Video : पाकिस्तानात इम्रान खान यांची अब्रू वाचली, पण समर्थकांची जोरदार राडेबाजी

पाकिस्तान सिनेट निवडणुकीत अर्थमंत्री अब्दुल हफीज यांचा पराभव झाल्यामुळे इम्रान खान सरकारला विश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागलं.

Video : पाकिस्तानात इम्रान खान यांची अब्रू वाचली, पण समर्थकांची जोरदार राडेबाजी

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर शनिवारी मतदान पार पडलं. यावेळी इम्रान खान यांच्या पक्षाला 178 मतं मिळाली आहेत. पाकिस्तान सिनेट निवडणुकीत अर्थमंत्री अब्दुल हफीज यांचा पराभव झाल्यामुळे इम्रान खान सरकारला विश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागलं. परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी नॅशनल असेम्ब्लीमध्ये प्रस्ताव सादर केला. त्यासाठी शनिवारी मतदान पार पडलं. या मतदानात इम्रान खान यांच्या पक्षाला 178 मतं मिळाली.(Pakistan’s PM Imran Khan wins no-confidence vote)

दरम्यान, यापूर्वी विश्वासदर्शक प्रस्तावाच्या मतदानावेळी विरोधकांकडून संसदेत बहिष्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे इम्रान खान यांना दिलासा मिळाला होता. विश्वासदर्शक प्रस्ताव दाखल होण्यापूर्वीच इम्रान खान यांनी आपल्या खासदारांना पक्षाची भूमिका फॉलो करण्यास सांगितलं होतं. तसंच या प्रस्तावादरम्यान जो निर्णय येईल, तो आपल्याला मान्य असल्याचं खान म्हणाले होते.

माजी पंतप्रधान शाहिद खाकान यांच्यावर इम्रान समर्थकांचा हल्ला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकला आहे. त्यानंतर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांच्यावर इम्रान खान समर्थकांनी हल्ला केला. यावेळी अब्बासी यांचे समर्थक इम्रान खान समर्थकांना रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अहसान इकबाल यांच्यावर बूट फेकला

पीएमएलएन नेता अहसान इकबाल यांच्यावरही बूट फेकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकाराचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असल्याचं या व्हि़डीओत पाहायला मिळत आहे. त्यावेळी अहसान आणि अन्य एख नेते तिथे उपस्थित होते. तेव्हा अहसान यांच्यावर गर्दीतून बूट फेकण्यात आला. दरम्यान, बूट फेकणाऱ्याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

संबंधित बातम्या :

इराकमध्ये अमेरिकेच्या सैन्यावर 13 मिसाईल हल्ले, बायडन सरकारची रणनीती काय?

भारताचा शेजारी कारगिल 2 च्या तयारीत? युद्धाची भाषा करत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी

पाकिस्तानात 55 वर्षाच्या DSPचं 19 वर्षीय मुलीशी लग्न! प्रेमकहाणीची सर्वत्र चर्चा

Pakistan’s PM Imran Khan wins no-confidence vote

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI