Operation Sindoor : पाकिस्तानसाठी नष्टर नेता, जेव्हा-जेव्हा मंत्री बनला, तेव्हा-तेव्हा भारताकडून पाकवर स्ट्राईक

Operation Sindoor पाकिस्तानात एक नेता आहे, जो मंत्री बनल्यानंतर नेहमी भारत-पाकिस्तानात मोठा संघर्ष होतो. 2008 पासून हा सिलसिला सुरु आहे. आत्ताही तेच झालय. याआधी 2008 साली ते जेव्हा पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री झाले. त्यावेळी भारताने एका अचूक मर्यादीत कारवाई केली होती.

Operation Sindoor : पाकिस्तानसाठी नष्टर नेता, जेव्हा-जेव्हा मंत्री बनला, तेव्हा-तेव्हा भारताकडून पाकवर स्ट्राईक
Air Strike
| Updated on: May 08, 2025 | 12:01 PM

पाकिस्तानच्या राजकारणात असे काही चेहरे आहेत, जे सत्तेवर येताच भारताच्या सर्जिकल स्ट्राइकची चर्चा सुरु होते. मग, संरक्षण मंत्रालय असो किंवा त्यांच्या उच्चपदाच्या खुर्चीची. जेव्हा-जेव्हा हा व्यक्ती पदावर आलाय, तेव्हा-तेव्हा भारताने पाकिस्तानला कठोर आणि निर्णायक सैन्य उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या राजकारणात अशी एक व्यक्ती आहे, जी सत्तेच्या पदावर असताना भारत-पाकिस्तानमध्ये संघर्ष झालाय. ते नाव आहे ख्वाजा आसिफ. ख्वाजा आसिफ 2013 ते 2017 दरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री होते. त्यांच्याच कार्यकाळात सप्टेंबर 2016 मध्ये उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. भारतीय सैन्याने LOC ओलांडून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅड्सवर हल्ला केला होता. अनेक दहशतवादी या स्ट्राइकमध्ये मारले गेले होते.

भारताकडून ही पहिली अशी सार्वजनिकरित्या स्वीकारलेली क्रॉस-बॉर्डर कारवाई होती. या Action ने पाकिस्तानचे दावे किती पोकळ आहेत ते दिसून आलेलं. त्याशिवाय दहशतवादाच्या बाबतीत पाकिस्तानची पोल-खोल झालेली. ख्वाजा आसिफ हे नाव फक्त 2016 च्या सर्जिकल स्ट्राइकशी जोडलेलं नाहीय. याआधी 2008 साली ते जेव्हा पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री झाले. त्यावेळी भारताने एका अचूक मर्यादीत कारवाई केली होती.

पाकिस्तानी सैनिक ठार झालेले

जानेवारी 2009 मध्ये पाकिस्तानी सैन्याने पुंछ सेक्टरध्ये नियंत्रण रेषेजवळ ‘भट्टल पोस्ट’वर पाकिस्तानच्या गोळीबाराला उत्तर दिलं होतं. यात चार पाकिस्तानी सैनिक ठार झालेले. या ऑपरेशमधून भारतीय सैन्याची अचूक वार करण्याची क्षमता दिसून आलेली. ख्वाजा आसिफ यांनी खुर्ची संभाळल्यानंतर काही महिन्यात हा हल्ला झाला होता.

Khwaja Asif

भारताला युद्धाची, अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी देत होते

ही घटना केवळ संयोग नाहीय. ख्वाजा आसिफ पाकिस्तानच्या सत्तेतील त्या वर्गाचा चेहरा आहे, जे सतत भारतविरोधात बोलत असतात. दहशतवादाच छुपं समर्थन करतात. त्यामुळे ख्वाजा आसिफ महत्त्वाच्या पदावर आल्यानंतर भारताकडून आतापर्यंत चोख प्रत्युत्तर देण्यात आलय. आता ते पाकिस्तानचे संरक्षण मंत्री असताना एअर स्ट्राइक झालाय. आत्ता ऑपरेशन सिंदूर झालं. हेच ख्वाजा आसिफ पहलगाम हल्ल्यापासून टीव्ही चॅनल्सवर भारताला युद्धाची, अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी देत होते.