Maharashtra Marathi Breaking News | गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं – फडणवीस

| Updated on: Sep 20, 2023 | 7:08 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra Marathi Breaking News | गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं - फडणवीस

मुंबई : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे. आज गणेशचतुर्थी आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी बाप्पाचा आगमन सोहळा सुरु आहे. सर्वत्र मंगलमय आणि उत्साही वातावरण आहे. आज सर्वदूर ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष ऐकू येत आहे. सकाळपासूनच आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी भक्तांची पावलं, मंदिर, सार्वजनिक मंडपांकडे वळली आहेत. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी आज दिल्लीतही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व खासदार आज नवीन संसदेत प्रवेश करतील. सध्या संसदेच विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. नव्या संसदीय इमारतीत प्रवेशासह काही महत्त्वाची विधेयक संसदेत मांडली जातील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Sep 2023 06:55 PM (IST)

    प्रफुल पटेल यांनी घेतली शरद पवार यांची भेट

    नवी दिल्लीत प्रफुल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाली. नव्या संसदेत शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी एकत्र फोटोही काढला. यावेळी प्रफुल पटेल यांनी पवारांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पवारांनी बोलणं टाळलं, अशी सूत्रांची माहिती आहे.

  • 19 Sep 2023 06:45 PM (IST)

    21 सप्टेंबरला पोलिसांच्या घराची लॉटरी

    21 सप्टेंबरला पोलिसांच्या घरांची लॉटरी निघणार आहे. वरळी, नायगाव, डिलाईल रोडमधील बीडीडी चाळीतील पोलिसांना घरं मिळणार हेत. लॉटरीनंतर घरांचे करार सुरु होणार आहेत.

  • 19 Sep 2023 06:30 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली मुकेश अंबांनी यांची भेट

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबांनी यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं.

  • 19 Sep 2023 06:15 PM (IST)

    महिला आरक्षण ही एक अद्भुत कल्पना - कंगना राणौत

    महिला आरक्षण विधेयकावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांनी सांगितलं की, हा एक अद्भुत विचार आहे, हे सर्व आपले माननीय पंतप्रधान मोदी आणि सरकार महिलांच्या प्रगतीसाठी असलेल्या विचारांमुळे आहे.

  • 19 Sep 2023 06:00 PM (IST)

    ओबीसींचा समावेश केल्याशिवाय हे महिला आरक्षण विधेयक अपूर्ण - उमा भारती

    भाजप नेत्या उमा भारती यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत आपलं मत व्यक्त करताना बोलल्या की, ओबीसींचा समावेश केल्याशिवाय हे विधेयक अपूर्ण राहील. दुसरीकडे, काँग्रेससह भारतीय आघाडीतील सर्व घटक पक्ष विधेयकात ओबीसी आरक्षणाची मागणी करत आहेत.

  • 19 Sep 2023 05:00 PM (IST)

    SP News : ओबीसी महिलांना आरक्षण देणार नाहीत

    संसदेत यापूर्वी पण महिला आरक्षण बिल सादर करण्यात आले आहे. राज्यसभेत तर हे बिल यापूर्वी मंजूर करण्यात आले आहे. हे बिल आता आणण्यात आले आहे. पण ते 2029 पूर्वी लागू होणार नाही. आम्ही या बिलाचं समर्थन करत आहोत. सदस्य दोन्ही सभागृहात जे बहुमत आहे तो, ओबीसीविरोधी आहे. हे ओबीसी महिलांना आरक्षण देणार नाहीत, असे समाजावादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांनी सांगितले.

  • 19 Sep 2023 04:35 PM (IST)

    Isha Gupta : तर ईशा गुप्ता राजकारणात

    नवीन ससंद भवनात पहिले अधिवेशनाचा आज श्रीगणेशा झाला. पहिल्याच दिवशी महिला आरक्षण केंद्र सरकारने दोन्ही सभागृहात सादर केले. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता पण उपस्थित होती. लहानपणापासूनच राजकारणात यायचे होते. जर हे बिल मंजूर झाले तर 2026 मध्ये आपण पण राजकारणात असू असे संकेत तिने दिले.

