पाकिस्तानशी यारी पडू शकते बांगलादेशला भारी?,बांगलादेश स्वत:च्या पायांवर कुऱ्हाड तर मारत नाहीए ना ? काय आहे दगाबाजीचा भूतकाळ
बांगलादेशाने अलिकडेच आर्थिक प्रगती केली आहे. जग त्याला दक्षिण आशियातील एक नवीन आर्थिक ताकद म्हणून पाहात आहे. अशात पाकिस्तानशी त्यांची मैत्री या सर्वांवर पाणी फेरू शकते असे म्हटले जात आहे.

बांगलादेश आणि पाकिस्तान या आपल्या देशाच्या शेजाऱ्यांमध्ये मैत्रीच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. बांगलादेशातील शेख हसीना यांना सरकार उलथवून लावल्याने आणि मोहम्मद युनुस यांचे सरकार आल्याने त्यांनी पाकिस्तानशी जवळीक वाढविली आहे. दोन्ही देशांचा ‘अमन -२०२५’ या नौदलाच्या कवायती सुरु होणार असल्याने भारतासाठी चिंतेची घटना आहे. मात्र, बांगलादेशला देखील पाकशी मैत्री करणे महागात पडू शकते असे म्हटले जात आहे. पाकिस्तानशी आघाडी करण्याचा इतिहास अस्थिरतेने भरलेला आहे. त्यामुळे हा बांगलादेशसाठी देखील धोक्याचा इशारा आहे.
ढाका आणि इस्लामाबाद यांच्या वाढत्या जवळकीने दक्षिण आशियात नवा अध्याय सुरु झाला आहे. परंतू अस्थिर राजकीय परिस्थिती आणि संधीसाधुपणाची मैत्रीचा पाकिस्तानचा दगाबाजीचा इतिहास पाहता बांगलादेशला हे भारी पडू शकते असे वृत्त संडे गार्डियन या वृत्तपत्राने दिले आहे.अफगानिस्तानपासून ते चीन आणि अमेरिकापर्यंतचे इस्लामाबादचे परराष्ट्रसंबंध नेहमीच गैरनियोजन आणि अति महत्वांकाक्षी राजकीय धोरण, अनपेक्षित परिणामांमुळे नेहमीच वादग्रस्त राहीले आहेत.
पाकिस्तानशी मैत्री देखील धोकादायक
पाकिस्तानने अनेक दशकांपासून अफगाणिस्तानात नाक खुपसले आहे. पाकिस्तानने १९९०च्या दशकात आणि २०२१ मध्ये अमेरिकेच्या सैन्य वापसीनंतर तालिबानचे समर्थन केले होते.या पावलांमुळे काबूलमध्ये पाकिस्तानचा प्रभाव वाढविला होता. परंतू पाकिस्तानच्या सीमाभागात मात्र याचा उलटा परिणाम पाहायला मिळाला आहे.पाकिस्तानच्या अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमाभागात अतिरेकी हल्ल्याचा सामना करीत आहे. या अतिरेकी हल्ल्यांमुळे इस्लामाबादच्या सर्वात जवळचा मित्र बिजींगने देखील चीन – पाकिस्तान आर्थिक कॉरीडॉरवर ( CPEC ) पडणाऱ्या प्रभावावर चिंता व्यक्त केली आहे.
इस्लामाबादशी जवळीक साधताना सावध…
बांगलादेशासाठी पाकिस्तानशी जवळीक धोकादायक ठरणार आहे. संरक्षणात्मक आव्हानांमुळे चीन आणि पाकिस्तानचे संबंधात देखील तणाव निर्माण झाला आहे. बांगलादेशाने चीनसोबत सावधनतापूर्वक लाभाचे संबंध ठेवले आहेत. अशात त्याला इस्लामाबादशी जवळीक साधताना आता सावध राहीले पाहीजे. अशात जर पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढसळली तर ढाकाच्या समोर देखील आर्थिक आणि संरक्षणात्मक जोखीम उभी राहू शकते असे या बातमीत म्हटले आहे.
बांग्लादेशात कट्टरपंथी सक्रीय होणार !
पाकिस्तानशी जर बांग्लादेशाची जवळीक वाढली तर तो ढाका येथील कट्टरतावाद्यांचे नेटवर्क पुन्हा सक्रीय करु शकतो. ज्याला पाकिस्तानने अनेक काळापासून अल्पकालीन लाभासाठी पोसले आहे. यामुळे त्यांची स्वत:ची सुरक्षा धोक्यात आली आहे. अफगानिस्तान, चीन आणि अमेरिकेसोबतचे पाकिस्तानचे संबंध संधीसाधू आणि अस्थिरतेच्या एका पॅटर्नला प्रकट करतात. अलीकडे बांगलादेशाने चांगली आर्थिक प्रगती केली आहे. बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेची झेप वाढण्याची शक्यता जागतिक आर्थिक संस्थांनी व्यक्त केली असताना या सर्वांना पाकिस्तानी मैत्रीमुळे पाणी फेरले जाऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.