China | भर सभेतून चिनी संरक्षण मंत्र्यांना खेचून बाहेर काढलं, जिनपिंग यांच्या जवळच्या मंत्र्याला एवढी वाईट वागणूक का?
China | चीनमध्ये काय चाललय? जिनपिंग यांच्या खुर्चीला धोका का? चीनी संरक्षण मंत्र्यांना भर सभेतून असं खेचून बाहेर का काढलं. अमेरिकेच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने हा मुद्दा उपस्थित केला आहे.

बिजींग : शेजारच्या चीनमध्ये सध्या सर्वकाही आलबेल नाहीय. वाढती बरोजगारी आणि आर्थिक संकटामुळे चिनी जनता त्रस्त आहे. त्याचवेळी सत्ताधारी पक्षामध्येही बऱ्याच घडामोडी घडत आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग आधीपासूनच बेपत्ता होते. आता चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू मागच्या दोन आठवड्यापासून गायब आहेत. अमेरिकेच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने गायब असलेल्या चीनच्या संरक्षण मंत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ली शांगफू यांना चीनच्या संरक्षण मंत्री पदावरुन हटवलं जाऊ शकतं. ली शांगफू मागच्या दोन आठवड्यांपासून कुठेही दिसलेले नाहीत तसेच ते त्यांच्या खात्याच्या बैठकांमध्येही सक्रीय नाहीयत. 29 ऑगस्टला ते शेवटचे दिसले होते. जापानमधील अमेरिकी राजदूत रेहम इमॅनुअल यांनी, ली यांच्या अनुपस्थितीवरुन टि्वट केलय. चीनमध्ये बेरोजगारी दर मोठा आहे. अनेक वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना बर्खास्त करण्यात आलय. त्यानंतर ली गायब झालेत.
ली शांगफू यांना संरक्षण मंत्री पदावरुन हटवण्यात आलय, असं अमेरिकी आणि चिनी सूत्रांच्या हवाल्याने ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने वृत्त दिलय. X वर पोस्ट करताना रेहम इमॅनुअल यांनी लिहिलय की, “आधी चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग बेपत्ता झाले. त्यानंतर संरक्षण मंत्री ली शांगफू बेपत्ता आहेत. बेरोजगारीची ही शर्यत कोणाला जिंकायची आहे?. चीनचे युवा की, जिनपिंग यांची कॅबिनेट?” गायब होण्याआधी चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू यांना बैठक सुरु असताना जबरदस्तीने खेचून बाहेर काढण्यात आलं होतं. व्हिएतनामच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक चालू होती. आरोग्याच्या कारणामुळे ली शांगफू यांना बैठकीतून नेण्यात आलं असं व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांना त्यावेळी सांगण्यात आलं होतं. व्हिएतनाममधील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने रॉयटर्सने हे वृत्त दिलय. त्यांनी अमेरिकेची नाराजी ओढवून घेतली
परराष्ट्र मंत्री किन गांग यांच्या बेपत्ता असण्याला आता तीन महिने होत आले आहेत. त्यांची अनुपस्थिती सुद्धा आरोग्याशी जोडली जात आहे. चीनमध्ये सुरु असलेल्या या घटनांना भ्रष्टाचार निर्मूलनाशी जोडलं जात आहे. संरक्षण खात्याली भ्रष्टाचारामुळे ली शांगफू यांना पदावरुन हटवण्यात आलय. ली शांगफू यांच वादाशी जुन नातं आहे. 2018 मध्ये त्यांना सैन्याच्या उपकरण आणि परचेस विभागाची जबाबदारी दिली होती. त्यावेळी त्यांनी रशियन लढाऊ विमान आणि शस्त्रांची खरेदी केली होती. यामुळे नाराज होत अमेरिकेने ली शांगफू यांच्यावर निर्बंध घातले होते. त्यामुळेच या वर्षाच्या सुरुवातीला सिंगापूरमध्ये शिखर परिषदेत त्यांनी अमेरिकेच्या लॉयड ऑस्टिन यांना भेटायला नकार दिला होता.
