भारत आणि पाकिस्तानमधील संसदेत काय फरक? राज्यसभा-लोकसभेऐवजी पाकमध्ये ‘या’ संस्था

पाकिस्तानमधील संसद आणि भारताची संसद यात काय फरक आहे असा अनेकांना प्रश्न पडलाय. त्या निमित्तानेच घेतलेला हा खास आढावा.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:18 PM, 7 Mar 2021
भारत आणि पाकिस्तानमधील संसदेत काय फरक? राज्यसभा-लोकसभेऐवजी पाकमध्ये 'या' संस्था

इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानची संसद चर्चेत आहे. नुकताच पंतप्रधान इमरान खान यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठं राजकीय संकट तयार झालं. इमरान खान यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्र्यांचाच तेथील मजबूत विरोधी पक्षांनी पराभव केल्यानंतर ही नामुष्की आली. मात्र, सैन्य दल प्रमुख, आयएसआय प्रमुखांसह सत्ताधारी युतीच्या नेत्यांच्या बैठकांनंतर इमरान खान यांना आपलं बहुमत सिद्ध करण्यात यश आलं. त्यामुळे त्यांच्या सत्तेवरील टांगती तलवार कमी झालीय. मात्र, याच घटनाक्रमांमुळे पाकिस्तानमधील संसद आणि भारताची संसद यात काय फरक आहे असा अनेकांना प्रश्न पडलाय. त्या निमित्तानेच घेतलेला हा खास आढावा (What is difference between India and Pakistan Parliament Know all about it).

इमरान खान यांच्या सरकार विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये बऱ्याच कायदेशीर प्रक्रिया पार पडल्या. अखेर पाकिस्तान तहरीक ए इंसाफच्या नेतृत्वातील इमरान खान सरकारने बहुमत सिद्ध केलं. पाकिस्तानमध्येही भारताप्रमाणेच कायदेशीर बाबी पाहण्यासाठी संसद आहे. तेथेही भारताप्रमाणेच मतदानातून सरकारला बहुमत सिद्ध करावं लागतं. मात्र, पाकिस्तान आणि भारताच्या संसदेत काय फरक आहे, भारतात जशी लोकसभा आणि राज्यसभा हे संसदेचे दोन सभागृह आहेत तसे पाकिस्तानमध्ये काय आहे? तेथे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची निवड कशी होते? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

पाकिस्तानमधील संसदेची संरचना कशी?

पाकिस्तानमध्ये देखील भारताप्रमाणेच संसदेचे दोन सभागृह असतात. भारतात कनिष्ठ सभागृहाला लोकसभा आणि वरिष्ठ सभागृहाला राज्यसभा म्हणतात. पाकिस्तानमध्ये कनिष्ठ सभागृहाला नॅशनल असेंब्ली किंवा ‘कौमी असेंब्ली” म्हणतात. तसेच वरिष्ठ सभागृहाला सिनेट किंवा ‘आयवान-ए बाला’ असं म्हणतात. भारतात राष्ट्रपती संसदेचे सदस्य नसतात, मात्र पाकिस्तानमध्ये राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहात सहभागी असतात. पाकिस्तानमध्ये राष्ट्रपती सर्वोच्च पदाधिकारी आहेत.

पाकिस्तानच्या संसदेला मजलिस-ए-शूरा म्हणतात. आधी ही संसद कराचीत होती, मात्र 1960 नंतर ही संसद इस्लामाबादमध्ये हलवण्यात आली.

कौमी असेंब्ली काय आहे?

भारतात जशी लोकसभा असते, तशी पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली असते. यात एकूण 342 सदस्य असतात. यातील 242 सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येतात. इतर 70 सदस्यांमध्ये महिला आणि अल्पसंख्यांकांसाठी आरक्षित आहेत. यातील सदस्य लोकांमधून निवडले जातात. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे असतो. कौमी असेंब्ली सभागृहात पाकिस्तानचे पंतप्रधान सत्ताधारी पक्षाचे नेते असतात.

आयवान-ए बाला काय आहे?

भारतात जशी राज्यसभा तशी पाकिस्तानमध्ये आयवान-ए बाला (सिनेट) सभागृह. या सभागृहाचं कधीही विसर्जन होत नाही. केवळ टप्प्याटप्प्याने यातील सदस्य बदल राहतात. या ठिकाणी सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षे असतो. या सभागृहाला (सिनेट) अनेक विशेष अधिकार असतात जे नॅशनल असेंब्लीला नसतात.

पाकिस्तानमध्ये निवडणका कशा होतात?

पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहातील सदस्यांची निवड वेगवेगळ्या राज्यांमधील (प्रांत) विधानसभा (असेंब्ली) करतात. कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमधील सदस्य मात्र लोकांमधून निवडणुका घेऊन निवडले जातात. भारताच्या लोकसभेची एकूण सदस्य संख्या 545 आहे. पाकिस्तानमधील नॅशनल असेंब्लीत सदस्यांची एकूण संख्या 342 आहे. मात्र, यातील केवळ 272 सदस्य प्रत्यक्ष मतदानाने निवडले जातात. बाकी 70 उमेदवारांच्या निवडीवेळी निवडणूक होत नाही. यात 10 जागा पाकिस्‍तानमधील पारंपरिक आणि धार्मिक अल्‍पसंख्‍याक समुहांसाठी आरक्षित असतात.

हेही वाचा :

पाकिस्तानमध्ये अर्थमंत्र्यांच्या पराभवाने सरकारविरोधात अविश्वास ठराव, इमरान खान यांना किती मतं?

Video : पाकिस्तानात इम्रान खान यांची अब्रू वाचली, पण समर्थकांची जोरदार राडेबाजी

पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर चाकू आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला, 5 जणांचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

What is difference between India and Pakistan Parliament Know all about it