PHOTO | कोरोना, कर्करोगापेक्षाही कैकपट भयंकर ‘हे’ आजार, दरवर्षी घेतात तब्बल 90 लाख लोकांचा बळी!

जगात कोरोना व्हायरसमुळे 15 लाखांहून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. मात्र, अजूनही असे बरेच रोग आहेत जे अत्यंत धोकादायक आहेत.

1/6
जगात कोरोना व्हायरसमुळे 15 लाखांहून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. मात्र, अजूनही असे बरेच रोग आहेत जे अत्यंत धोकादायक आहेत.
2/6
जगातील सर्वाधिक मृत्यूचे पाचव्या सर्वात मोठ्या कारणामध्ये नवजात बालकांना होणाऱ्या रोगांचा समावेश आहे. यामुळे 2019मध्ये तब्बल 32 बळी गेले आहेत. या आजारांमध्ये रक्त कमी होणे, श्वास घेण्यात अडचणी, छातीची फिजिओथेरपी, हृदय रोग यासारख्या प्रमुख समस्या समाविष्ट आहेत.
3/6
मृत्यूचे सर्वात मोठे चौथे कारण म्हणजे श्वसन रोग. 2019मध्ये श्वसनासंबंधित आजारांमुळे 31 लाख लोकांनी आपला जीव गमावला. तर, 2000मध्ये 26 लाख लोक मरण पावले होते.
4/6
मृत्यूच्या पाच सर्वात मोठ्या कारणांमध्ये फुफ्फुसाचा आजार तिसऱ्या क्रमांकावर आहे. या आजारामुळे 2019मध्ये 30 लाख लोकांचा मृत्यू झाला. तर, सन 2000मध्ये 32 लाख लोकांनी आपला जीव गमावला.
5/6
या यादीतील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण स्ट्रोक आहे. यामुळे 2019 मध्ये 55 लाख लोक मरण पावले. तर 2000मध्ये तब्बल 62 लाख लोकांनी आपला जीव गमावला.
6/6
डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, इस्केमिक हृदयरोग हा मृत्यूचे जगभरात सर्वात मोठे कारण आहे. 2019मध्ये या आजारामुळे 89 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 2000 मध्ये 68 लाख लोक मरण पावले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI