AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

War: रशियावर हल्ला होणार? ‘या’ देशाची लढाऊ विमाने सज्ज, हायअलर्ट जारी

युक्रेनच्या शेजारील देश पोलंडमध्येही रशियन ड्रोनने प्रवेश केला आहे. त्यामुळे पोलंडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलंडमधीललुब्लिन विमानतळ तात्काळ बंद करण्यात आले असून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

War: रशियावर हल्ला होणार? 'या' देशाची लढाऊ विमाने सज्ज, हायअलर्ट जारी
Polish Fighter Jet
| Updated on: Sep 13, 2025 | 10:51 PM
Share

गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. अशातच आता युक्रेनच्या शेजारील देश पोलंडमध्येही रशियन ड्रोनने प्रवेश केला आहे. त्यामुळे पोलंडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलंडमधीललुब्लिन विमानतळ तात्काळ बंद करण्यात आले असून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार संशयास्पद ड्रोन हालचाली दिसताच पोलंडने आपली लढाऊ विमाने सीमेवर तैनात केली आहेत. तसेच जमिनीवरील हवाई संरक्षण युनिट्सना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता पोलंड रशियावर हल्ला तर करणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पोलंडचा सावध पवित्रा

गेल्या काही दिवसांपासून रशियन ड्रोन पोलंडच्या हवाई हद्दीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्यानंतर आता पोलंडने संभाव्य धोका ओळखून सीमावर्ती भागात सैन्य तैणात केले आहे. सुरक्षा संस्था आणखी सतर्क झाल्या आहेत. पोलंड आणि मित्र देशांची विमाने हवाई हद्दीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या हवाई संरक्षण यंत्रणेला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुतिन यांनी पोलंडसोबत युद्ध पुकारले – झेलेन्स्की

गेल्या काही दिवसांपूर्वी रशियन ड्रोन पोलंडमध्ये शिरले होते. यावर बोलताना युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मोठं विधान केलं होतं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पोलंडशी युद्ध पुकारले आहे असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच झेलेन्स्की यांनी युरोपीय देशांना इशारा दिला होता की, ‘रशियन ड्रोन खूप लांबपर्यंत प्रवास करु शकतात. त्यांना हा प्रकार थांबवायला सांगा आणि रशियावर कठोर निर्बंध लादा.’

पोलिश सैन्याने दिली महत्त्वाची माहिती

रशियन ड्रोन बाबत पोलिश सैन्याने एक निवेदन जारी करून महत्त्वाची माहिती दिली आहे. सैन्याने म्हटले की, ‘युक्रेनच्या सीमेवरील भागात संभाव्य ड्रोन हल्ले रोखण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. जमिनीवरील हवाई संरक्षण आणि रडार प्रणाली सज्ज आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...