जगात पुन्हा उडणार युद्धाचा भडका? छोटा देश देणार महाशक्तिला आव्हान, तयारीही पूर्ण

इराण आणि इस्रायलमध्ये फक्त बारा दिवस युद्ध सुरू होतं, मात्र या युद्धामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं, त्यानंतर आता आणखी दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत.

जगात पुन्हा उडणार युद्धाचा भडका? छोटा देश देणार महाशक्तिला आव्हान, तयारीही पूर्ण
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2025 | 4:25 PM

इराण आणि इस्रायलमध्ये फक्त बारा दिवस युद्ध सुरू होतं, मात्र त्याचा परिणाम हजारो किलोमीटर दूर असलेल्या तैवानमध्ये देखील दिसत आहे. इस्रायलची रणनिती, इस्रायलला अमेरिकेनं दिलेली साथ आणि त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने केलेला हल्ला या सर्व गोष्टींचा तैवाननं खूप सुक्ष्म लेव्हलला अभ्यास केला आहे, आणि याच सर्व अभ्यासाच्या जोरावर आता तैवान चीनला आव्हान देण्याच्या तयारीमध्ये आहे. जर समजा उद्या युद्ध झालचं तर चीनचा सामना करण्यासाठी तैवाननं इराण आणि इस्रायल युद्धाचा अभ्यास करून खास रणनिती तयार केल्याची माहिती देखील समोर येत आहे.

याचं एक उदाहरण द्यायचं झालंच तर तैवानं आता आतापर्यंतचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास “हान कुआंग ड्रिल्स” चं नियोजन केलं आहे. पुढील आठवड्यात तैवानच्या इतिहासात झाला नाही असा युद्ध अभ्यास आता सुरू होणार आहे. या युद्ध अभ्यासामध्ये 22,000 हजार राखीव सैन्य सहभागी होणार आहेत. या युद्ध अभ्यासामध्ये सायबर हल्ला, मिसाइल हल्ला आणि प्रत्यक्षात जमिनीवरची लढाई अशा विविध प्रकारांचा अभ्यास केला जाणार आहे. चीनकडून हल्ला झालाच तर त्याला कशापद्धतीनं उत्तर द्यायचं हे लक्षात घेऊन हा युद्ध अभ्यास होणार आहे.

इराण आणि इस्रायल युद्धामधून तैवान काय शिकला?

13 जून ते 24 जूनपर्यंत बारा दिवस इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झालं. इराणने युद्धाच्या पहिल्याच टप्प्यात इस्रायलच्या एअर डिफेंन्स सिस्टिमचं मोठं नुकसान केलं. इराणने खूप आधीच या सर्व गोष्टींची तयारी केली होती, इराणे केलेले हल्ल्यांमध्ये इस्रायलचं मोठं नुकसान झालं. इराणकडून 550 पेक्षा अधिक मिसाईल हल्ले इस्रायलवर करण्यात आले. अमेरिकेकडून देखील इराणवर हल्ला करण्यात आला, त्यांची अणू केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले, मात्र तरी देखील इराण मागे हटलं नाही, यावरून आता तैवानं देखील ही गोष्ट लक्षात घेतली आहे की, कोणतंही युद्ध सुरू होण्यापूर्वीच त्याची पूर्व तयारी गरजेची असते. तैवानमध्ये हालचाली वाढल्यामुळे आता चीनचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.