
अमेरिकेत ऑटीझमने पीडित मुलांची संख्या लागोपाठ वाढत आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत ८ ते ३१ वर्षांच्या वयोगटातील मुलांपैकी दर ३१ मुलांपैकी एक मुलगा ऑटीझम स्पेक्ट्रम डिसऑडर (ASD)ने त्रस्त आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. भारताचा विचार करता, इंडियन ऑटीझम सेंटरच्यानुसार येथे भारतात दर ६८ मुलांपैकी एका मुलात हा आजार असतो. आकड्यांची तुलना करता भारताच्या तुलनेत अमेरिकेत हा आजार मोठ्या प्रमाणावर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या आजारास पॅरासिटामॉल जबाबदार असते असा दावा केला होता. त्यामुळे डॉक्टरांचे म्हणणे काय ?
दिल्ली सरकारच्या मानव व्यवहार आणि संबंधित विज्ञान संस्थेत (IHBAS) मनोरोग विभागाचे प्रोफेसर डॉ. ओमप्रकाश सांगतात की ऑटीझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) एक अशी स्थिती आहे ज्यात मुलाचा सामाजिक व्यवहार, भाषा आणि बोलण्याची क्षमता प्रभावित होते. ही समस्या असलेले मूल इतर सामान्य मुलासारखे बोलणे किंवा आपल्या भावना व्यक्त करु शकण्यात अपयशी ठरतात.
ऑटीझम का होतो. हे संपूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. परंतू डॉक्टरांच्या मते या आजाराचे अनेक कारणे असू शकतात. यात जेनेटिक बदल, कुटुंबात आधी होणारी प्रकरणे, प्रेग्नंसी दरम्यान होणारे संक्रमण, प्रदुषण आणि पोषणाची कमतरता आणि काही वेळा औषधांचा परिणाम हे जबाबदार असू शकतात.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासात आढळले की ज्या कुटुंबात आधीच ऑटीझमच्या केस आहेत. येथे याची जोखीम वाढते. याशिवाय मोठ्या वयाच्या पालकांकडून जन्मलेल्या मुलांना ऑटीझम होण्याची शक्यता थोडी अधिक असू शकते. त्यामुळे ही समस्या कोणा एकाच कारणाने होत नसून त्यास अनेक कारणे जबाबदार असू शकतात. चिंता करण्याची गोष्ट म्हणजे यावर कोणताही इलाज नाही. यास केवळ नियंत्रण केले जाऊ शकते.
डॉ ओम प्रकाश यांच्या मते अमेरिकेत भारताच्या तुलनेत ऑटीझमच्या केस जास्त आहेत. याचे मुख्य कारण तेथील चांगली हेल्थ केअर सिस्टीम आणि व्यापक तपासणी असू शकते. तेथे खूप लवकर मुले डेव्हलपमेंट चेकअपमधून जात असल्याने थोडीही लक्षणे वेगळी दिसली तरी डॉक्टर लगेच तपासणी करतात. तर भारतात ही लक्षणे ओळखण्यासाठी खूप उशीर होतो आणि कमी वयात निदानही खूपदा होत नाही.
दुसरी महत्वपूर्ण बाब म्हणजे लाईफस्टाईल आणि लोकसंख्ये संबंधी पॅटर्न आहे. पाश्चमात्य देशात सर्वसाधारणपणे मुलांची प्लानिंग उशीरा केली जाते. जास्त वयात प्रेग्नेंट राहिल्याने जेनेटिक म्युटेशनची शक्यता वाढते,ज्यामुळे ऑटीझमची जोखीम वाढते.
तिसरी बाब म्हणजे लोकांची समज आणि समाजाचे वागणे देखील आहे. अमेरिकेत ऑटीझमला मानसिक आजार वा कलंक म्हणून पाहिले जात नाही., उलट याला आरोग्याचा मुद्दा म्हणून स्वीकारले जाऊन इलाज आणि थेरेपी सुरु होते. भारतात कमी जागरुकता असल्याने समाजाच्या भयाने लोक या आजाराला लपवतात. त्यामुळे अमेरिकेत याची संख्या जास्त दिसते. आणि भारतातील प्रकरणे समोर येत नाही.कारण भारतात ही प्रकरणे कमी रिपोर्ट केली जातात.
अमेरिकेच्या अध्यक्षांनी पॅरासिटामॉल हे एक ऑटीझम होण्याचे कारण सांगितले असले तरी त्यांच्या या दाव्याला अमेरिकन आरोग्य संस्था आणि जगातील आरोग्य संघटनांनी फेटाळून लावले आहे.
नवी दिल्ली एम्समधील पीडियाट्रिक विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ.शेफाली गुलाटी यांनी सांगितले की असा कोणताही वैज्ञानिक पुरावा किंवा शोध यासंदर्भात लागलेला नाही की डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भवती महिलांकडून पॅरासिटामॉल खाल्ल्याने ऑटीझम होऊ शकतो.
त्या म्हणाल्या की ऑटीझम सामान्य आजार नाही.तो कुठल्या एका कारणाने होत नाही. अनुवंशिक कारणे ( गुणसूत्रांसंबंधी ) यात एपिजेनेटिक कारणांनी ( जीन्समध्ये असलेली माहिती शारीरिक कार्यांमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया ) देखील होऊ शकतो.
डॉ. गुलाटी यांच्या मते अनेक संशोधनात ऑटीझमचा पॅरासिटामॉलशी संबंध आढळला आहे, परंतू त्यातील कोणतेही संशोधन याचे प्रत्यक्ष कारण स्थापित करु शकलेला नाही.काही काळापूर्वी स्टॉकहोमच्या कॅरोलिंस्का इस्टिट्यूटने देखील संशोधन केले होते. त्यात आढळले की गर्भावस्थेत पॅरासिटामॉलचा वापर मुलात ऑटीझम, एडीएचडी ( अटेंशन डेफिसिट हायपर एक्टीव्हीटी डिसऑर्डर ) वा बौद्धीक अक्षमतेच्या जोखीमेशी जोडलेला आढळला त्यामुळे पॅरासिटामॉलने ऑटीझम होतो हे सांगता येणार नाही. या प्रकरणात आणखी संशोधन होणे गरजेचे आहे.
प्रेग्नंसीत कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय खाऊ नये. परंतू महिला थोडा ताप आला किंवा अंगदुखी झाली तरी पॅरासिटामॉल आणि क्रोसिन खातात. अशा प्रकारे मनाने औषधे खाऊ नये असे डॉ. शेफाली यांनी सांगितले.