AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vladimir Putin : पुतिन समजणं खूपच अवघड, रशियाने पाण्याच्या आत जे केलं, त्यामुळे ब्रिटनचे धाबे दणाणले

Vladimir Putin : रशियाशी पंगा घेणं ब्रिटनला चांगलच महाग पडलं आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ब्रिटनने जाहीरपणे व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. ब्रिटनची भूमिका आणि त्यांनी जी पावलं उचलली, त्यानंतर रशियाने पाण्याच्या आत जे केलं, त्यामुळे ब्रिटन हादरलं आहे.

Vladimir Putin : पुतिन समजणं खूपच अवघड, रशियाने पाण्याच्या आत जे केलं, त्यामुळे ब्रिटनचे धाबे दणाणले
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 08, 2025 | 10:23 AM
Share

हेरगिरीच्या विश्वात रशिया आणि त्यांचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची एक वेगळी ओळख आहे. रशियाचे राष्ट्रप्रमुख बनण्याआधी पुतिन हे केजीबी या रशियन गुप्तहेर संघटनेत अधिकारी होते. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. युक्रेन विरुद्ध सुरु असलेल्या या युद्धादरम्यान रशियाची हेरगिरीची एक पद्धत समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण युरोप हादरलं आहे. ब्रिटनला पाण्यात एक हेरगिरी करणारा कॅमेरा मिळाला आहे. हा रशियन कॅमेरा असल्याच सांगितलं जातय. रशियाने अजूनपर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ब्रिटिश वर्तमानपत्र टेलिग्राफनुसार, ब्रिटनच्या परमाणू संयत्राजवळ हा कॅमेरा मिळाला आहे. हा कॅमेरा पाण्याच्या वर आणि खाली लावलेला होता. पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये हेरगिरीची ही पद्धत दिसून आलीय. ब्रिटनची आर्मी 2 प्वॉइंट या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. सर्वप्रथम हा कॅमेरा बसवला कसा? आणि दुसरी गोष्ट हा कॅमेरा लावला कोणी? याचा तपास सुरु आहे. अण्विक पाणबुडीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हा कॅमेरा लावल्याच ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ब्रिटनची अण्विक पाणबुडी कशी हालचाल करते, ते रशियन अधिकाऱ्यांना जाणून घ्यायच होतं.

ही पाणबुडी केबल तारा कापण्याच काम करते

युद्धात अण्विक पाणबुडी महत्त्वाची मानली जाते. ब्रिटनची वॅनगार्ड अण्विक पाणबुडी सर्वात खतरनाक मानली जाते. याच पाणबुडीच्या रेकीसाठी पाण्याच्या वर कॅमेरे लावण्यात आले आहेत. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ब्रिटनने जाहीरपणे व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. अमेरिकेने युक्रेनला मदतीसाठी नकार दिला, त्यावेळी ब्रिटन आणि फ्रान्सने युरोपियन युनियनची बैठक बोलावली.

त्यानंतर रशियाने मोर्चा उघडला

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये ही बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वांनी मिळून पुतिन यांच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर अंटलांटिक आणि बाल्टिक एरियामध्ये रशियाने मोर्चा उघडला आहे. नॉर्वेजवळ रशियाची एक पाणबुडी दिसलेली. रशियाची ही पाणबुडी केबल तारा कापण्याच काम करते. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना भिती आहे की, याच पाणबुडीद्वारे पाण्यात हेरगिरी करणारे कॅमेरे लावण्यात आले आहेत.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.