारलय. आमच्याकडे उत्तम मेडिकल टीम आहे. उपचाराच्या काळात त्या पूर्ण वेळ व्हाइट हाऊसमध्येच असतील. राष्ट्राध्यक्ष म्हणून माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे” असं ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर म्हटलं आहे. ट्रीटमेंट सुरु असताना तुम्हाला जे सांगणं गरजेच आहे ते सांगितलं जाईल असं ट्रम्प म्हणाले.