  • 19 Sep 2023 04:02 PM (IST)

    Rajya Sabha News : राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत केले स्थगित

    महिला आरक्षणाचे बिल देशाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. नवीन संसद भवनात लोकसभा आणि राज्यसभेत हे बिल सादर करण्यात आले. या बिलावरील चर्चेदरम्यान काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. गदरोळ वाढल्याने राज्यसभेचे कामकाज बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आले. उद्या 11 वाजता कामकाजाला सुरुवात होईल.

  • 19 Sep 2023 03:48 PM (IST)

    लालबाग राजाच्या दरबारात आज पहिल्या दिवशीच भक्तांची मोठी रांग

    मुंबई | लालबाग राजाच्या दरबारात आज पहिल्या दिवशीच भक्तांची मोठी रांग बघायला मिळत आहे. हजारोंच्या संख्येनं भाविक पहिल्या दिवशी लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी लालबाग मध्ये दाखल झाले आहेत. अनेकांचे नवस पूर्ण झाल्यानं नवसाची रांगही वाढतेय. लालबाग राजाच्या मैदानात उभारण्सात आलेल्या मंडपात भक्तांची मोठी रांग बघायला मिळत आहे. मंडळाकडून भक्तांसाठी पाणी, पंखे आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आलीय.

  • 19 Sep 2023 03:45 PM (IST)

    Rohit Pawar | रोहित पवार यांच्याकडून महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत

    मुंबई | रोहित पवार यांच्याकडून महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत करण्यात आलंय. रोहित पवार यांनी ट्विटरवर पोस्ट टाकत भूमिका मांडलीय. यावेळी त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचं कौतुक केलंय. "१९९३ मध्ये आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात देशातील पहिलं महिला धोरण आणलं, देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात महिला आयोगाची स्थापना केली (नंतर देशातही महिला आयोगाची स्थापना झाली), स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन ते ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आणि संरक्षणमंत्री असताना सैन्यदलात ११ टक्के आरक्षण देऊन सैन्याची दारंही महिलांसाठी उघडी केली", असं रोहित पवार म्हणाले.

    "लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण देण्याचं बहुप्रतिक्षित विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने संसदेत सादर केल्याने आदरणीय पवार साहेबांनी आणि काँग्रेसने महिलांबाबत यापूर्वीच घेतलेल्या वर नमूद केलेल्या निर्णयांची आठवण झाली", असं रोहित पवार म्हणाले.

    "हे सर्वस्वी महाराष्ट्राचं यश आहे. म्हणूनच संतांचा आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार जपणारा आणि देशाला दिशा देणारा हा स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि याचा प्रचंड अभिमान वाटतो", अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली.

  • 19 Sep 2023 02:31 PM (IST)

    महिला आरक्षण विधेयकावर उद्या लोकसभेत चर्चा

    महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं असून त्यावर उद्या लोकसभेत चर्चा होणार आहे. हे विधेयक जर मंजूर झालं तर लोकसभेत महिलांसाठी 181 जागा आरक्षित असतील.

  • 19 Sep 2023 02:23 PM (IST)

    महिला आरक्षण विधेयकाचा कालावधी 15 वर्षांचा- मेघवाल

    महिला आरक्षण विधेयकाअंतर्गत लोकसभेत महिलांसाठी 181 जागा आरक्षित असतील. महिला आरक्षण विधेयकाचा कालावधी 15 वर्षांचा असेल. 15 वर्षांनंतर संसद त्यावर पुनर्विचार करणार असल्याची माहिती कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.

  • 19 Sep 2023 02:17 PM (IST)

    लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर

    लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर करण्यात आलं आहे. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक सादर केलं आहे.

  • 19 Sep 2023 02:09 PM (IST)

    काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यानंतर भाजप खासदारांकडून गोंधळ

    काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यानंतर भाजप खासदारांकडून गोंधळ घालण्यात आला. अधीर रंजन चौधरी यांनी दोन गोष्टी तथ्यात्मक चुकांसह मांडल्या, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

  • 19 Sep 2023 02:05 PM (IST)

    या संसदेत स्पीकर पण डेप्युटी स्पीकर का नाहीत?- अधीर रंजन चौधरी

    या संसदेत स्पीकर आहेत, पण डेप्युटी स्पीकर का नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसदेत केला.

