
आपला शेजारील पाकिस्तान हा सतत अस्थैर्य आणि राजकीय तसेच उलथापालथी होणारा देश आहे. या देशात टोकाची गरीबी असली तरी श्रीमंत लोकही आहेत. या श्रीमंताचे थाट विकसित देशातील श्रीमंताहून कमी नाहीत. तर या कंगाल पाकिस्तानात सर्वात महागडी कार कोणाकडे आहे हे कळाले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहाणार नाही. पाकिस्तानच्या एक्साईज विभागात एवढी महाग कार कधी रजिस्टर झाली नाही.त्यामुळे ही पाकिस्तानची सर्वात महागडी कार म्हटली जाते. चला तर पाहूयात याची किंमत किती आहे आणि कोणाकडे आहे की कार ?
पाकिस्तानात आतापर्यंतची सर्वात महागडी कार याच वर्षी येथील पंजाब प्रांताच्या एक्साईज एण्ड टॅक्सेशन डिपार्टमेंटमध्ये रजिस्टर्ड झाली आहे. याआधी पाकिस्तानची सर्वात महागडी कार होती ती देखील तेथील पंजाब प्रांतात रजिस्टर्ड झाली होती.
पाकिस्तानात एका लक्झरी कारने सर्वात जास्त किंमतीच्या बाबतीत नवा रेकॉर्ड स्थापन केला आहे.याआधी २०२० मध्ये पाकिस्तानच्या पंजाबमध्येच सर्वात महागड्या कारचे रजिस्ट्रेशन झाले होते. तिची किंमत ११.५ कोटी पाकिस्तानी रुपये होती.
ही कार लेम्बोर्गिनी हुराकॅन स्पायडर होती. पाकिस्तानच्या एआरवाय न्यूजच्या मते या कारला सैयद अर्जुमंद बुखारी याच्या नावावर रजिस्टर्ड केले होते. ज्याने त्याच्या मुलाला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी यास इम्पोर्ट केले होते. पाकिस्तानच्या सर्वात महागड्या कारचा हा रेकॉर्ड आता तुटला आहे. साल २०२५ मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातीलच एका व्यापाऱ्याने सर्वात महागड्या कारचे रजिस्ट्रेशन केले आहे.
Range Rover
पाकिस्तानी न्यूज आऊटलेट न्यूज अलर्टच्या बातमीनुसार आता जी सर्वात महागडी कार पाकिस्तानात मागविली आहे. त्याचे रजिस्ट्रेशन शुल्कच केवळ ९.४४ कोटी पाकिस्तानी रुपये आहे. तसेच कारची पाकिस्तानी रुपयातील एकूण किंमत सुमारे १७६ दशलक्ष आहे. पाकिस्तानात याची किंमत सुमारे १६ कोटी पाकिस्तानी रुपये आहे.
भारतीय रुपयात याची किंमत ५ कोटी २० लाख रुपये होते.
ही आलिशान लक्झरी कार रेंज रोव्हर आहे. या कारला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरांवालाचे व्यावसायिक अहमद वकास यांनी खरेदी केली आहे. या कारच्या मालकाला जो नंबर मिळाला आहे त्याची पहिले तीन अक्षरं कारच्या मालकाचे नाव दर्शवत आहे. यासाठी स्वतंत्र रजिस्ट्रेशन करावे लागते.