पाकिस्तानात 55 वर्षाच्या DSPचं 19 वर्षीय मुलीशी लग्न! प्रेमकहाणीची सर्वत्र चर्चा

ही प्रेमकहाणी पाकिस्तानातील आहे. या प्रेमकहाणीमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही प्रेमकहाणी पाकिस्तानच्या पोलीस खात्यातील आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:22 PM, 2 Mar 2021
पाकिस्तानात 55 वर्षाच्या DSPचं 19 वर्षीय मुलीशी लग्न! प्रेमकहाणीची सर्वत्र चर्चा

नवी दिल्ली : प्रेम आंधळं असतं म्हणतात. कधी कुणाला कुणावर होईल काही सांगता येत नाही. मग त्याला ना वयाची मर्यादा असते ना जातीपातीची. सध्या अशाच एका प्रेमकहाणीची जागतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे ही प्रेमकहाणी पाकिस्तानातील आहे. या प्रेमकहाणीमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही प्रेमकहाणी पाकिस्तानच्या पोलीस खात्यातील आहे.(In Pakistan, a 55-year-old DSP married a 19-year-old girl)

पाकिस्तानच्या पंबाज प्रांतातील एका 55 वर्षीय डीएसपी साबिर चड्ढा यांनी 19 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबल इकरासोबत लग्न केलं आहे. ही इकरा सोहावा इथली रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. दोघांमध्ये वयाचं एवढं अंतर असतानाही झालेल्या या लग्नामुळे लोक हैराण आहेत. त्यामुळे फक्त पाकिस्तानातच नाही तर जागतिक पातळीवर या लग्नाची चर्चा सुरु आहे.

सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार इकरा जेवा पोलिसांत भरती झाली त्यावेळीच साबिर यांना तिच्याबद्दल प्रेम वाटू लागलं. पुढे हे दोघे एकत्र आले. त्यांचात प्रेम निर्माण झालं आणि आता त्यांनी लग्न केलं आहे. मात्र, या लग्नामुळे अनेकजण आनंद व्यक्त करत आहेत. तर काहीजण मात्र या लग्नाची निंदा करत आहेत. पाकिस्तानात या प्रकारचे किस्से अनेकदा ऐकायला आणि पाहायला मिळत असल्याचं काहीजणांचं म्हणणं आहे. तसंच यात काय चूक आहे? असंही काहीजण म्हणत आहेत. मात्र, या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियात चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे.

इतर बातम्या :

Video : उस्तादाप्रमाणे तबला वाजवतेय सारा अली खान, तरीही नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

जॉन अब्राहमचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

In Pakistan, a 55-year-old DSP married a 19-year-old girl