  • 19 Sep 2023 01:59 PM (IST)

    PM Modi | नव्या संसदेतील संगोलला नेहरुंचा स्पर्श- मोदी

    आज आपण नव्या संसदेत आहोत, इथे सर्व नव्या सोयीसुविधा आहेत. मात्र या नव्या संसदेतही आपण जुना वारसा कायम ठेवला आहे. नव्या संसदेतील सेंगोलला नेहरुंचा स्पर्श झाला होता. संसदेतील सेंगोल आज आपल्या सर्वांना प्रेरणा देतोय- मोदी

  • 19 Sep 2023 01:54 PM (IST)

    PM Modi | संसदेच्या सर्व सदस्यांना, देशवासियांना माझ्याकडून मिच्छामी दुक्कडम- मोदी

    आज मिच्छामी दुक्कडम म्हणायचा दिवस आहे. हे पर्व म्हणजे कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी माफी मागण्याचं पर्व आहे. माझ्याकडूनही संपूर्ण विनम्रतेने, मनापासून मी संसदेच्या सर्व सदस्यांना आणि देशवासियांना- मिच्छामी दुक्कडम. आज आपण नवीन सुरुवात करतोय. त्यामुळे भूतकाळातल्या सर्व कटुतेला विसरून पुढे जावं लागेल- मोदी

  • 19 Sep 2023 01:48 PM (IST)

    अनेक वर्षांपासून महिला आरक्षणासंदर्भात खूप चर्चा आणि वादविवाद- मोदी

    मी अत्यंत विश्वासाने आणि गर्वाने हे सांगतोय की आजच्या या दिवसाची गणेश चतुर्थीनिमित्त देवाचा आशीर्वाद घेत इतिहासात नोंद केली जाईल. आपल्या सर्वांसाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे. अनेक वर्षांपासून महिला आरक्षणासंदर्भात खूप चर्चा आणि वादविवाद झाले. संसदेत याआधीही काही प्रयत्न झाले- नरेंद्र मोदी

  • 19 Sep 2023 01:46 PM (IST)

    योजनांचा सर्वाधिक लाभ महिलांनी घेतला- मोदी

    मुद्रा योजनेचा सर्वाधिक लाभ देशातील महिलांनी घेतला. संपूर्ण देशात महिला उद्योजकांचं वातावरण दिसून आलं. पीएम आवास योजनेअंतर्गत अधिकाधिक नोंदणी महिलांच्या नावाने झाली, असं वक्तव्य मोदींनी केलं आहे.

  • 19 Sep 2023 01:42 PM (IST)

    PM Modi | सर्व खासदारांचा व्यवहार योग्य हवा

    "संसदेतील सर्व खासदारांचा व्यवहार योग्य असायला पाहिजे. खासदारांच्या व्यवहारावरुन कळेल कोण संसदेत बसणार आणि कोण विरोधात" असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 19 Sep 2023 01:38 PM (IST)

    PM Modi | नव्या संकल्पासह देश नवीन संसद भवनात दाखल

    "नव्या संसद भवनात नव्या विचारांवर चर्चा करु. नव्या संकल्पासह देश नवीन संसद भवनात दाखल झालाय. संसद भवन बदललय, भाव आणि भावनाही बदललं पाहिजे" - नरेंद्र मोदी

  • 19 Sep 2023 01:36 PM (IST)

    PM Modi | आज आपण नवीन सुरुवात करतोय - मोदी

    "आज आपण नवीन सुरुवात करतोय. 30 हजार कामगारांनी मेहनत घेऊन हे संसद भवन उभारलय" - नरेंद्र मोदी

  • 19 Sep 2023 12:00 PM (IST)

    Parliament Special Session 2023 | याच सभागृहात मुस्लिम समजातील महिलांना न्याय मिळाला- पंतप्रधान

    सेंट्रल हॉल अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार! लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाने मिळून 4 हजार कायदे तयार केले. देशातील अनेक महत्त्वाचे कायदे याच भवनातून लागू झाले. याच सभागृहात मुस्लिम समजातील महिलांना न्याय मिळाला. तीन तलाक विरोधी कायदा इथे तयार झाला. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • 19 Sep 2023 11:51 AM (IST)

    Parliament Special Session 2023 | गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा! - पंतप्रधान मोदी

    जुन्या संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदींच शेवटच भाषण, "गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा! नवीन इमारतीत नवीन संकल्प करण्यासाठी जात आहोत, नवीन आशा घेवून आपण जात आहोत". सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन.

