पेट्रोल दरवाढीमागचा सर्वात मोठा व्हिलन 'ओपेक' कोण?

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून सतत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी घसरण पाहता सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. इंधर दराचा फटका फक्त वाहनधारकांनाच बसत नाही, तर महागाईच्या रुपाने सर्वसामान्यही यामध्ये होरपळले जातात. पण पेट्रोल, डिझेलचे कमी झालेले दर हे कधीही फार काळ टिकत नाहीत. हे दर वाढवणं सरकारच्या हातात नसलं तरी यामागे कोण आहे? कमी …

पेट्रोल दरवाढीमागचा सर्वात मोठा व्हिलन 'ओपेक' कोण?

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून सतत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी घसरण पाहता सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. इंधर दराचा फटका फक्त वाहनधारकांनाच बसत नाही, तर महागाईच्या रुपाने सर्वसामान्यही यामध्ये होरपळले जातात. पण पेट्रोल, डिझेलचे कमी झालेले दर हे कधीही फार काळ टिकत नाहीत. हे दर वाढवणं सरकारच्या हातात नसलं तरी यामागे कोण आहे? कमी झालेले दर तातडीने वाढवणारी संघटना म्हणजे ओपेक अर्थात Organization of Petroleum Exporting Countries (OPEC).. याच संघटनेमुळे जगात कुठेही स्वस्त पेट्रोलचा आनंद फार काळ घेता येत नाही.

ओपेक ही इंधन निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असून या संघटनेचं मुख्यालय ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्नामध्ये आहे. ऑस्ट्रियाचा ओपेक देशांमध्ये समावेश नसला तरी मुख्यालय मात्र व्हिएन्नामध्ये आहे. 15 देश असलेल्या या संघटनेकडून तेलांच्या किंमतीत मोठी कमाई केली जाते. सौदी अरेबिया या देशांचा प्रमुख मानला जातो. जगातली 44 टक्के तेल निर्मिती ओपेक देशांकडून केली जाते, तर  जगातील 81.5 टक्के तेल साठा या देशांकडे आहे.

अल्जेरिया, अँगोला, इक्वेडोर, इक्वेटोरियल गयाना, गॅबन, इराण, इराक, कुवैत, लिबिया, नायजेरिया, कतार, रिपब्लिक ऑफ काँगो, संयुक्त अरब अमिरात आणि स्वयंघोषित प्रमुख असलेल्या सौदी अरेबियाचा या ग्रुपमध्ये समावेश आहे. व्हेनेझुएला आणि इंडोनेशियाचाही या ग्रुपमध्ये समावेश होता, पण त्यांनी नंतर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिवाय कुवैतही लवकरच यामधून बाहेर पडणार आहे.

तेल ही जगाची गरज आहे आणि प्रमुख राष्ट्र तेल आयातीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या संघटनेकडून मोठ्या प्रमाणात कमाई केली जाते. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या की हे ओपेक देश लगेच तेल निर्मिती कमी करतात, जेणेकरुन स्वतःला तोटा होणार नाही. या ओपेक देशांच्या लॉबीमुळे जगभरात तेलांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जगात स्वस्त किंमतीत कच्च तेल आयात करावं लागल्यामुळे आता ओपेक देशांच्य पुन्हा एकदा पोटात दुखू लागलंय. या देशांनी गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतलाय. उत्पादन कमी केल्याने जगभरातून तेलाची मागणी वाढेल आणि परिणामी पुन्हा एकदा दर वाढवले जातील. या संघटनेच्या लॉबीमुळे तेल स्वस्त होत नाही.

ओपेक देशांसाठी अमेरिका, चीन आणि भारत हे तेलाचे प्रमुख निर्यातदार आहेत. या संघटनेचा स्वयंघोषित प्रमुख असलेला सौदी अरेबिया देश लगेच कच्च्या तेलाची किंमत वाढवण्याचे प्रयत्न करतो. आता पुन्हा एकदा या संघटनेने कच्च्या तेलाच्या दर कमी केल्यामुळे भारतातही दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *