कोरोनाचा उगम नेमका कुठं? तपासासाठी WHO ची थेट चीनमध्ये धडक

| Updated on: Dec 16, 2020 | 7:14 PM

जागतिक आरोग्य संघटना (WHO) जानेवारी (2021) महिन्यात चीनमधील वुहान शहरात जाणार आहे. (WHO China Wuhan Corona)

कोरोनाचा उगम नेमका कुठं? तपासासाठी WHO ची थेट चीनमध्ये धडक
Follow us on

नवी दिल्ली : संपूर्ण विश्वाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूच्या उगमाचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) जानेवारी (2021) महिन्यात चीनमध्ये जाणार आहे. या भेटीत व्हायरची उत्पत्ती कशी झाली?, त्याचा प्रसार कसा झाला?, व्हायरसचे उगमस्थान कोणते?, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आरोग्य संघटनेकडून केला जाणार आहे. तशी घोषणा जागितक आरोग्य संघटनेने केली आहे. (WHO will visit to China Wuhan for investigating the origin of Corona virus)

जगतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते हेडिन हॅल्डर्सन (Hedinn Halldorsson) यांनी याबाबत माहिती दिली आहे. “कोरोना व्हायरसचे उगमस्थान कोणते आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनमधील वुहानमध्ये जाईल. येत्या जानेवारी महिन्यात या मोहिमेस सुरुवात होईल,” असे हॅल्डर्सन यांनी सांगितले. तसेच, या पथकात साथरोग विशेषज्ञ आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले. जगातील अनेक संशोधक आणि तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या उगमाचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाचा उगम चीनमध्ये नाहीच

कोरोनाचा उगम वुहान या शहरातून झाला नसल्याचे दावा चीनने यापूर्वी अनेकदा केलेला आहे. ताज्या माहितीनुसार जर्मन येथील जीवशास्त्रज्ञाच्या दाव्याचा आधार घेत चिनी माध्यमांनीही कोरोनाचा उगम चीनमध्ये झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. तसेच, वुहान शहरात कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाल्याचा दावा हा निव्वळ प्रोपोगंडा असल्याचेही चिनी माध्यमांनी म्हटले आहे. (WHO will visit to China Wuhan for investigating the origin of Corona virus)

चीनने कोरोना संसर्गावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवलेले आहे. तेथील वुहानसह प्रमुख शहरांमध्ये जनजीवन पूर्वपदावर आलेलं आहे. दरम्यान, कोरोना उगमाचे जे दावे, किंवा शोध लावण्यात आलेले आहेत, ते सर्व फेटाळून चीन नव्या कथा रचत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाचा उगम हा चीनमधून नाही तर बांगलादेश, सौदी अरेबिया, इटली, भारत या देशात झाला असून आयात करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांद्वारे तो चीनमध्ये आल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

COVID-19 Research | अविवाहितांना कोरोनाचा धोका अधिक, रिसर्चमध्ये धक्कादायक दावा

अमेरिकेत आजपासून नागरिकांना मिळणार फायझर लस, पहिल्या फेरीत 30 लाख डोस

तुम्हाला अ‍ॅलर्जी आहे? तर मग कोरोना लसीवरची सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी!

(WHO will visit to China Wuhan for investigating the origin of Corona virus)