Putin India Visit : पुतिन यांची लेडी ब्रिगेड करते हे खास काम; त्यात प्रेयसीचाही समावेश, ही बाजू कोणालाच नसेल माहीत

Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी ज्ञात, अज्ञात आहेत. पण त्यांच्याबद्दल अजूनही अशा काही गोष्टी आहेत, ज्याबद्दल जगात फार वाच्यता होत नाही. पुतिन यांची ही दुसरी बाजू काय? त्यांची खास लेडी ब्रिगेड काय काम करते? जाणून घ्या.

Putin India Visit : पुतिन यांची लेडी ब्रिगेड करते हे खास काम; त्यात प्रेयसीचाही समावेश, ही बाजू कोणालाच नसेल माहीत
Putin Lady Team
Updated on: Dec 04, 2025 | 1:18 PM

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आज भारत दौऱ्यावर येत आहेत. 4 ते 5 डिसेंबर असा त्यांचा दोन दिवसीय दौरा आहे. पुतिन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील. आता आपण पुतिन यांच्या अशा टीमबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. ही पुतिन यांची लेडी ब्रिगेड आहे. ही लेडी ब्रिगेड फक्त रशियाशी संबंधित निर्णय घेत नाही, तर जगाचं पॉलिटिक्सही निश्चित करते. पुतिन यांच्या या टीममध्ये 10 शक्तीशाली महिला आहेत. या महिला कोण आहेत? आणि पुतिन शासनात त्यांचा रोल काय? जाणून घेऊया.

रशियाशी संबंधित विषय किंवा जागतिक राजकारण, या बाबत निर्णय फक्त एकटे पुतिन करत नाहीत, तर आपल्या लेडी ब्रिगेडची मदत घेतात. पुतिन यांची लेडी ब्रिगेड खूप महत्वाचा रोल निभावते. या टीममध्ये कोण-कोण आहेत?

वालेनतीना मतवियेन्को

वालेनतीना मतवियेन्को हे पहिलं नाव आहे. रशियन संसदेच्या उच्च सभागृहाच्या त्या चेअरमन आहेत. रशियाच्या राजकारणात मतवियेन्को यांचं स्थान मोठं आहे. पुतिन यांच्या त्या विश्वासू आहेत. रशियात त्यांना पुतिन यांचं उत्तराधिकारी मानलं जातं.

मारिया जखारोवा

मारिया जखारोवा या चेहऱ्याला तुम्ही ओळखत असाल. या रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता आहेत. मारिया जागतिक विषयांवर रशियन परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका मांडत असतात. जखारोवा सुद्धा पुतिन यांच्या विश्वासू आहेत.

एन्ना सिविलयोवा

पुतिन यांच्या तिसरी लेडी लीडर आहे,एन्ना सिविलयोवा. एन्ना पुतिन यांची नातेवाईक लागते. त्यांनी रशियाचं उप संरक्षण मंत्री पदही भूषवलं आहे.

एलीना काबाएवा

एलीना काबाएवा या पुतिन यांच्या एकदम खास आहेत. जिमनॅस्टिक मध्ये त्या ऑल्मिपिक चॅम्पियन होत्या. एलीना यांना पुतिन यांची प्रेयसी म्हटलं जातं. एलीन यांना पुतिन यांच्यापासून दोन मुलं आहेत, असं सुद्धा म्हटलं जातं. एलीना सध्या रशियाच्या नॅशनल मिडिया ग्रुपच्या चेअरमन आहेत.

कॅटरीना तिखोनोवा

कॅटरीना तिखोनोवा आणि मारिया वोरोंतसोवा. या दोघी पुतिन यांच्या मुली असल्याचं बोललं जातं. या दोघी बऱ्याच दिवसानंतर अलीकडेच इकोनॉमिक फोरमवर दिसल्या होत्या. कॅटरीना एका कंपनीची मालकिण आहे. मारिया रशियाच्या प्रसिद्ध वैज्ञानिक आहेत.

अजून चार शक्तीशाली स्त्रिया कोण?

पुतिन यांच्या टीममध्ये आणखी चार शक्तीशाली महिला आहेत. यात रशियाच्या केंद्रीय बँकेच्या गर्व्हनर एलबिरा नबीउल्लिना आहेत. एलबिरा या रशियाच्या अर्थमंत्री होत्या. त्या पुतिन यांच्या आर्थिक सल्लागार सुद्धा होत्या. उप पंतप्रधान तत्याना गोलिकोवा,उप पंतप्रधान ओल्गा गोलोदेत्स आणि पुतिन यांच्या पक्षाच्या खासदार वेलेनतीना तेरेस्कोवा सुद्धा या टीमचा भाग आहेत.

पुतिन यांची ही अशी लेडी टीम आहे, ज्यांच्याकडून पुतिन महत्वाच्या विषयावर सल्ले घेतात. या टीमच्या मदतीने पुतिन मोठे आणि कठोर निर्णय घेतात.