
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स आणि त्यांच्या पत्नी उषा वेन्स या चर्चेत आहेत. जेडी वेन्स यांनी पत्नीला ख्रिश्नच बनवण्याची इच्छा व्यक्त केलेली. आपल्या या स्टेटमेंटवर नंतर जेडी वेन्स यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं. आता उषा वेन्स एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावरुन चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकेच्या सेकंड लेडी उषा वेन्स या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या. यावेळी उषा वेन्स यांच्या बोटात वेडिंग रिंग नव्हती. बुधवारी उषा वेन्स आणि मेलानिया ट्रम्प दोघींनी एकत्रित उत्तर कॅरोलिना येथील कॅम्प लेजून आणि नौदलाचा हवाई तळ न्यू रिवरचा दौरा केला.
विद्यार्थी, शिक्षक, सैन्य कुटुंब आणि दोन्ही सैन्य बेसवरील जवानांची भेट घेतली असं व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आलं. या कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. यात उषा वेन्स यांच्या बोटात अंगठी दिसत नाहीय. या फोटोंनी अनेक लोकांच लक्ष वेधून घेतलं. उषा वेन्स यांच्या बोटातून वेडिंग रिंग मिसिंग असल्याचं अनेकांनी नोटीस केलं. राजकीय रणनितीकार एडम पार्कोहोमेंका म्हणाले की, ‘इंटरेस्टिंग आहे, उषा वेन्स काल कॅम्प लेजून येथे लग्नाच्या अंगठीशिवाय दिसल्या’ दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, ‘हे आमच्या विचारापेक्षा जास्त जलदगतीने होतय’
जेडी वेन्स काय म्हणालेले?
उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी त्यांच्या पत्नीने ख्रिश्नच धर्म स्वीकारावा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर उषा आणि जेडी वेन्स यांच्या नात्यावर प्रश्न निर्माण झाले. उषा वेन्स हिंदू धर्माचं पालन करतात. उपराष्ट्रपती वेन्स आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, ‘माझ्या पत्नीने ख्रिश्चन धर्म स्वीकारावा असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नव्हता’ ऑक्टोंबर महिन्यात मिसिसिपी यूनिवर्सिटीमध्ये आयोजित टर्निंग पॉइंट कार्यक्रमात जेडी वेन्स यांनी त्यांच्या पत्नीबद्दल ही टिप्पणी केली होती.
विधवा एरिका यांच्या गळाभेटीचे फोटो व्हायरल
या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वेन्स आणि टीपीयूएसएचे मुख्य अधिकारी चार्ली कर्क यांची विधवा पत्नी एरिका यांच्या गळाभेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. उषा वेन्स ताज्या फोटोंमध्ये लग्नाच्या अंगठी शिवाय दिसत आहेत. त्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. वेन्स दाम्पत्यामध्ये काही अडचण असल्याचा कुठलाही रिपोर्ट अजून समोर आलेला नाही.