AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपूर्ण जगाला पेट्रोल पुरवणाऱ्या सौदीतील पाणी 11 वर्षात संपणार!

रियाध : आपल्याकडे सौदी अरेबिया म्हटलं की तिथल्या तेलाची चर्चा जास्त होते. पण सध्या पाण्याची चर्चा सौदीसाठी जास्त महत्वाची ठरत आहे. कारण, तेल उत्पादनात गर्भश्रीमंत असलेल्या सौदीत पुढील 11 वर्षांनंतर पाण्याचा थेंबही शिल्लक राहणार नाही असं म्हंटलं जातंय. त्यामुळेच सौदीत आता पाण्यावर पाण्यासारखा खर्च केला जातोय. जगभराला पेट्रोल आणि डिझेल पुरवणाऱ्या सौदीला पाणी कोण पुरवणार, […]

संपूर्ण जगाला पेट्रोल पुरवणाऱ्या सौदीतील पाणी 11 वर्षात संपणार!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Oct 16, 2020 | 8:18 PM
Share

रियाध : आपल्याकडे सौदी अरेबिया म्हटलं की तिथल्या तेलाची चर्चा जास्त होते. पण सध्या पाण्याची चर्चा सौदीसाठी जास्त महत्वाची ठरत आहे. कारण, तेल उत्पादनात गर्भश्रीमंत असलेल्या सौदीत पुढील 11 वर्षांनंतर पाण्याचा थेंबही शिल्लक राहणार नाही असं म्हंटलं जातंय. त्यामुळेच सौदीत आता पाण्यावर पाण्यासारखा खर्च केला जातोय. जगभराला पेट्रोल आणि डिझेल पुरवणाऱ्या सौदीला पाणी कोण पुरवणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.

तेल उत्पादनात गर्भश्रीमंत असलेलं सौदी…इथं ना नदी आहे, ना तलाव. इथे विहिरी आहेत, पण त्या केवळ तेलाच्या. इथल्या पाण्याच्या विहिरी कधीच्याच कोरड्या पडल्या. परिणामी इथलं पाण्याचं दुर्भिक्ष वाढलंय. सौदी तेल विकून प्रचंड पैसा कमावतो. पण यातला बराचसा हिस्सा समुद्राचं पाणी पिण्यालायक करण्यासाठी खर्च होतो. त्यासाठी सौदी अरेबिया वॉटर कन्वर्जन कॉर्पोरेशन अर्थात एसडब्लूसीसी त्यावर काम करते.

सौदीत पाण्यावर पाण्यासारखा खर्च

सौदीमध्ये इंधनाचा सुकाळ पण पाण्याचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. देशात ना नदी, ना तलाव केवळ तेलाच्या विहिरी आहेत. दिवसाला 30.36 लाख क्यु.मी. समुद्रजल पेयजल बनवलं जातं. पेयजलासाठी दिवसाचा खर्च 80.6 लाख रियाल (सौदीचं चलन) एवढा आहे. पाण्यापासून 1 क्यु.मी. मीठ वेगळं करण्याचा खर्च 2.57 रियाल एवढा आहे.

सौदीचं अरबी वृत्तपत्र अल वतनच्या रिपोर्टनुसार खाडीच्या देशांमध्ये प्रति व्यक्ती पाण्याचा वापर जगभरात सर्वाधिक आहे. सौदीत प्रतिव्यक्ती 265 लीटर पाण्याचा वापर होतो, जो की युरोपिय युनियनच्या देशांपेक्षा दुप्पट आहे. इथल्या पाणी वापरावर तोडगा कढण्यासाठी अनेक उपाय योजले गेले. त्यासाठी सौदीने 2015 मध्येच पाण्याच्या व्यावसायिक वापरावरील कर वाढवला होता. वाचा पेट्रोल दरवाढीमागचा सर्वात मोठा व्हिलन ‘ओपेक’ कोण?

सौदीत दरवर्षी डिसेंबर-जानेवारीत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडतो. पण फक्त एखाद-दुसरा दिवस. म्हणजे वर्षात एखादा-दुसरा दिवस पाऊस पडतो. अर्थात हे सगळं विंटर स्टॉर्मच्या रुपात घडतं आणि त्याने ग्राऊंड वॉटरवर काहीच फरक पडत नाही. केवळ सौदीतच नव्हे तर अख्ख्या मध्य पूर्वेत पाण्याची टंचाई आहे. पाण्याच्या कमतरतेमुळेच सौदीला गव्हाचं उत्पादन घेणं बंद करावं लागलं.

पाण्याच्या निर्मितीसाठी जगभर डिसॅलिनेशनचा उपाय प्रसिद्ध आहे. वर्ल्ड बँकेनुसार, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये डिसॅलिनेशनची प्रक्रिया इतर जगाच्या तुलनेत निम्मी आहे. जगातल्या 150 देशांमध्ये समुद्रातील पाण्यातून मीठ वेगळं करुन त्याचा वापर केला जातो. आता सौदीतील जनतेसाठी समुद्रातील पाण्यापासून मीठ वेगळं करणं हा एकमेव उपाय शिल्लक आहे आणि तोच त्यांचा तारणहार ठरू शकतो.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं