जगात सुरक्षित जागा कोणती?, तिसरे महायुद्ध झाले तर VIP लोक कुठे लपणार ?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी काही ठोस भूमिका घेतील अशी अपेक्षा ठेवून गेलेल्या युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा शुक्रवारी प्रत्यक्षात अमेरिकेकडून भ्रमनिरास झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना युरोपीय संघांनी पाठिंबा दिल्याने आता पुतीन बदला घेण्यासाठी अण्वस्र हल्ला करण्याची भीती व्यक्त होत आहे. तिसरे जागतिक महायुद्ध झाले तर पृथ्वीवर सर्वात सुरक्षित जागा कोणती पाहूयात...

मॉस्को: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर तिसरे महायुद्ध भडकवल्यााचा आरोप केला आहे. झेलेन्स्की यांच्या आक्रमक पावलाने तिसऱ्या महायुद्धाची नांदी होऊ शकते असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमध्ये बोलावून त्यांना हुकूमशहा असे म्हटले आहे. याचे प्रत्युत्तर झेलेन्स्की यांनी लागलीच दिले आहे. युक्रेनच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अमेरिका गॅरंटी देणार आहे का असा सवाल युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी डोनाल्ड यांना केला आहे.त्यामुळे जर तिसरे महायुद्ध भडकले तर जगात असे कोणते सुरक्षित ठीकाण आहे जेथे या युद्धाची झळ पोहचणार नाही.
रशियाचा यूक्रेनवर मोठा ड्रोन हल्ला
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वाद झाल्यानंतर ब्रिटनला पोहचलेल्या वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान किव्ह स्टार्मर सह अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. या दरम्यान, रशियाने युक्रेनवर ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेन रशियाने १६६ ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे.त्यातील ९० ड्रोन हल्ले निकामी करण्यात यश आले आहे. हा आक्रमकपणा साल २०२२ नंतर युद्ध सुरु केल्यानंतर युक्रेनसाठी मोठी नुकसानदायक ठरली आहे.युक्रेन अनेक काळापासून एअर डिफेन्स सिस्टीमच्या उणीवेशी सामना करीत आहे.अशा रशियाच्या हवाई हल्ले आपल्या लक्ष्याचा अचूक भेद करीत आहे. त्यामुळे युक्रेनच्या सैन्याची मोठी हानी होत आहे.
यूरोपीय संघाचे झेलेन्स्की यांना आवतण
युरोपीय संघ परिषदेने युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना पुढच्या महिन्यात युरोपीयन संघाच्या नेत्यांच्या शिखर परिषदेचे निमंत्रण मिळाले आहे.या सम्मेलनात युक्रेनला पाठींबा मिळण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.युरोपीय संघ आणि त्याचे सदस्य देश युरोपच्या सुरक्षेसाठी अधिक जबाबदारी घेण्यासाठी तयार आहेत. यासाठी आम्हाला युक्रेनमध्ये स्थायी शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा गॅरंटीमध्ये युरोपीय योगदानासाठी तयार राहायला हवे असे यूरोपीय परिषदचे अध्यक्ष एंटोनियो कोस्टा यांनी एका निमंत्रण पत्रात म्हटले आहे.
अणु युद्धाची शक्यता वाढली
अशा आपत्कालिन स्थिती आणि वाटाघाटींमुळे जगभरातील लोकांना त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाटू लागली आहे, कारण रशियाचे अध्यक्ष पुतिन युक्रेनला युरोपीय संघाने जाहीरपणे दिलेल्या पाठिंब्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया देऊ शकतात आणि अण्वस्त्रांनी हल्ला करू शकतात. अणुयुद्धाच्या परिणामांमुळे जागतिक अन्न पुरवठ्यात घट होईल आणि किरणोत्सर्ग आणि स्फोटांच्या परिणामांमुळे मोठा विनाश होईल. तरीही, जगात असे अनेक ठिकाणे आहेत जेथे अणुयुद्धाची जास्त झळ पोहचणार नाही.
जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणे
अँगलसे हे वायव्य वेल्सच्या किनाऱ्यावरील एक बेट आहे आणि मेनाई सामुद्रधुनीने मुख्य भूमीपासून वेगळे केले आहे. कमी लोकसंख्या आणि या दुर्गमतेमुळे हल्ला होण्याची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे, कॉर्नवॉल तुलनेने विरळ लोकवस्तीचे आहे आणि ते अटलांटिक महासागराला जोडणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांनी बनलेले एक अत्यंत ग्रामीण क्षेत्र आहे.
आर्टीक्ट आणि अंटार्टीका बेटे सर्वात सुरक्षित
या यादीत आर्टीक्ट आणि अंटार्टीका बेटे सर्वात सुरक्षित मानली जात आहेत. हा जगातील विरल लोकसंख्येची जागा आहे. हे देश मोठे असल्याने अणू युद्ध भडकले तर येथे जागा मिळू शकते. या शिवाय प्रशांत महासागरीय बेटांचे देश, हिंद महासागरीय बेटांचे देश आणि अफ्रीका सर्वात सुरक्षित राहतील. परंतू मोठी लोकसंख्या असलेल्या या तिसऱ्या जगातील लोकांचे पोट भरु शकेल इतके अन्नधान्य येथे नाही.
या देशांवरही तिसऱ्या विश्व युद्धाचा प्रभाव नाही
आर्टीक्ट आणि अंटार्टीका यांच्या नंतर जगात सर्वात सुरक्षित जागामध्ये स्वित्झर्लंड, सिंगापुर सारख्या देशांचा समावेश आहे.हे देश राजनैतिक दुष्टया तटस्थ रहाण्याचा त्यांचा मोठा इतिहास आहे.येथील विशाल पर्वतीय क्षेत्र आणि अणूयुद्ध संपेपर्यंत पर्याप्त सुरक्षा देतील असे म्हटले जाते. चिली, उरुग्वे आणि अर्जेंटीना सारख्या दक्षिण अमेरिकन देश अणू युद्ध भडकल्यानंतर आदर्श पर्याय असतील कारण हे देश जगातील प्रमुख खाद्य निर्यात करणारे देश असल्याने येथे अन्नधान्याची अडचण असणार नाही.
