Explainer : होर्मुझ बंद, मग आखाती देशांकडे तेलवाहतुकीचे पर्याय काय? 2 प्लॅन बी सोडवू शकतात अडचण; वाचा नेमकं कसं?

होर्मुझला पर्याय ठरावा यासाठी सौदी अरेबियात तेल वाहून नेण्यासाठी एक पाईपलाईन तयार करण्यात आली आहे. या पाईपलाईनला पेट्रोलाईन असे म्हटले जाते. 1980 च्या दशकात तयार करण्यात आलेल्या या पाईपलाईनला इस्ट-वेस्ट पाईपलाईन असेही म्हणतात.

Explainer : होर्मुझ बंद, मग आखाती देशांकडे तेलवाहतुकीचे पर्याय काय? 2 प्लॅन बी सोडवू शकतात अडचण; वाचा नेमकं कसं?
STRAIT OF HORMUZ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 03, 2026 | 2:50 PM

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग अडचणीत आले आहे. युरोपीय देशांसोबतच पश्चिम आशियाई देशांमध्ये मोठे उर्जासंकट आले आहे. पाकिस्तान या देशात प्रचंड महागाई वाढली आहे. दुसरीकडे भारतालाही या युद्धाचे चटके बसू लागले आहेत. भारतात गॅस सिलिंडरची किंमत वाढलेली आहे. तर लवकरच पेट्रोल आणि डिझेलचा भावही वाढण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेची कोंडी करण्यासाटी फेब्रुवारी महिन्यापासून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी जलवाहतुकीसाठी बंद केलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जगभरात कच्च्य तेलाची, नैसर्गिक वायुची, खतांची तसेच इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदीवर अद्याप एकमत न झाल्याने हे उर्जासंकट भविष्यात आणखी भीषण आणि चटके देणारं ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्यायी व्यापार मार्ग, तेलवाहतुकीसाठी अन्य पर्यायांचा शोध घेतला जात आहे. हे अन्य पर्याय कोणते आहेत आणि या पर्यायांच्या माध्यमातून केली जाणारी गॅस आणि तेल वाहतूक किती किफायतशीर आहे, ते जाणून घेऊ या… होर्मुझच्या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us