नियम – कायदे लोकांना अडचणीचे ठरु नयेत, एनडीएच्या संसदीय बैठकीत पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन
एनडीए संसदीय दलाच्या बैठकीत पीएम मोदी यांनी खासदारांना लोक- केंद्रित शासन आणि सुधारणांवर जोर देण्याचे निर्देश दिले. त्यांनी जनतेचे जीवन आणखी सोपे करण्यासाठी कागदोपत्रीय कारवाई कमी करुन प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करण्यास सांगितले.

संसद भवनात मंगळवारी सकाळी एनडीएच्या संसदीय दलाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह एनडीएचे खासदार उपस्थित होती. बैठकीत एनडीएच्या नेत्यांनी बिहार निवडणूकीतील मोठ्या विजयाबद्दल पीएम मोदी यांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान पीएम मोदी यांनी खासदारांना संबोधित केले आणि अनेक मुद्यांवर चर्चा केली. यासोबतच त्यांनी खासदारांना जनतेशी एकरुप व्हा असे सांगितले. संसद भवनात झालेल्या एनडीए संसदीय दलाच्या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा देखील उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकी संदर्भात सांगितले की पीएम मोदी यांनी सर्व खासदारांना देशातील त्यांच्या राज्यातील क्षेत्रात काय काय करायला हवे त्यावर त्यांची मतप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी रिफॉर्मवर जोर दिला. केवळ आर्थिकच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात रिफॉर्म व्हायला हवा असे पंतप्रधानांनी सांगितले. पीएमने खासदारांना सांगितले की लोकांच्या जीवनाला अडचणी दूर करा त्यांचे जीवन सोपे करण्यासाठी काम करा.
खासदारांना स्वत:च्या क्षेत्रात काम करावे – पीएम मोदी
पीएम मोदी यांनी सर्व खासदारांन आपआपल्या निवडूक क्षेत्रात काम करण्यासाठी सांगितले. ते म्हणाले रुल्स आणि रेग्युलेशन चांगले आहेत. परंतू जनेतला त्रास होता कामा नये. कायदा जनेतेचे जीवन सोपे करण्यासाठी आहे. क्रीडा क्षेत्रात आणखीन वेगाने काम करण्याची गरज आहे. त्यांनी खासदारांना तरुणांशी एकरुप व्हायला सांगितले. किरेन रिजिजू यांनी बैठकीत प्रत्येक क्षेत्रात सुधारणा कशा होतील विकास कसा होईल यावर बैठकीत जोर दिला गेला.
वारंवार डेटा जमा करण्याची प्रक्रीया संपायला हवी – पीएम
पीएम मोदी यांनी हे देखील सांगितले की ३०-४० पानी अर्ज आणि अनावश्यक कागदी कारवाईची संस्कृती संपायला हवी. यावर जोर देताना त्यांनी सांगितले की नागरिकांच्या दरवाजावार सेवा द्यायला हवी. आणि वारंवार डेटा जमा करण्याची प्रक्रीया संपुष्ठात आणली पाहिजे.
सिस्टमला चांगले करण्यासाठी काम व्हावे
भारताच्या नागरिकांना कोणताही त्रास केवळ यासाठी होऊ नये की तो भारतीय आहे, तो होऊ नये ही आपली जबाबदार असल्याचे मोदी यांनी सांगितले. नियम आणि कायदे चांगले आहेत. परंतू त्यांचा वापर सिस्टीम चांगली होण्यासाठी व्हायला हवा, जनतेला त्रास देण्यासाठी नव्हे. पीएम मोदी म्हणाले की सरकारच्या सुधारणा संपूर्ण नागरी केंद्री आहेत. आमचे लक्ष्य लोकांच्या दैनंदिन अडथळे दूर करण्याचे असून त्यामुळे ते संपूर्ण क्षमतेने पुढे जाऊ शकतील.
किरेन रिजिजू यांनी दिली माहिती…
NDA संसदीय पक्षाची बैठकीवर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितली की आज लोकसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु होईल. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज वंदे मातरमवर दोन दिवसांच्या चर्चेचे नेतृत्व करतील. काही विरोधी सदस्यांनी वंदे मातरमवर चर्चा निवडणूकीमुळे होत आहे असा आरोप केला आहे.त्यावर वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. ही तारीख आम्ही निश्चित केली नाही. जन्मदिवस पुढे – मागे साजरे होऊ शकत नाहीत. मग त्याला राजकारणाशी का जोडले जात आहे असा सवाल रिजिजू यांनी केला.
