भारत आणि रशियातील संबंध धोक्यात, अमेरिकेचे मोठी खेळी, अमेरिकेच्या परराष्ट्र..
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारत दाैऱ्यावर येणार आहेत. या भारत दाैऱ्यापूर्वी त्यांनी अत्यंत मोठे विधान केले. त्यांनी केलेल्या विधानाने भारतात चिंता वाढली आहे. ज्यामुळे भारत आणि रशियाच्या मैत्रीला कुठे ना कुठे तडा जाऊ शकतो.

इराण आणि अमेरिका युद्धात भारत एका वेगळ्या स्थितीमधून जात आहे. ऊर्जेचे मोठे संकट आहे. पुरवठा साखळी होर्मुज खाडी बंद असल्याने विस्कळीत झाली. कच्च्या तेलासोबतच एलपीजीचेही संकट आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दाैऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी द्विपक्षीय बैठकीत काही मोठे निर्णय घेतले. आता आपल्या आगामी भारत दाैऱ्यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी अत्यंत मोठे विधान भारताबद्दल केले. मार्को रुबियो यांनी म्हटले की, नवी दिल्लीला जितकी ऊर्जा खरेदी करायची तेवढी आम्ही त्यांना देऊ. थोडक्यात काय तर कच्चे तेल आणि एलपीजी गॅस अमेरिका भारताला विकण्यास तयार आहे. हेच नाही तर यादरम्यान त्यांनी भारताबद्दल बोलताना भारताला एक महान भागीदार देखील म्हटले. रशियाकडून भारताने कच्चे तेल विकत घेऊ नये, याकरिता भारतावर मोठा दबाव अमेरिकेचा होता. आता तो का होता, हे हळूहळू पुढे येताना दिसतंय.
पुढे मार्को रुबियो यांनी म्हटले की, आम्ही त्यांच्यासोबत खूप जास्त चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. त्यामुळे हा दाैरा नक्कीच चांगला होईल. मला खरोखरच आनंद आहे की, मी हा दाैरा करू शकतो. कारण मला वाटते की, या दाैऱ्यात बोलण्यासारखे बरेच काही आहे. आम्ही तिथे क्वाड देशांच्या नेत्यांनाही भेटणार आहोत, जे खूप महत्त्वाचे आहे. मला आनंद आहे की, आम्ही भारतात बैठकीसाठी बसत आहोत.
मार्को रुबियो यांनी भारत दाैऱ्यापूर्वी मोठे विधान केले. त्यांनी थेट भविष्यातील संकेत दिली आहेत. भारताला तेल विकण्यास अमेरिका तयार आहे. या बैठकीत मार्को रुबियो कच्च्या तेलावर चर्चा करतील. व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करण्याकरिता अमेरिका भारताला प्रस्ताव देणार आहे. आता भारतासमोर मोठे संकट आहे. कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. भारत रशियाचा जुना तेल खरेदीदार आहे.
शिवाय भारताला मोठा सूट तेलात रशिया देतो. भारताला जेवढे तेल हवे, तेवढे तेल रशियाकडून भारताला दिले जाते. होर्मुज खाडी बंद असतानाही रशिया भारताला मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा करत आहे. व्हेनेझुएलाचे तेल भारताला परवडणारे नाही. शिवाय व्हेनेझुएलाचे तेल तेवढे जास्त शुद्ध नाही, ज्यामुळे भारताला त्यावर अधिक प्रतिक्रिया करावी लागेल. त्याकरिता वेळ आणि खर्च दोन्ही अधिक लागणार. मात्र, अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेलाकरिता आग्रही आहे.
मार्को रुबियो यांसदर्भातच बैठक घेण्याकरिता भारतात येत आहेत. मार्को रुबियो हे 23 आणि 26 मे रोजी भारताच्या दाैऱ्यावर असणार आहेत. मार्को रुबियो यादरम्यान जयपुर, आग्रा, दिल्ली आणि कोलकाता येथेही दाैरा करतील. यादरम्यान त्यांची एस. जयशंकर यांच्यासोबत बैठक होईल. या बैठकीकडे जगाच्या नजरा आहेत.