IPL Auction 2026 Live Streaming: 350 खेळाडू 77 जागा आणि 235.77 कोटींचं बजेट, जाणून घ्या सर्वकाही
IPL 2026 Auction Date, Time: आयपीएल 2026 मिनी लिलावासाी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. 16 डिसेंबरला 350 खेळाडूंपैकी 77 रिक्त जागांसाठी बोली लागेल. एकूण 237.55 कोटी रुपये फ्रेंचायझींकडे आहेत. चला जाणून घेऊयात सर्व काही.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. दहा फ्रेंचायझी आपल्या संघातील रिकाम्या जागा भरण्यासाठी बोली लावणार आहेत. सर्व फ्रेंचायझींची उर्वरित जागांची बेरीज केली तर 77 येते. त्यामुळे या मिनी लिलावात जास्तीत जास्त 77 खेळाडूंचा लिलाव केला जाईल. 350 खेळाडूंपैकी 77 खेळाडूंची निवड केली जाईल. सर्व फ्रेंचायजींच्या पर्समधील रकमेची बेरीज केली तर ती 237.55 कोटी येईल.मिनी लिलाव प्रक्रिया दोन मेगा लिलावांच्या दरम्यान पार पडते. मेगा लिलाव 2025 मध्ये पार पडला होता. आता 2026 आणि 2027 मध्ये मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. मिनी लिलावात गरजेनुसार जास्त खेळाडू राखले जातात आणि कमी खेळाडू खरेदी केले जातात. आता फ्रेंचायझींनी काही खेळाडूंना रिलीज केलं आहे. त्यामुळे संघ बांधणीसाठी आवश्यक असलल्या खेळाडूंवर बोली लावली जाईल. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्सला सर्वाधिक खेळाडूंची आवश्यकता आहे.
आयपीएल 2026 चा मिनी लिलाव कधी आणि कुठे होईल?
आयपीएल 2026 साठीचा मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.
आयपीएल 2026 चा लिलाव मी कुठे पाहू शकतो?
आयपीएल 2026 चा मिनी लिलाव स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.
मिनी लिलावात किती खेळाडू सहभागी होतील?
आयपीएल 2026 च्या मिनी लिलावासाठी 1390 खेळाडूंनी नोंदणी झाली होती. त्यापैकी बीसीसीआयने 350 खेळाडूंची निवड केली आहे. निवडलेल्या खेळाडूंमध्ये 240 भारतीय आणि 110 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
कोणत्या संघाकडे किती पैसे आहेत?
- केकेआर 64.30 कोटी
- सीएसके 43.40 कोटी
- एसआरएच 25.50 कोटी
- लखनौ 22.95 कोटी
- आरसीबी 16.40 कोटी
- राजस्थान 16.05 कोटी
- पंजाब 11.50 कोटी
- गुजरात टायटन्स 12.90 कोटी
- मुंबई 2.75 कोटी
आयपीएल संघांनी किती खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि किती पदे रिक्त आहेत?
आयपीएलच्या 10 संघांनी 173 खेळाडूंना कायम ठेवले आहे. यात 45 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. साधारणपणे 10 संघांमध्ये 250 खेळाडू असू शकतात, यात 80 विदेशी खेळाडूंचा समावेश असू शकतो. आता 77 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 52 भारतीय खेळाडू आणि 25 विदेशी खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत.
ट्रेड विंडोमधून खरेदी केलेले खेळाडू कोण आहेत?
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी ट्रेड विंडोद्वारे एकूण आठ खेळाडू खरेदी करण्यात आले आहेत. यामध्ये संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, सॅम करन, मोहम्मद शमी आणि अर्जुन तेंडुलकर यांची नावे आहेत.
आयपीएल 2026चा मिनी लिलाव कोणत्या क्रमाने होईल?
या मिनी लिलावाची सुरुवात आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या गटाने होते. यामध्ये फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, यष्टीरक्षक, वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू यांचा समावेश असेल. त्यानंतर अनकॅप्ड खेळाडूंवर बोली लागेल. सुरुवातीच्या पाच संचांमध्ये समाविष्ट असलेल्या 34 खेळाडूंची नावे हळूहळू निवडली जातील. याचा अर्थ असा की संघांना त्यांना खरेदी करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. तथापि, अनकॅप्ड खेळाडूंचा संच बाहेर येताच बोलीचा वेग वाढेल.
लिलावात सर्व 350 खेळाडूंची नावे घेतली जातील का?
नाही. लिलावात 50 पेक्षा जास्त खेळाडूंची विक्री झाल्यानंतर संघांना खेळाडू निवडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर सर्व संघांनी नाव दिलेल्या खेळाडूंचा लिलाव केला जातो.
