IPL Auction : आयपीएल लिलावासाठी टाय ब्रेकर नियम, काय आणि कसा वापरला जाणार ते समजून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया काही तासात पार पडणार आहे. दहा फ्रेंचायझी आपल्याला आवश्यक असलेल्या खेळाडूंसाठी फिल्डिंग लावून आहेत. पण नवा ट्राय-ब्रेकर नियमामुळे या लिलावात उत्साह येणार आहे. कसं काय ते जाणून घ्या.

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया 16 डिसेंबर 2026 रोजी पार पडणार आहे. या लिलावासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. खेळाडूंवर बोली लागणार आणि मोठी किंमत मोजणारी फ्रेंचायझी त्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेणार.. सध्या रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर केकेआर आणि सीएसकेच्या ताफ्यात सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. तर मुंबई इंडियन्सकडे फक्त 2.75 कोटी आहेत. पण या वेळी एका नियमाने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण होणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. बीसीसीआयने या वर्षी लिलावात एक नवा ट्रायब्रेकर नियम आणला आहे. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये उच्च स्तरीय गुप्त बोलीच्या समस्येच निराकरण करण्यासाठी हा नियम तयार करण्यात आला आहे.
नवा टायब्रेकर नियम काय आहे?
आयपीएलने 2010 मध्ये टाय-ब्रेकर नियम लागू केला. मिनी लिलावासाठी लागू केला गेला होता. एका खेळाडूसाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त संघ आग्रही असतील. त्यांनी लिलावात समान बोली लावली असेल तर हा नियम लागून होतो. बीसीसीआय फ्रेंचायझींना टाय ब्रेकर फॉर्म देईल. यात भारतीय रुपयांमध्ये फ्रेंचायझी गुप्त बोलीची रक्कम भरून ती बीसीसीआयकडे सोपवतील. ही रक्कम खेळाडूला दिली जाणार नाही. तर ती रक्कम फ्रेंचायझी बीसीसीआयला देईल. याला ‘टाय-ब्रेकर बोली’ म्हटलं जातं. टायब्रेकर फॉर्ममध्ये जास्त रक्कम असलेल्या फ्रेंचायझीला सदर खेळाडू दिला जाईल. पण खेळाडूची किंमत दोन्ही संघांनी लॉक केलेल्या किंमतीइतकीच राहील. तर टायब्रेकर फॉर्ममध्ये भरलेली रक्कम बीसीसीआयला द्यावी लागेल.
गुप्त बोली जिंकणाऱ्या संघाला 16 डिसेंबरच्या लिलावाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत ती रक्कम भारतीय रुपयांमध्ये बीसीसीआयला द्यावी लागेल. बोली प्रक्रियेत गुप्तता पाळली जाईल. यापूर्वी, किरॉन पोलार्ड, शेन बाँड आणि रवींद्र जडेजा सारख्या खेळाडूंना गुप्त बोलीद्वारे खरेदी केले गेले होते. त्यामुळे कोणत्या खेळाडूवर जर दोन फ्रेंचायझी या 4 कोटी रुपयांवर अडून राहिल्या. तर त्या खेळाडूचा निर्णय हा ट्रायब्रेकरच्या माध्यमातून होईल. ट्रायब्रेकरमध्ये एका फ्रेंचायझीने 1 कोटी आणि दुसऱ्या फ्रेंचायझीने 2 कोटी भरले. तर सर्वाधिक रक्कम भरलेल्या संघाला खेळाडू दिला जाईल. म्हणजे 2 कोटी रक्कम भरलेल्या फ्रेंचायझीला सदर खेळाडू मिळेल. पण खेळाडूला 4 कोटी मिळतील आणि 2 कोटी बीसीसीआयला दिले जातील.
