Donald Trump : जग का हादरवलं, का फोडला टॅरिफ बाँब ? ट्रम्पनी केला मोठा खुलासा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देश आणि चीनला लक्ष्य केले आहे. ज्यामुळे डॉलरवर हल्ला करणाऱ्या देशांवर शुल्क लादण्याची आणि चीनसोबतचा व्यापार कमी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Donald Trump : जग का हादरवलं, का फोडला टॅरिफ बाँब ? ट्रम्पनी केला मोठा खुलासा
Donald Trump Tariff Decision
| Updated on: Oct 15, 2025 | 11:07 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकामागोमाग धक्कादायक निर्णयांमुळे जग हादरलं आहे. आधी जबर टॅरिफ, नंतर H-1B व्हिसा शुल्कात वाढ, या निर्णयांमुळे मोठेए धक्के बसले, अर्थव्यवस्थाही हादरली. जागतिक बाजारपेठेवर आणि विविध देशांवर याचा मोठा परिणाम झाला. आता त्यातच ट्रम्प यांनी मोठा खुलासा केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी BRICS देशांवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे, अमेरिका आता या देशांवर आयात शुल्क (टॅरिफ) लादू शकते असा इशाराच त्यांनी दिला आहे.

ते म्हणाले की ब्रिक्सचा खरा उद्देश डॉलरची शक्ती कमकुवत करणे हा आहे. व्हाईट हाऊसमध्ये अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेलाई (Javier Milei) यांची भेट घेत, त्या बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी ठणकावून सांगितंल की अमेरिका कोणत्याही आंतरराष्ट्रीय आघाडीला डॉलरच्या शक्तीशी तडजोड करू देणार नाही.  “मी डॉलरच्या बाबतीत खूप कडक आहे. जो कोणी डॉलरमध्ये व्यवहार करेल त्याचा फायदा होईल. पण ज्यांनाज्यांना BRICS गटात रहायचं आहे ते खुशाल राहू शकतात,  काही हरकत नाही. पण आम्ही (अमेरिका) त्यांच्यावर कर लावू. कारण हा गट डॉलरच्या विरोधात आहे” असा थेट इशाराच ट्रम्प यांनी दिला.

चीनवरही साधला निशाणा

अमेरिकेऐवजी अर्जेंटिनाकडून सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ट्रम्प यांनी चीनला दोष दिला, ज्यामुळे वॉशिंग्टन आणि ब्यूनस आयर्समधील संबंध कमकुवत झाले.   “चीन नेहमीच दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा काही उपयोग होणार नाही.” असं ट्रम्प यांनी निक्षून सांगितलं.  चीनने जाणूनबुजून अमेरिकन सोयाबीन शेतकऱ्यांना हानी पोहोचवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे असा आरोप त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर केला आहे. . अमेरिका आता स्वयंपाकाचे तेल आणि इतर उत्पादनांसाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार करत आहे, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की, ट्रम्प यांनी अलीकडेच चीनवर अतिरिक्त 100 % कर लादला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत.

 

अमेरिका-चीन संबंधांमध्ये वाढता तणाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांचा हा दुसरा कार्यकळा असून याच काळात अमेरिका आणि चीनमधील संबंध पहिल्यापेक्षा जास्त ताणले गेले आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्ध, टेक्नॉलॉजी स्पर्धा आणि युक्रेन तसेच मिडल इस्टमधील युद्धांवरून झालेले मतभेद सतत वाढताना दिसत आहेत. चीनने अलिकडेच दुर्मिळ पृथ्वी खनिज तंत्रज्ञानाच्या (Rare Earth) निर्यातीवर निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे अमेरिका-चीन संबंध आणखी ताणले गेले आहेत.