AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Syria Conflict : भाजीवाल्याच साधं भांडण ठरलं इस्रायल-सीरिया युद्धाचं कारण, 300 लोकांचा मृत्यू

Israel Syria Conflict : इस्रायलने सीरियाविरोधात युद्ध पुकारलं आहे. महत्त्वाच म्हणजे दोन देशांमध्ये युद्धाला कारण ठरलीय एक अत्यंत किरकोळ घटना. भाजीवाल्याच भांडण दोन देशांमधील युद्धापर्यंत जाऊन पोहोचलं. स्थानिक माीडियानुसार सुवैदा शहरात एक आठवड्यापूर्वी फदल्लाह दवारा हा फळविक्रेता गाडीने चालला होता.

Israel Syria Conflict :  भाजीवाल्याच साधं भांडण ठरलं इस्रायल-सीरिया युद्धाचं कारण, 300 लोकांचा मृत्यू
Israel Syria Conflict
| Updated on: Jul 17, 2025 | 11:50 AM
Share

इस्रायल आणि सीरियामध्ये युद्ध सुरु झालं आहे. पण तुम्हाला माहितीय का? या युद्धाला कारण ठरलय भाजीवाल्याकडे झालेली चोरीची घटना. या चोरीच्या घटनेमुळे सीरियाच्या दक्षिण भागात जवळपास 300 लोकांचा मृत्यू झाला. अनेकांचा अजूनही जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे. भाजीवाल्याकडे झालेली चोरी आणि मारहाण यामुळे दोन देशांमध्ये युद्ध भडकलं. लवकर शांतता स्थापित झाली नाही, तर हजारो लोक या युद्धात मरु शकतात, ब्रिटनच्या टेलिग्राफने हे वृत्त दिलय.

स्थानिक माीडियानुसार सुवैदा शहरात एक आठवड्यापूर्वी फदल्लाह दवारा हा फळविक्रेता गाडीने चालला होता. त्याला चोरांच्या एका समूहाने घेरलं. दवाराने तक्रार नोंदवली. चोरांनी त्याच्याकडून 400 पाऊंड (जवळपास 45 हजार रुपये) हिसकावून घेतल्याच त्याचं म्हणणं होतं. दवारानुसार, या दरम्यान त्याला मारहाण करण्यात आली. या घटनेची बातमी मीडियामध्ये येताच सीरियाच्या सुवैदामध्ये मोठा वाद निर्माण झाला. भाजीवाल्यासोबत जे झालं, त्यामुळे आधी दोन समुदायात नंतर दोन देशांमध्ये युद्ध झालं.

पण इस्रायलने याला दुसऱ्या दुष्टीकोनातून घेतलं

टेलीग्राफ ब्रिटेनने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटलं की, या घटनेनंतर डूज आणि बडौइन समुदाय आमने-सामने आले. दोघांनी परस्परांच्या लोकांना मारायला सुरुवात केली. सुवैदा शहर इस्रायलच्या जवळ आहे. इथे हिंसा भडकल्यानंतर सीरियन सरकारने सैन्य उतरवलं. सैन्याला उतरवल्याशिवया स्थिती नियंत्रणात येणार नाही असं सीरियन सरकारच म्हणणं होतं. पण इस्रायलने याला दुसऱ्या दुष्टीकोनातून घेतलं.

सीरियाची राजधानी दमिश्कवर हल्ला

इस्रायलने सुवैदामध्ये सीरियन सैन्यावर हल्ला केला. त्यांचं म्हणणं होतं की, सीरियान सैनिक बॉर्डरवर येण्यासाठी सुवैदा येथे एकत्र येत आहेत. या दरम्यान सीरियाने ड्रूज यांचं संरक्षण करण्याची शपथ घेतली. ड्रूज सीरियामध्ये सुरक्षित राहतील असं इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. ड्रूजना कोणी काही करणार नाही. सीरियन सैन्य आणि इस्रायलमध्ये युद्ध वाढल्यानंतर IDF ने सीरियाची राजधानी दमिश्कवर हल्ला केला.

हा समुदाय कुठला धर्म मानतो?

ड्रूज सीरियामधील अल्पसंख्याक समुदाय आहे. त्यांची लोकसंख्या 7 लाख आहे. ड्रूज समुदायाचे लोक इस्रायलमध्ये सुद्धा राहतात. हा समुदाय इस्लाम आणि ख्रिश्चन दोन्ही धर्म मानत नाही. ड्रूज यांचं मूळ शियाशी संबंधित आहे. ड्रूज दक्षिण सीरियामध्ये राहतात. हा भाग इस्रायलच्या जवळ आहे. इस्रायलला ड्रूज नागरिकांच सुरक्षाकवच बनून आपली बॉर्डर सुरक्षित ठेवायची आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.