  • 19 Sep 2023 11:40 AM (IST)

    Parliament Special Session 2023 | महिला आरक्षण विधेयक आजच लोकसभेत मांडणार

    महिला आरक्षण विधेयक आजच लोकसभेत मांडले जाणार आहे. काल केंद्रीय मंडळाची आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी मिळालीये. 1.30 वाजता महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडल जाणार आहे. महिला आरक्षण विधेयकावर आज नवीन संसदेत चर्चा होणार.

  • 19 Sep 2023 11:31 AM (IST)

    Parliament Special Session 2023 | अर्जुन मेघवाल किंवा स्मृती इराणी महिला आरक्षण विधेयक मांडण्याची शक्यता

    1 वाजता संसदेच्या नवीन भवनात सत्राला सुरुवात होणार. 1.30 वाजता महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडल जाणार आहे. महिला आरक्षण विधेयकावर आज नवीन संसदेत चर्चा होणार. अर्जुन मेघवाल किंवा स्मृती इराणी विधेयक मांडण्याची शक्यता.

  • 19 Sep 2023 11:21 AM (IST)

    Parliament Special Session 2023 | काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना स्टेजवर स्थान

    जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शेवटचा कार्यक्रम. 12 नंतर नवीन संसदेत भरणार सत्र. जुन्या सेंट्रल हॉलमध्ये सगळे खासदार एकत्रित आले. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना स्टेजवर स्थान देण्यात आलं.

  • 19 Sep 2023 11:13 AM (IST)

    Parliament Special Session 2023 | सेंट्रल हालमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन

    पंतप्रधान मोदी आज सर्व खासदारांसह आज नवीन संसद भवनात जाणार. जुन्या संसद भवनाला आज निरोप. जुन्या संसद भावनाचा आज शेवटचा दिवस. जुनं संसद भवन ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार! सेंट्रल हालमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन.

  • 19 Sep 2023 10:48 AM (IST)

    गोपीचंद पडळकरांविरोधात अजित पवार गटाचं आंदोलन

    गोपीचंद पडळकरांविरोधात अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोलापूरमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांतर्फे आंदोलन करण्यात येत आहे.

    गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांविरोधात केलेल्या वक्तव्याचा कार्यकर्त्यांतर्फे निषेध करण्यात येत आहे.

  • 19 Sep 2023 10:39 AM (IST)

    Ganesh Chaturthi 2023 | मानाचा गणपती असणाऱ्या नागपूरच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना

    नागपूरातील मानाचा गणपती असलेल्या नागपूरच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. नागपूरच्या राजाचं यंदाचं २७ वं वर्ष आहे.

    गणेशोत्सवाच्या १० दिवसांत लाखो भाविक नागपूरच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. आज दुपारनंतर नागपूरच्या राजाला सुवर्ण अलंकार चढवले जाणार आहेत.

  • 19 Sep 2023 10:28 AM (IST)

    Ganesh Chaturthi 2023 | राज ठाकरेंच्या घरी झाले गणरायाचे आगमन

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आहे. अमित ठाकरे यांच्या हस्ते घरी बाप्पा विराजमान झाले.

  • 19 Sep 2023 10:21 AM (IST)

    कुणबी ओबीसी कृती समितीचं आंदोलन मागे

    कुणबी ओबीसी कृती समितीने नागपूरमधील ओबीसी आंदोलन आता मागे घेतलं आहे. ओबीसी आंदोलन आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून करण्यात येणार आहे.

    मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये यासाठी आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ आता राज्यभर आंदोलन सुरू ठेवणार आहे.

  • 19 Sep 2023 10:13 AM (IST)

    आजपासून नव्या संसद भवनात विशेष अधिवेशन

    आजपासून नव्या संसद भवनात विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. फोटोसेशन नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व खासदार नव्या संसद भवनात पायी चालत जाणार आहेत.

  • 19 Sep 2023 10:06 AM (IST)

    Ganesh Chaturthi 2023 | सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

    आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस असून यानिमित्त प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. दुपारनंतर गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • 19 Sep 2023 09:30 AM (IST)

    LIVE UPDATE | महिला आरक्षणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ?

