AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनापासून मुक्तीसाठी केवळ लस एकमेव पर्याय आहे का?; वाचा तज्ज्ञांना काय वाटतं?

कोरोनामुळे संकटात सापडलेलं संपूर्ण जग त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोरोना लसीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. (is vaccine the only option to get rid of coronavirus know what experts say)

कोरोनापासून मुक्तीसाठी केवळ लस एकमेव पर्याय आहे का?; वाचा तज्ज्ञांना काय वाटतं?
कोरोना लस प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Dec 14, 2020 | 2:59 PM
Share

नवी दिल्ली: कोरोनामुळे संकटात सापडलेलं संपूर्ण जग त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोरोना लसीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. फायझर-बायोटेकच्या लसीमुळे कोरोनावर मात करता येईल, असं सर्वांनाच वाटत आहे. ब्रिटनमध्ये तर लसीकरणही सुरू झालं असून त्याचे साईड इफेक्ट्सही दिसून आले आहेत. दुसरीकडे भारतातही तीन कंपन्यांनी लसीकरणासाठी मंजुरी मागितली आहे. मात्र, कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी लस हा एकमेव पर्याय आहे का? हा प्रश्न अजूनही तसाच आहे. तज्ज्ञांना त्याबाबत काय वाटतं? त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप. (is vaccine the only option to get rid of coronavirus know what experts say)

लस शिवाय काहीच पर्याय नाही

कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी सध्या तरी संपूर्ण जग कोरोना लसीची वाट पाहत आहे. या लसी शिवाय ही महामारी दूर करण्यासाठी आणखी काही उपाय आहे का? यावर नवी दिल्लीच्या जी. बी. पंत रुग्णालयाचे डॉक्टर संजय पांडेय यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. कोणतीही लस तयार करण्यापूर्वी तीन गोष्टी पाहिल्या जातात. एक म्हणजे ती लस सुरक्षित आहे का? दुसरं म्हणजे लस किती परिणामकारक आहे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे लसीचा दीर्घकालीन परिणाम काय असतो? या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचं डॉ. पांडेय सांगतात.

सध्या जेवढ्याही लसींना मान्यता देण्यात आली आहे. त्या सुरुवातीच्या दोन कसोटींवर उतरल्या आहेत. मात्र, कोरोना हा एक वर्ष जुना व्हायरस आहे. त्यामुळे या लसींचे त्याबाबतचे दीर्घकालीन काय परिणाम आहेत हे अजून समजलेले नाहीत. त्यासाठी अनेक वर्षे डेटा एकत्र केला जातो. कारण आता कोरोना व्हॅक्सीनची अधिक वाट पाहणं शक्य नाही. त्यामुळेच तातडीने या व्हॅक्सीनला मंजुरी दिली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

प्रत्येक व्हायरल आजारात मानसिक गुंतागुंत

या महामारीच्या काळात अनेक लोक मानसिक आजाराचे शिकार झाले आहेत. हा कोरोनाचा साईड इफेक्ट आहे का? असा सवाल डॉ. संजय पांडेय यांना करण्यात आला. त्यावर कोरोनाचा मानसिकतेवर परिणाम होतो, हे संशोधनातून पुढे आलं आहे. पण केवळ सुरुवातीलाच हा परिणाम होतो. संसर्ग झाल्यानंतर सुंघण्याची आणि चव घेण्याची क्षमता कमी होते. मानसिक परिणामामुळे असं होतं. केवळ कोरोना झाल्यानेच नाही तर कोणत्याही व्हायरल आजारामुळे मानसिकतेवर परिणाम होत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. पण त्यामुळे लोक निष्काळजीपणे वागत असल्याचं दिसून येत आहे. त्याचे भविष्यात मोठे परिणाम पाहायला मिळू शकतात. थंडीच्या काळात अनेक दिशात कोरोनाचा प्रकोप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. (is vaccine the only option to get rid of coronavirus know what experts say)

संबंधित बातम्या:

‘कोरोना’तून बरे झाल्यावर रुग्णांमध्ये हृदयासंबंधित समस्यांमध्ये वाढ, पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…

तुम्हाला अ‍ॅलर्जी आहे? तर मग कोरोना लसीवरची सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त; 14 दिवसात एकही रुग्ण आढळला नाही

(is vaccine the only option to get rid of coronavirus know what experts say)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.