Video : शिंजो आबे यांच्यावर कुठून कसा आणि केव्हा हल्ला झाला? तिन्ही प्रश्नांची उत्तरं एका व्हिडीओत!

| Updated on: Jul 08, 2022 | 12:14 PM

Shinzo Abe Attacked Video : ज्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली, त्यालाही लगेचच ताब्यात घेण्यात आलं.

Video : शिंजो आबे यांच्यावर कुठून कसा आणि केव्हा हल्ला झाला? तिन्ही प्रश्नांची उत्तरं एका व्हिडीओत!
हाच तो क्षण
Image Credit source: PTI
Follow us on

जपनाच्या माजी पंतप्रधानांवर (Japan Former Prime Minister Shinzo Abe Shot) गोळीबार झाला. भर भाषणादरम्यान, त्यांच्यावर दिवसाढवळ्या झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानं एकच खळबळ उडाली. हा कार्यक्रम लाईव्ह टीव्हीवरही दाखवला जात होता. त्याच दरम्यान, त्यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबारानंतर (Shinzo Abe Attack) ते जागच्या जागी कोसळले. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यातही कैद झाली. दरम्यान, तातडीनं यानंतर शिंजो आबे यांना एअरलिफ्ट करुन रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र यावेळी त्यांच्या हृदयाचे ठोको बंद झाले असल्याचं सांगितलं जातंय. पण तरिही त्यांचा जीव वाचवण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्यात आले. इतकंच काय तर ज्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली, त्यालाही लगेचच ताब्यात घेण्यात आलं. या गोळीबाराच्या घटनेनंतर सभास्थळी एकच गोंधळ उडाला होता. पळापळा झाली होती. ही संपूर्ण घटना व्हिडीओ (Shinzo Abe Photo) आणि फोटोतही कैद झाली.

सर्वाधिक काळ जपानचं पंतप्रधान पद भूषवलेल्या शिंजो आबे हे एका ठिकाणी भाषण करत होते. जपानच्या नारा शहरामध्ये त्यांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी 41 वर्षाच्या तेत्युया यामागामी नावाच्या इसमानं त्याच्यावर गोळी झाडली. या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याची कसून चौकशी करण्यात येतेय. यानंतर लगेचच हेलिक़प्टर मागवून शिंजो आबे यांना एअरलिफ्ट करत रुग्णालयात आणण्यात आलं. पण त्याआधीच त्याचा श्वास आणि त्यांच्या हृदयाचे ठोके बंद झाले असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यानं सांगितलंय.

हे सुद्धा वाचा

या हल्ल्यानंतरचे काही अंगावर काटा आणणारे फोटो समोर आले आहेत. तसंच व्हिडीओतूनही ही घटना उघडकीस आली आहे. हल्ल्यानंतर जागच्या जागी शिंजो आबे कोसळले होते. त्यांना गोळी लागल्यानंतर रक्तस्त्रावही झाला. त्यांचं शर्ट रक्ताने माखलेलं होतं. तर या ठिकाणी असलेली लोक त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांना प्रथमोपचार देतानाही फोटोत दिसले आहे. अचनाक झालेल्या हल्लाने सगळेच धास्तावल्याचे भाव लोकांच्या चेहऱ्यावर दिसून आलेत.

पाहा व्हिडीओ :

या हल्ल्यानंतर लगेचच गोळी झाडणाऱ्यालाही ताब्यात घेतलं गेलं. त्या हल्लेखोराकडून बंदूकही जप्त करण्यात आली आहे. तो नारा या शहरातीलच असल्याचं समोर आलंय.

या हल्ल्याच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शिंजो आबे हे भाषण करताना दिसत आहेत. 32 सेकंदाच्या या व्हिडीओदरम्यान अचानक कॅमेऱ्यात काही क्षणांसाठी हलतो. याच वेळी शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडली गेल्याचा आवाजही ऐकू आलाय. यानंतर शिंजो आबे रस्त्यावर कोसळलतात. याच व्हिडीओ हल्ला करणाऱ्याला पकडताना सुरक्षाकर्मींच्या झटापटही व्हिडीओत पुढे दिसून येते.