Ayman al-Zawahiri : जवाहिरीला संपवण्यात महिलांचा सहभाग, कसं झालं मिशन फत्ते? वाचा सविस्तर…

दहशतवादी अल जवाहिरीला संपवण्यात महिलांचा सहभाग

Ayman al-Zawahiri : जवाहिरीला संपवण्यात महिलांचा सहभाग, कसं झालं मिशन फत्ते? वाचा सविस्तर...
| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 12:37 PM

वॉशिंग्टन: अमेरिकेने अफगाणिस्तानात (US strike Afghanistan) घुसून सर्वात मोठी कारवाई केली आहे. सीआयएच्या (CIA) ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरीला (Ayman al-Zawahiri) ठार मारण्यात आलं आहे. अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सनेही माहिती दिली आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेने ड्रोन स्ट्राईक करून मोठी कारवाई केल्याची घोषणा व्हाईट्स हाऊसने केल्याचं अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सने म्हटलं आहे. आहे. ओसामा बिन लादेन याला मारल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांना मोठा दणका देण्यात आला आहे. अल जवाहिरीवर अमेरिकेने 25 मिलियन डॉलरचं बक्षिस ठेवलं होतं. महिलांच्या मदतीने अमेरिकेने हे लक्ष साध्य केलंय.

  1. जवाहिरीला पकडण्यासाठी अमेरिकेने सहा महिन्यांपूर्वी कारवाई सुरू केली होती. दोन महिन्यांपूर्वी जवाहिरीला शोधण्याची मोहीम अधिक सक्रीय करण्यात आली. ऑपरेशन जवाहिरीसाठी ग्राऊंड झिरोवर काय परिस्थिती आहेयाची माहिती मिळवण्यासाठी महिलांचीही मदत घेण्यात आली.
  2. अमेरिकन एजन्सींजने महिलांना प्रशिक्षण दिलं. जेणेकरून ते माहिती गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यावर कोणालाही संशय येणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 30 जुलै रोजी आदेश दिला. बिडेनच्या आदेशानंतर अल-जवाहिरीला प्लॅनप्रमाणे मारण्यात आलं.
  3. जवाहिरीपर्यंत अमेरिकन सैन्य दलाचा प्रवेश सुलभ करण्यात महिलांनी मोठी भूमिका बजावली. व्हाईट हाऊसने त्याला मारण्याची सर्व योजना आखली होती. कोणत्या शस्त्राने त्याला मारायचं याचा प्लॅन ठरला होता. जवाहिरीविरुद्धच्या कारवाईपूर्वी व्हाईट हाऊसमध्ये पूर्ण प्लॅन तयार होता. त्यानुसार कारवाई झाली.
  4. जेव्हापासून अल-जवाहिरी अफगाणिस्तानमध्ये आला होता. तेव्हापासून त्याने तो राहत असलेल्या घरातून बाहेरच पडला नसल्याची माहिती आहे. या कारवाईत सहभागी असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
  5. स्वतः बायडेन यांनी पत्रकार परिषदेत जवाहिरीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. जवाहिरीचा शोध घेऊन त्याला मारण्यात आल्याचं जो बायडन यांनी सांगितलं आहे. जवाहिरीचा खात्मा अमेरिकेतील हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी ही समाधान देणारी बातमी आहे. आम्ही दहशतवाद निर्माण करणाऱ्या आणि निरापराध लोकांचे जीव घेणाऱ्यांच्या विरोधात अमेरिका अशीच कारवाई करत राहील, असं बायडन यांनी स्पष्ट केलंय.