
अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून मोठा हल्ला इराणवर केला. मात्र, 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर अमेरिका हल्ला करणार याची कल्पना खाडी देशांनाही नव्हती. या युद्धाचा मोठा परिणाम खाडी देशांना भोगावा लागत आहे. थेट इराण त्यांच्या देशात असलेल्या अमेरिकन तळांवर हल्ला करत आहे. तेल वाहतूक आणि गॅस वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. इराणकडून महत्वाचा सागरी मार्गही बंद करण्यात आला. भारतासह जगातील जवळपास देश संकटात आहेत. गॅसचा पुरवठाही बंद झाला. या युद्धाच्या सर्वाधिक झळा जर कोणत्या देशांना बसल्या असतील तर साैदी अरेबिया, दुबई, कतार आणि कुवेत यांना. अमेरिका आणि इस्त्रायलने जसा ही हल्ला इराणवर केला, तसा हल्ला थेट इराणकडून या देशांमध्ये करण्यात आला आणि थेट अमेरिकेचे लष्कर तळ उद्ववस्थ करण्यात आली. हेच नाही तर दुबईचे विमानतळही इराणच्या निशाण्यावर होते. तिथेही मोठा हल्ला करण्यात आला.
दुबई आणि साैदी अरेबियाला या युद्धाची झळ बसली आहे. अनेक ठिकाणी इराणकडून हल्ले करण्यात आले, अजूनही हल्ले सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर परिस्थिती झपाट्याने खराब झाली. इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानताना दिसत नाही. सध्याच्या घडीला अमेरिकाही तणावात आहे.
आता दुसरीकडे इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम खाडी देशावर बघायला मिळत आहे. दुबईसह खाडी देशातील फळे आणि भाज्या जवळपास संपत आलेले आहेत. हर्मुजची सामुद्रधुनी व्यापारी वाहतुकीसाठी बंद आहे. जेबेल अली बंदरावर झालेल्या हल्ल्यामुळे भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि ताजी फळे यांची आवक थांबली आहे.
फळे आणि भाज्यांची टंचाई सध्याच्या घडीला दुबईमध्ये जाणवत आहे. खाडीतील जवळपास देशांना अन्न पुरवठा हर्मुजच्या मार्गाने होतो तो मार्ग इराणने बंदल केला. दुबईतील अनेक सुपरमार्केट आणि मॉलमध्येही भाज्या आणि दूध, फळे नाहीत. दुबईसह खाडी देशातील परिस्थिती अशी गंभीर होत आहे. दुबईमध्ये फक्त 10 दिवसांचाच अन्न साठा असल्याचेही सांगितले जात आहे.