AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिरुवनंतपुरमध्ये डाव्यांच्या किल्ल्याला सुरुंग, NDA च्या मोठ्या विजयाने PM मोदी झाले भावूक

डाव्यांचा दबदबा असलेल्या केरळातील तिरुवनंतपुर महापालिकेतील ( LDF ) डाव्यांची सत्ता धुळीस मिळाली असून भाजपा-एनडीए सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्गदित झाले असून त्यांनी या विजयाला केरळसाठी ऐतिहासिक म्हटले आहे.

तिरुवनंतपुरमध्ये डाव्यांच्या किल्ल्याला सुरुंग, NDA च्या मोठ्या विजयाने PM मोदी झाले भावूक
PM MODI
| Updated on: Dec 13, 2025 | 6:43 PM
Share

केरळच्या पालिका निवडणूकीत तिरुअनंतपुरम महानगरपालिकेवर ३० सत्ता गाजवणाऱ्या डाव्या आघाडीचा (एलडीएफ) मोठा पराभव झाला आहे.तिरुअनंतपुरम महानगरपालिकेवर भाजप आणि एनडीएचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयासाठी मेहनत घेणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पीएम मोदी यांनी अभिनंदन करीत केरळ राजकारणासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये लिहीले आहे की तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्य भाजपा-एनडीएला जो जनादेश मिळाला आहे. तो केरळच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण आहे. लोकांना आता पटले आहे की राज्याच्या विकासाच्या आकांक्षांना केवळ आमचा पक्ष पूर्ण करु शकतो. आमचा पक्ष या जीवंत शहराच्या विकासाठी काम करेल. लोकांचे रहाणीमान चांगले करेल.पीएम मोदी यांच्या या पोस्टनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. तिरुवनंतपुरम मधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की पीएम मोदी यांच्या नावावरच ही निवडणूक लढली गेली आहे.

कार्यकर्ता आमची ताकत-पीएम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या एक्स पोस्टमध्ये लिहीले की मी त्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांचा आभारी आहे.ज्यांनी लोकांमध्ये काम केले, ज्यामुळे तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये चांगला निकाल पाहाता आला. आजचा दिवस केरळात अनेक दशके काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे काम आणि संघर्षाच्या स्मृतींना उजाळा देण्याचा आहे. ज्यांनी जमीनीस्तरावर काम केले.त्यांच्यामुळे आजचा हा निकाल सत्य झाला. आमचे कार्यकर्ते ही आमची ताकद आहे आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे.

३० वर्षांपासूनची एलडीएफची सत्ता समाप्त

तिरुवनंतपुरम महानगर पालिकेवर गेल्या ३० वर्षांपासून एलडीएफची सत्ता होती. आता एनडीएच्या हातात सत्ता आली आहे.भाजपा गेल्या दोन टर्ममध्ये विरोधी बाकावर होते. आता २०२५ मध्ये सत्ता आली आहे. युडीएफ तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. भाजापाने पालिकेत ५० जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी ५१ जागांची गरज होती. भाजपाला केवळ एका अपक्षाचे समर्थन हवे असून त्यानंतर भाजपा सत्ता स्थापन करु शकणार आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.