USA Winter Storm Warning : 5 दिवसांचं राशन पाणी जमा करा, 24 तासात येणार डेंजर आफत, अखेर फर्मान सुटलंच

अमेरिकेला भीषण हिमवादळाचा धोका असून, मोंटाना-वायोमिंग सीमेवर 'विंटर स्टॉर्म वॉर्निंग' जारी केली आहे. येत्या 5 दिवसांत 8 ते 16 इंच हिमवृष्टी आणि ताशी 60 किमी वेगाने बर्फाळ वारे वाहणार आहेत, ज्यामुळे हाडे गोठवणारी थंडी पडेल. नागरिकांना रेशन-पाणी जमा करून घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

USA Winter Storm Warning : 5 दिवसांचं राशन पाणी जमा करा, 24 तासात येणार डेंजर आफत, अखेर फर्मान सुटलंच
USA Winter Storm Warning
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 5:46 PM

एकीकडे चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने झोडपून काढलेल्या अमेरिकेसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. आता येत्या काही तासात अमेरिकेत कडाक्याची थंडी पडणार आहे. ही थंडी एवढी डेंजर असणार आहे की घरातून बाहेर पडणं मुश्किल होणार आहे. हवामान खात्याकडून विंटर स्टॉर्म वॉर्निंग देण्यात आली आहे. येणारा काळ अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. शुक्रवारी पहाटेपासून ते शनिवारी दुपारपर्यंत 8 ते 16 इंचाची हिमवृष्टी होणार आहे. त्याप्रमाणे ताशी 60 किलोमीटर वेगाने बर्फाळ वारे वाहणार आहे, त्यामुळे हडांमध्ये सुई टोचल्यासारखं वाटणार आहे. तब्बल 5 दिवस हीच परिस्थिती राहणार आहे. घरातून बाहेरही पडता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी रेशनपाणी जमा करून ठेवावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे हिम वादळ अमेरिकेत मोंटाना आणि वायोमिंग बॉर्डर परिसर, खासकरून रेड लॉज आणि बियरटूथ हायवेशी संबंधित डोंगराळ भागात धडकणार आहे. या ठिकाणी माऊंटेन स्टँडर्ड टाइमनुसार इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या मते, ही काही सामान्य हिमवृष्टी नाही. तर एक संपूर्ण सिस्टिम आहे, तो वेगवेगळ्या टप्प्यात आपला परिणाम दाखवणार आहे. त्याची सुरुवात 27 नोव्हेंबरच्या संध्याकाळी हलकी आणि मध्यम हिमवृष्टीने होणार आहे. तर अधिकृत इशारा रात्री 12 वाजल्यापासून लागू केला जाणार आहे. शुक्रवारची रात्र आणि शनिवारची दुपार सर्वात भयानक असणार आहे. यावेळी ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत.

Loading...

जेव्हा लोक या बर्फाळ वाऱ्याचा सामना करत असतील तेव्हा शुक्रवारी दुपारपासून ते शनिवारी पहाटेपर्यंत सर्वाधिक बर्फ पडणार आहेत. हा इशारा शनिवारी दुपारी 12 वाजल्यापासून लागू राहणार आहे. येत्या काही दिवसांसाठी हवामान अधिक खराब राहणार आहे.

हाडं गोठवणारी थंडी

सामान्यपणे लोक हिमवृष्टीला घाबरतात. पण यावेळचा क्रम वेगळा असून चिंता वाढवणारा आहे. आधी प्रचंड हिमवृष्टी होण्यापूर्वी ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. ही हवा डोंगराळ भागातून गेल्यास तापमान अधिक कोसळणार आहे. त्यामुळे हाडे मोडणारी थंडी पडणार आहे. त्याशिवाय रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांसाठी स्थिती अत्यंत बेकार असणार आहे. प्रचंड वाऱ्यांमुळे वाहनांचं संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.

16 इंच बर्फ म्हणजे…

अमेरिकेतील या भागात 8 ते 16 इंचाची बर्फवृष्टी होणार आहे. त्याचा अर्थ संपूर्ण रस्त्यांवर बर्फाची चादर होणार आहे. बर्फाखाली रस्ते दबले जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे. रस्त्यावरून चालणंही मुश्किल होणार आहे. प्रचंड मोठी बर्फवृष्टी झाल्याने वाहने फसणार आहेत. घरातून बाहेर पडणं जीवघेणं ठरणार आहे. त्यामुळे पाच दिवस सर्वांनी घरीच थांबा. सोबत औषधं, रेशनपाणी, गरम कपडे आणि खाद्यपदार्थ ठेवा, असं सांगण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us