    महिला आरक्षणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष अधिवेशनातच महिला आरक्षण विधेयक मांडले जाणार आहे. महिला आरक्षण विधेयकावर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 19 Sep 2023 09:19 AM (IST)

    LIVE UPDATE | संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

    नवी दिल्ली | संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. थोड्याच वेळात जुन्या संसदेच्या इमारती जवळ फोटोसेशन होणार आहे. लोकसभेतील आणि राज्यसभेतील सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्र्यांचे आणि खासदारांचे फोटोसेशन होणार आहे.

  • 19 Sep 2023 08:59 AM (IST)

    Ganesh Chaturthi 2023 | कोकणात पारंपरिक पद्धतीने गणरायाचे आगमन

    कोकणात पारंपरिक पद्धतीने गणरायाचं आगमन झाले आहे. रत्नागिरीत 1 लाख 66 हजार घरगुती गणपतीची आज प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तसेच 126 सार्वजनिक गणेशोत्सवांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. ढोल ताशांच्या गजरात गणरायांचं आगमन होत आहे.

  • 19 Sep 2023 08:50 AM (IST)

    Ganesh Chaturthi 2023 | पुण्यातील कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

    पुण्यातील मानाच्या पहिला कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पारंपारिक रित्या चांदीच्या पालखीतून बाप्पांची मिरवणूक निघाली आहे. मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक जमले आहे.

  • 19 Sep 2023 08:39 AM (IST)

    Ganesh Chaturthi 2023 | भाऊ रंगारी गणपती ट्रस्टची मिरवणूक

    भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात 9 वाजता सुरु होणार आहे. 11:50 वाजता श्री च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. यावर्षी मंडळाचे 132 वे वर्ष आहे.

  • 19 Sep 2023 08:24 AM (IST)

    Ganesh Chaturthi 2023 | अमरावतीत पहिले गणपती संग्रहालय

    अमरावतीच्या चिखलदरामध्ये देश, विदेशातील सहा हजारापेक्षा अधिक गणेश मूर्ती असणारे देशातील पाहिले गणपती संग्रहालय साकारले आहे. जगातील बँकॉक, इंडोनेशिया, बाली, चीन, अफगाणिस्तान, सिंगापूरसह भारतातील अनेक ठिकाणाचे गणपती या संग्रहालयात आहे.

  • 19 Sep 2023 08:11 AM (IST)

    Ganesh Chaturthi 2023 | पुणे कसबा गणपतीची मिरवणूक थोड्याच वेळात

    पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती आणि पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीच्या मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. पारंपारिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक काढत पुण्याचा मानाचा पहिला गणपती विराजमान होणार आहे.

  • 19 Sep 2023 07:57 AM (IST)

    Ganesh Chaturthi 2023 | नाशिक जिल्ह्यातील 906 गावांमध्ये एकच गणपती

    नाशिक जिल्ह्यातील 906 गावांमध्ये एकच गणपती बाप्पा होणार विराजमान. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 'एक गाव, एक गणपती' बसवण्याचा निर्णय. नाशिक ग्रामीण भागात देखील राहणार अतिरिक्त पोलिस बंदोबस्त. अतिरिक्त 2 उपअधीक्षक, 10 निरीक्षक, 25 उपनिरीक्षक, 350 अंमलदाराची मागणी करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांसह 1500 पुरुष आणि 500 महिला होमगार्डची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.

  • 19 Sep 2023 07:42 AM (IST)

    Ganesh Chaturthi 2023 | गणेशोत्सवासाठी पुण्यात किती हजार पोलीस तैनात?

    गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज आहेत. शहरभरात पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरात 7 हजार पोलीस कर्मचारी तैनात आहेत. पुणे पोलिसांनी संभाव्य दहशतवादी हल्ले आणि अनपेक्षित घटना लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी 1,800 सीसीटीव्ही कॅमेर बसवण्यात आले आहेत.

  • 19 Sep 2023 07:40 AM (IST)

    lalbaugcha raja 2023 | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

    आज गणेशचतुर्थी आहे. गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. काल रात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.

  • 19 Sep 2023 07:32 AM (IST)

    Ganesh Chaturthi 2023 | दगडूशेठ हलवाई गणपतीची किती वाजता प्राणप्रतिष्ठापना ?

    पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी 10:23 प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. दगडूशेठ गणपतीची मुख्य मंदिरापासून 8:30 वाजता निघणार मिरवणूक. हनुमान रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Published On - Sep 19,2023 7:28 AM

Follow us
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.