अमेरिकन डॉलरला कोणापासून सर्वात मोठा धोका ? डोनाल्ड ट्रम्प यांना कोणाची सतावतेय भीती

डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्सला अमेरिकेच्या डॉलरवरील 'हल्ला' असे ठरवत दावा केला की त्यांनी त्या देशांना टॅरिफ लावण्याची धमकी दिली, जे ब्रिक्समध्ये सामील होऊ इच्छीत होते. त्यानंतर त्यांना माघार घेतली.

अमेरिकन डॉलरला कोणापासून सर्वात मोठा धोका ? डोनाल्ड ट्रम्प यांना कोणाची सतावतेय भीती
Trump on US Currency
| Updated on: Oct 15, 2025 | 5:03 PM

जगभरातील देशांवर टॅरिफ लावून खळबळ माजवणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता डॉलरची चिंता सतावत आहे. जागतिक महाशक्ती असलेल्या अमेरिकेच्या या सुप्रीमोंना वाटत आहे की डॉलर विरोधात मोठा कट रचला जात आहे. यासाठी त्यांनी ब्रिक्स देशांना जबाबदार ठरवले आहे.ट्रम्प यांनी ब्रिक्सची अमेरिकन डॉलरवरील हल्ला अशी निर्भत्सना करताना त्यांनी दावा केला की आपण त्या देशांना टॅरिफ लावण्याची धमकी दिली जे ब्रिक्समध्ये सामील होऊ इच्छीत आहेत. अर्थात नंतर त्यांनी हे वक्तव्य मागे घेतले.

डॉलरला कोणाचा धोका ?

ब्रिक्स समुहात ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रीका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात ( युएई ) सामील आहेत. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की हा समुह अमेरिका -विरोधी धोरण राबवत आहे. त्यामुळे ते या देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचे धमकावत आले आहेत. दुसरीकडे ब्रिक्स देशांनी ट्रम्पद्वारा मनमानी पद्धतीने लावल्या जात असलेल्या टॅरिफ संदर्भातही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.कारण यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे.

अर्जेंटीनाचे राष्ट्राध्यक्ष झेवियर माईली यांच्या सोबत द्विपक्षीय बैठकीत ट्रम्प यांनी सांगितले की डॉलर संदर्भात त्यांची भूमिका कठोर आहे.आणि जो कोणीही डॉलरमध्ये देवाण-घेवाण करु इच्छीत आहे,त्यांना त्या लोकांच्या तुलनेत लाभ मिळेल जे करु इच्छीत नाहीत.

का घाबरत आहे डोनाल्ड ट्रम्प ?

ट्रम्प यांनी सांगितले की, “मी त्या सर्व देशांना म्हटले जे ब्रिक्समध्ये सामील होऊ इच्छीत आहेत…ठीक आहे, परंतू आम्ही तुमच्या देशांवर टॅरिफ लावणार, तेव्हा सर्वजण मागे हटले. ब्रिक्स, डॉलरवरील हल्ला आहे.” ते पुढे म्हणाले की जर कोणता देश ब्रिक्समध्ये सामील होऊ इच्छीत असेल, तर मी अमेरिकेत येणाऱ्या त्याच्या सर्व उत्पादनांवर शुल्क लावणार”

ब्रिक्स देशांनी गेल्या महिन्यात आपल्या निवेदनात म्हटले होते की टॅरिफमध्ये या प्रकारे ‘अंधाधुंद वृद्धी’ जागतिक व्यापाराला बाधित करु शकते. आणि हे व्यापार-प्रतिबंधात्मक धोरणांना प्रोत्साहन देत आहे. ट्रम्प प्रशासनाने या वर्षी अनेक देशांवर उच्च शुल्क लावले आहेत.

भारतावरही परिणाम

अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर २५ टक्के बेस टॅरिफच्या शिवाय, रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी केल्याने अतिरिक्त २५ टक्के शुल्क देखील लावले आहे. अशाप्रकारे भारतीय निर्यातीवर एकूण ५० टक्के अमेरिकन टॅरिफ लागू आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.