AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

COVID-19 Research | अविवाहितांना कोरोनाचा धोका अधिक, रिसर्चमध्ये धक्कादायक दावा

अविवाहित लोकांना कोरोना विषाणुची लागण होण्याची शक्यता जास्त असते, असा दावा करण्यात आला आहे.

COVID-19 Research | अविवाहितांना कोरोनाचा धोका अधिक, रिसर्चमध्ये धक्कादायक दावा
लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे 2021 चा कोरोना
| Updated on: Dec 16, 2020 | 11:04 AM
Share

मुंबई : जगभरात वर्षभरानंतरही कोरोना विषाणूचा (Corona Virus) कहर जारी आहे (Unmarried People Has High Risk Of Death). या महामारीच्या कारणांची माहिती मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे शोध, अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासात (Corona Research) कोरोना कुठल्या कारणांमुळे पसरतो आणि त्याचा शरीरावर कुठला परिणाम होतो याचे अनेक दावे पुढे आले आहेत (Unmarried People Has High Risk Of Death).

नुकत्याच एका अभ्यासानुसार, अविवाहित लोकांना कोरोना विषाणुची लागण होण्याची शक्यता जास्त असते, असा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर विवाहित लोकांच्या (Married People) तुलनेत अविवाहित लोकांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याची भीतीही मोठ्या प्रमाणात असते.

अविवाहित लोकांच्या लाईफस्टाईलमुळे त्यांना कोरोना होण्याची भीती अधिक असते. कारण, अविवाहित लोकांमध्ये रोग प्रतीकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. रोगप्रतीकारक शक्ती कमकुवत असल्याने अविवाहित लोकांना व्हायरल इन्फेक्शनही लवकर होते, असंही अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

लोकांना लग्न का नाही करायचं आहे?

आजारी असल्याने अविवाहित लोकांच्या मानसिकतेवरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्यांचा रिलेशनशीप किंवा लग्नात इन्टरेस्ट कमी होतो, असंही या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

स्वीडनच्या विद्यापिठात ऑफ स्टॉकहोममध्ये कोरोना संसर्ग झालेल्या लोकांमध्ये आर्थिक, मानसिक आणि शारिरीक परिस्थितींमुळे त्यांच्या लाईफस्टाईलवर काय परिणाम होतो, यावर संशोधन केलं जात आहे.

संशोधकांच्या मते, विवाहित लोकांच्या तुलनेत अविवाहित लोकांमध्ये कोरोनाचा धोका अधिक असतो. शिक्षणाची कमतरता आणि आर्थिक अडचणींमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ते एकटे पडतात.

या अभ्यासामुळे भारतावर काहीही परिणाम होणार नाही. कारण, भारतात जरी शिक्षणाची कमतरता आणि आर्थिक अडचण असणारी लोकं असली, तरी कुटुंब परंपरेमुळे ते कुटुंबातील सदस्यांसोबत जोडलेले आहेत.

Unmarried People Has High Risk Of Death

संबंधित बातम्या :

कोरोनातून बरे झाल्यानंतरही नव्याच आजाराचं संकट; जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार?

कोरोना लसनिर्मिती ते लसीकरण, जाणून घ्या 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

PHOTO | कोरोना, कर्करोगापेक्षाही कैकपट भयंकर ‘हे’ आजार, दरवर्षी घेतात तब्बल 90 लाख लोकांचा बळी!

कोरोना लस घेतल्यानंतर त्रास होतो ? वाचा पाच संभाव्य साईड ईफेक्ट्स

कोरोनापासून मुक्तीसाठी केवळ लस एकमेव पर्याय आहे का?; वाचा तज्ज्ञांना काय वाटतं?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.