भारताच्या 100 रुपयांचे जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानमध्ये किती होतात ? जेथे गेलेत पीएम मोदी

PM Modi Three Nation Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 18 डिसेंबर दरम्यान जॉर्डन, इथियोपिया आणि ओमान दौऱ्यावर आहेत. यावेळी संरक्षण आणि व्यापारासह अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे. हे तीन देश भारतीय पर्यटकांनी भरलेले असतात. भारताच्या 100 रुपयांचे जॉर्डन,इथिओपिया आणि ओमान येथे किती होतात ? पाहूयात...

भारताच्या 100 रुपयांचे  जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानमध्ये किती होतात ? जेथे गेलेत पीएम मोदी
PM Modi Three Nation Tour
| Updated on: Dec 15, 2025 | 7:22 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानच्या दौऱ्यावर गेले आहेत. ते आधी जॉर्डनला गेले आहेत. येथे पीएम मोदी राजा अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसैन यांच्याशी द्विपक्षीय बोलणी करतील. ते 15 आणि 16 डिसेंबरला जॉर्डनला राहतील आणि नंतर इथिओपिया आणि ओमानसाठी रवाना होतील. 15 ते 18 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्याचा हेतून द्विपक्षीय भागीदारीला मजबूत करणे आणि सोबत व्यापार आणि संरक्षण आणि क्षेत्रीय सुरक्षेला वाढवणे हा आहे.

जॉर्डन असो वा ओमान, या देशात दरवर्षी भारतीय जातात. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जॉर्डनमध्ये सुमारे 17,500 भारतीय मूळ असलेले लोक रहातात.येथे टेक्सटाईल, मॅन्युफॅक्चरिंग, कंस्ट्रक्शन सह अनेक सेक्टरमध्ये ते काम करतात. साल 2023 मध्ये 80 हजार भारतीय जॉर्डनला फिरायला गेले होते.

दूतावासाच्या आकड्यानुसार ओमानमध्ये सुमारे 10 लाख भारतीय वंशाचे लोक राहतात. साल 2024 मध्ये येथे 7 लाख भारतीय पर्यटक फिरायला आले होते. भारतीय येथे फिरायला येतात आणि वारेमाप पैसा खर्च करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या निमित्ताने जाणूया भारतीयांच्या 100 रुपयांची जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानमध्ये किती किंमत आहे.

भारताच्या 100 रुपयाचे जॉर्डनमध्ये किती होतात ?

साल 1950 पासून जॉर्डनची अधिकृत करन्सी जॉर्डनियन दीनार आहे.जॉर्डनियन दीनारला शॉर्टमध्ये JOB म्हणतात. सेंट्रल बँक ऑफ जॉर्डन येथील करन्सीला नियंत्रित करते आणि गाईडलाईन जारी करते. आता जॉर्डनमध्ये भारतीय करन्सीची काय स्थिती आहे हे पाहूयात. भारताचा एक रुपया जॉर्डनमध्ये जाऊन 0.0078 जॉर्डियन दीनार होतो. तर भारताचे 100 रुपये जॉर्डनमध्ये 0.78 जॉर्डनियन दीनार होतात. येथील 100 रुपये तेथील एक जॉर्डनियन दीनारच्या बरोबर देखील नाहीत. यावरुन दोन्ही देशांच्या करन्सीतला फरक समजून येतो. पीएम मोदी यांचा दौरा जॉर्डनचे भारता सोबतचे संबंध मजबूत करणार आहे. तसेच दोन्ही देशात आर्थिक सहकार्य वाढणार आहे.

भारताच्या 100 रुपयांची इथियोपिया काय व्हॅल्यू ?

इथिओपियाच्या अधिकृत चलनाचे नाव बिर्र आहे. याला ETB असे म्हटले जाते. नॅशनल बँक ऑफ इथिओपिया येथील करन्सीला नियंत्रित करण्यासह मार्गदर्शक तत्वे जारी करते. भारताचा एक रुपया इथिओपियात जाऊन 1.72 इथियोपियन बिर्र होतो. तसेच इथिओपियात भारताच्या 100 रुपयांची किंमत 172 इथिओपियन बिर्र म्हणतात. याप्रकारे दोन्ही देशांतीस करन्सीतील फरक समजू शकतो.

जॉर्डननंतर 16 डिसेंबरला पीएम मोदी इथिओपियासाठी रवाना होतील. पंतप्रधान अबी अहमद यांच्याशी ते द्विपक्षीय वार्ता करतील. हा पीएम मोदी यांचा पूर्व आफ्रीका देश इथिओपियाचा पहिला दौरा आहे.

भारतीय 100 रुपये ओमानमध्ये किती होतात ?

केवळ 55 लाख लोकसंख्या असलेल्या ओमानचे अधिक चलन ओमानी रियाल आहे. याला OMR म्हणून शॉर्टकटमध्ये बोलतात. ओमानी रियालला सेंट्रल बँक ऑफ ओमान नियंत्रित करत असते. भारताचा 1 रुपया ओमानमध्ये जाऊन केवळ 0.0042 ओमानी रियाल होतो. तर भारतीय 100 रुपये ओमानमध्ये 0.42 ओमानी रियाल होतात. त्यावरुन ओमान आणि भारतीय चलनातील फरक समजतो.

इथिओपियानंतर पीएम नरेंद्र मोदी 17 डिसेंबरला ओमानला रवाना होतील. येथे पीएम मोदी ओमानचे सुल्तान हॅथम बिन तारिक अल सईद यांची भेट घेतील. भारत आणि ओमान यांच्या द्विपक्षीय नात्याला 70 वर्षे पूर्ण झाले आहेत. हे देखील ओमान दौऱ्याचे एक मोठे कारण आहे.