Erica Robin | कोण आहे मिस यूनिव्हर्स पाकिस्तान एरिका रॉबिन, यश मिळताच कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर

Pakistan Erica Robin | एरिका रॉबिन मिस यूनिव्हर्स पाकिस्तान ठरल्यानंतर पाकिस्तानात काय चर्चा आहे? पाकिस्तानातील जनतेला तिच्याबद्दल काय वाटतं? एका मोठ्या सौंदर्य स्पर्धेत पाकिस्तानच प्रतिनिधीत्व करण्याची संधी.

Erica Robin | कोण आहे मिस यूनिव्हर्स पाकिस्तान एरिका रॉबिन, यश मिळताच कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर
pakistan erica robin
| Updated on: Sep 19, 2023 | 9:36 AM

लाहोर : इतिहासात पहिल्यांदा एक पाकिस्तानी मुलगी मोठी ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली आहे. पाकिस्तानी मॉडेल एरिका रॉबिन मिस यूनिव्हर्स पाकिस्तान किताबाची मानकरी ठरली आहे. आता ती जगातील प्रतिष्ठीत सौंदर्य स्पर्धा मिस यूनिव्हर्समध्ये पाकिस्तानच प्रतिनिधीत्व करणार आहे. गुरुवारी मालदीवमध्ये ही स्पर्धा पार पडली. त्यात एरिकाने मिस यूनिव्हर्स पाकिस्तानचा किताब जिंकला. 28 वर्षांची सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट जेसिका विल्सन उपविजेती ठरली. हीरा इनाम, मलिका अल्वी आणि सबरीना वसीम या सुद्धा फायनलिस्ट होत्या. कराचीमध्ये राहणारी 24 वर्षांची एरिका रॉबिन 72 व्या ग्लोबल मिस युनिव्हर्स पॅजेंटमध्ये सहभागी होणार आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये अल सल्वाडोर येथे ही स्पर्धा होणार आहे. पाकिस्तानची पहिली मिस यूनिव्हर्स बनून सन्मानित झाल्याची माझी भावना आहे, असं एरिका रॉबिन म्हणाली.

“मला पाकिस्तानी सौंदर्य जगाला दाखवायच आहे. आमची एक सुंदर संस्कृती आहे, ज्या बद्दल मीडियामध्ये चर्चा होत नाही. पाकिस्तानी जनता खूप उदार, दयाळू आणि आदिरातिथ्य करणारी आहे. मी जगातील लोकांना पाकिस्तानात येऊन इथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी निमंत्रित करेन” असं एरिका रॉबिन म्हणाली. एरिका रॉबिन पाकिस्तानी जनतेच गुणगान करत आहे. तिने मिळवलेल्या यशावर पाकिस्तानात दोन मतप्रवाह आहेत. पाकिस्तानातील बहुतांश जनता एरिका रॉबिनच्या यशावर खुश नाहीय. अनेक लोकांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानचे कार्यवाहक सूचना आणि प्रसारण मंत्री मुर्तजा सोलांगी यांनी यावर टि्वट केलय.

कोण आहे एरिका रॉबिन?

“पाकिस्तान सरकारने कोणालाही मिस यूनिव्हर्स स्पर्धेत पाकिस्तानच प्रतिनिधीत्व करण्यासाठी नियुक्त केलेलं नाही” असं मुर्तजा सोलांगी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. सरकार अशा स्पर्धांच समर्थन करते का? असा प्रश्न पाकिस्तानात एका गटाकडून विचारला जातोय, त्यावर पाकिस्तानी मंत्र्याने सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. पाकिस्तानातील कट्टरपंथी मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होण्याला सातत्याने विरोध करत आहेत. 14 सप्टेंबर 1999 रोजी रॉबिनचा जन्म पाकिस्तानातील कराचीमध्ये झाला. ती एका ख्रिश्चन कुटुंबात लहानाची मोठी झाली. 2020 साली ती मॉडलिंगमध्ये आली. सेंट पॅट्रिक गर्ल्स हाय स्कूलमधून तीच सुरुवातीच शिक्षण झालय. त्यानंतर चंदीगड गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिजनेस एडमिनिस्ट्रेशनमधून पुढची पदवी घेतली. एरिकाला फिरायला खूप आवडतं. 2020 मध्ये तिने पाकिस्तानातील अनेक भागात ट्रॅव्हल केलय.