Russia Ukraine War : रशियाला जे हवं तेच घडणार… व्लादिमीर पुतिन यांची युद्धात थेट… युक्रेन शरण येण्याची शक्यता!

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चांगलेच पेटले आहे. असे असतानाच आता रशियातून मोठी माहिती समोर येत आहे. युक्रेन थेट शरणागती पत्करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Russia Ukraine War : रशियाला जे हवं तेच घडणार... व्लादिमीर पुतिन यांची युद्धात थेट... युक्रेन शरण येण्याची शक्यता!
vladimir putin and ukraine russia war
| Updated on: Sep 18, 2025 | 3:47 PM

Vladimir Putin : रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष (Russia Ukraine War) एका वेगळ्या टोकाला जाऊन पोहोचला आहे. काहीही झालं तरी माघार घ्याची नाही, असा चंग रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बांधला आहे. रशियाच्या या आक्रमक धोरणापुढे युक्रेनची हतबलता दिसून येत आहे. संसाधनं, शस्त्र कमी असली तरी युक्रेन हा देशदेखील रशियाविरोधात जमेल त्या पद्धतीने युद्धभूमीत पाय रोवून आहे. असे असतानाच आता रशियन सैन्याच्या आक्रमक धोरणाचे नेमके कारण समोर आले आहे. खुद्द व्लादिमीर पुतीन हेच लष्कराच्या गणवेशात सैन्याला सूचना देत असतानाचे फोटो समोर आले आहेत.

पुतिन यांच्या अटींवर युद्ध थांबणार

रशियन सैन्य युक्रेनवर जोरदार हल्ले करत आहे. याच कारणामुळे आता युक्रेन समर्पण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युक्रेनचे प्रमुख वोलोडिमीर झेलेन्स्की यांनीच तसे संकेत दिल्याचे म्हटले जात आहे. म्हणजेच आता झेलेन्स्की पुतिन यांच्या अटींवर रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार होऊ शकतात असे सांगितले जात आहे. रशियन सैन्याच्या आक्रमक धोरणामुळे हे घडून येत असल्याचे बोलले जात आहे.

सैनिकांमध्ये पोहोचले व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन यांचा एक फोटो फार चर्चेचा विषय ठरतो आहे. रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध चालू असताना आता पुतिन थेट वॉर रुममध्ये पोहोचले आहेत. लष्कराच्या गणवेशात ते सैन्याच्या अधिकाऱ्यांना काही आदेश देत असल्याचे दिसत आहे. पुतिन यांच्या आदेशानंतरच रशियन सैन्य युक्रेनच्या मध्ये संहार घडवून आणत आहेत. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून तर रशियन लष्कर युक्रेनविरोधात जास्तच आक्रमक झाले आहे. आता युक्रेन सैन्य पराभव मान्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सैनिकांच्या युद्धाभ्यासाचे केले निरीक्षण

पुतिन यांनी नुकतेच लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच सैन्याच्या अभ्यासस्थला लष्करी गणवेशात भेट दिली. रशियन सैन्याचे मनोबल वाढावे म्हणून पुतिन यांनी ही कृती केल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी आपल्या प्रशिक्षण मैदानाच्या दौऱ्यादरम्यान आमंत्रित केलेल्या परदेशी प्रतिनिधींशीही चर्चा केली. यावेळी त्यांनी युद्धाभ्यासादरम्यान वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचा, सैन्याच्या उपकरणांचेही निरीक्षण केले आहे.

युक्रेनवर डागले ड्रोन, क्षेपणास्त्र

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर 18 ऑगस्टच्या रात्री 500 पेक्षा जास्त ड्रोन, 300 पेक्षा अधिक ग्लाईड बॉम्ब, 30 मिसाईल्स डागल्या आहेत. त्यामुळे रशियाचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता युक्रेन शस्त्र टाकून देऊन शरणागती पत्करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.