
रशियाने भारताला SU-57 फायटर जेट विकण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे पाचव्या पिढीचं अत्याधुनिक फायटर विमान आहे. पाचव्या पिढीची फायटर विमानं स्टेल्थ तंत्रज्ञान युक्त आहेत. स्टेल्थ टेक्नोलॉजीच वैशिष्ट्य म्हणजे हे विमान रडारला दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला शत्रूच्या प्रदेशात खोलवर घुसून हल्ला करता येतो. आजच्या तारखेला मोजून चार देशांकडे ही टेक्नोलॉजी आहे. यात अमेरिका, रशिया, चीन आणि जपान या देशांकडे पाचव्या पिढीची फायटर जेट्स आहेत. अमेरिकेकडे F-22 रॅप्टर आणि F-35 ही पाचव्या पिढीची फायटर विमानं आहेत. लॉकहीड मार्टिन कंपनीने या फायटर जेट्सची निर्मिती केली आहे. अमेरिका आणि रशिया हे संरक्षण साहित्य विकणारे जगातील दोन मोठे देश आहेत. ज्या देशाकडे अमेरिकेची फायटर जेट्स असतात त्या देशाच्या शत्रुकडे रशियन बनावटीची विमानं असतात.
उदहारणार्थ भारत-पाकिस्तान. पाकिस्तानकडे अमेरिकेची F-16 फायटर जेट्स आहेत, तर भारताकडे रशियन बनावटीची मिग-21, मिग-29 आणि सुखोई-30 एमकेआय ही जेट्स आहेत. कुठलही फायटर विमान बनवणं ही सोपी गोष्ट नाहीय. फायटर विमानाचं तंत्रज्ञान खूप जटिल असतं. भारताकडे सध्या 4.5 जनरेशनची फायटर विमानं आहेत. जगातील अनेक देशांकडे आज चौथ्या किंवा 4.5 पिढीचीच फायटर विमानं आहेत. ही विमानं Advance असली, तरी ती रडारला ट्रेस होतात. याउलट स्टेल्थ तंत्रज्ञान असलेल्या विमानाचे सिग्नेचर रडारला सापडत नाहीत. म्हणून जगभरात ही फायटर जेट्स अनेक देशांना हवी आहेत.
इतकी जटिल टेक्नोलॉजी आहे
पण या फायटर जेट्सचा खर्च परवडणारा नाहीय. या विमानाच्या काही तास उड्डाणाचा खर्च लाखोंमध्ये येतो. त्याशिवाय या विमानांचं इंजिनिअरिंग सुद्धा कठीण असतं. आपल्याकडे काही महिन्यांपूर्वी ब्रिटनचं F-35 फायटर विमान बंद पडलं होतं. तिथून इंजिनिअर्स आले, तरी हे विमान दुरुस्त करता आलं नाही. इतकी जटिल टेक्नोलॉजी आहे.
भारत का रस दाखवत नाहीय?
रशिया भारताला SU-57 फायटर जेट देऊ करतोय. पण भारत हे विमान विकत घेण्यात फार इंटरेस्ट दाखवत नाहीय, यामागच कारण आहे म्हणजे रशिया जे सांगतोय त्यावर पूर्ण विश्वास ठेवता येत नाहीय. रशियाला हे विमान विकायचं आहे, त्यासाठी ते भारताला सहउत्पादन, लायसन्स प्रोडक्शन अशा ऑफर देत आहेत. पण या विमानाबाबत त्यांचे जे दावे आहेत, त्या बद्दल अजून भारतीय एक्सपर्टना खात्री पटलेली नाही. त्याशिवाय भारताने स्वबळावर पाचव्या पिढीची लढाऊ विमाने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या रशियाकडून SU-57 विकत घेतली, तर भारताच्या स्वत:च्या कार्यक्रमाला खीळ बसू शकते. त्यामुळे भारत ही विमाने विकत घेण्यात फार रस दाखवत नाहीय.