जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनी, समेधा सक्सेनासारखी मुलगी हवी; तिच्यात विशेष काय?

चांगले विद्यार्थी निवडण्यासाठी ग्रेड लेवल टेस्टचा वापर केला जातो. या टेस्टच्या आधारे जगातील हुशार विद्यार्थी शोधले जातात. ७६ देशांतील १५ हजार ३०० विद्यार्थ्यांनी २०२१-२२ च्या टॅलेंट सर्चमध्ये भाग घेतला होता.

जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनी, समेधा सक्सेनासारखी मुलगी हवी; तिच्यात विशेष काय?
समेधा सक्सेना
| Updated on: Feb 14, 2023 | 8:54 AM

न्यूयार्क : भारतवंशी समेधा सक्सेनाला मोठा सन्मान होत आहे. जगात सर्वाधिक हुशार विद्यार्थिनी असल्याचा किताब तिला मिळाला. समेधाचे वय ९ वर्षे आहे. एका टेस्टच्या आधारे तिला हा किताब देण्यात आाला. या टेस्टमध्ये ७६ देशातील १५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. समेधाला जगातील सर्वाधिक हुशार विद्यार्थिनीचा किताब बहाल करण्यात आला. जॉन हापकिन्स सेंटर फार टॅलेंटेड युथने हा किताब तिला बहाल केला. ९ वर्षांची समेधा न्यूयार्क सिटीत राहते. बॅटरी पार्क सिटी स्कूलमध्ये ती चौथ्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. जॉन हॉपकिन्सने एका टेस्टच्या आधारावर ही निवड केली आहे.

७६ देशांतील विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग

समेधाला वर्ल्ड ब्रायटेस्ट स्टूडन्ट्स असं संबोधलं आहे. या टेस्टमध्ये ७६ देशांतील १५ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. समेधाने या टेस्टमध्ये आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने सांगितलं की, समेधाचा परफार्मन्स खूप चांगला होता. ती सिटी ग्लोबल टॅलेंट सर्ज प्रोग्राम क्वालिफाय करणारी सर्वात हुशार विद्यार्थिनी ठरली.

९ वर्षांच्या समेधाने मारली बाजी

समेधा सक्सेनाचे वय ९ वर्षे आहे. एसएटी, एसीटी, स्कूल, कॉलेज एलिजीबीलीटी टेस्टच्या आधारी तिची निवड केली गेली. विविध विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. समेधाला सिटीच्या कार्यकारी संचालक डॉ. ऐमी शेल्टन यांनी शुभेच्छा दिल्या. एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी हे विद्यार्थी मेहनत घेतात. येवढ्या कमी वयात ज्ञान प्राप्त करणे स्तुतीपात्र आहे, असं त्या म्हणाल्या.

अशी घेतली जाते टेस्ट

चांगले विद्यार्थी निवडण्यासाठी ग्रेड लेवल टेस्टचा वापर केला जातो. या टेस्टच्या आधारे जगातील हुशार विद्यार्थी शोधले जातात. ७६ देशांतील १५ हजार ३०० विद्यार्थ्यांनी २०२१-२२ च्या टॅलेंट सर्चमध्ये भाग घेतला होता. समेधा ही त्यांच्यापैकी एक होती. खूप कमी विद्यार्थी ही टेस्ट क्वालिफाय करू शकले.

दिल्लीतील आर्यवीर टॉपच्या यादीत

समेधा सक्सेनाशिवाय १३ वर्षीय भारतीय अमेरिकी नताशा पेरियानयगमने वर्ल्ड ब्राईटेस्ट स्टूडंट्सच्या लिस्टमध्ये टॉप केलंय. दिल्लीत राहणाऱ्या ९ वर्षीय आर्यवीर कोचरनेही या टॉपच्या यादीत जागा मिळविली.