होर्मुज खाडीत हाहाकार! इराणला सर्वात मोठा धक्का, ज्याची भीती तेच घडले, थेट 23 क्विंटिलियन..

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने जगात संकट आहे. या युद्धात अमेरिका एकटी पडली असून मदत मागूनही एकही देश त्यांच्या मदतीकरिता पुढे आला नाही. यादरम्यानच होर्मुज खाडीत मोठी खळबळ उडालीये.

होर्मुज खाडीत हाहाकार! इराणला सर्वात मोठा धक्का, ज्याची भीती तेच घडले, थेट 23 क्विंटिलियन..
Hormuz Gulf
| Updated on: Mar 18, 2026 | 7:51 AM

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर मोठा हल्ला करण्यात आला. इराणवर हल्ला करून मोठी चूक अमेरिका आणि इस्त्रायलने केली आणि युद्धाला सुरूवात झाली. इराणने थेट इस्त्रायलवर त्यानंतर असंख्य क्षेपणास्त्र टाकली. फक्त हेच नाही तर आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांना टार्गेट करत मोठे हल्ले केले. थेट आखाती देशांच्या महत्वाच्या ठिकाणांवरही हल्ले करण्यात आली. या युद्धात आखाती देश संकट आहेत. मोठे हल्ले केले जात आहेत. ज्यावेळी इस्त्रायल, अमेरिका आणि इराण युद्ध सुरू होईल, त्यावेळी अमेरिका आमचे संरक्षण करेल, असे आखाती देशांना वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात अमेरिकेने काहीच केले नाही.  उलट या युद्धात इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ही खाडी बंद असल्याने याचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. अमेरिकेच्या मालवाहू जहाजासोबतच अनेक देशांचे जहाज इराणकडून पेटवली जात आहेत. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अमेरिकेकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत.

अमेरिकेने होर्मुज खाडीत आपल्या युद्धनाैका पाठवण्याची मागणी अनेक देशांकडे केली. मात्र, अमेरिकेच्या मदतीला एकही देश पुढे आला नाही. होर्मुज खाडीमुळे अमेरिकेवर दबाव आहे, शिवाय मागे आड तर पुढे विहिर अशी स्थिती आज अमेरिकेची आहे. मदत मागूनही एकही देश मदतीला येत नसल्याने अखेर अमेरिकेने होर्मुज खाडीत एकटेच लढण्याचा मोठा निर्णय घेतला. मोठी कारवाई अमेरिकेने होर्मुजमध्ये केली आहे.

अमेरिका आता होर्मुजची सामुद्रधुनी इराणच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेने होर्मुजजवळ 23 क्विंटल धोकादायक बॉम्ब टाकले आहेत. मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. अमेरिकेकडून इराणचे क्षेपणास्त्र तळ नष्ट करण्याकरिता हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने ही माहिती X वर शेअर केली.

अमेरिकेच्या लष्कराने 5000 वजनाचे मोठे अनेक बॉम्ब इराणी क्षेपणास्त्र असलेल्या ठिकाणांवर टाकले. अमेरिकेने इराणच्या क्षेपणास्त्रांच्या साठ्यावर अंदाजे 23 क्विंटल बॉम्बने हल्ला केला. हे बॉम्ब इराणच्या किनारपट्टीवर असलेल्या तटबंदीयुक्त क्षेपणास्त्र साठवणूक आणि प्रक्षेपण स्थळांवर टाकण्यात आले. कोणताही देश मदतीला येत नसताना अखेर अमेरिका एकटीच मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us