‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ चीनच्या ताब्यात जाणार का?

| Updated on: Dec 17, 2020 | 8:42 AM

पाकिस्तानच्या ग्वादर बंदराच्या परिसरात चीनकडून आपल्या सैनिकांना राहण्यासाठी बराकी उभारल्या जात आहेत. | China Occupied Pakistan

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ चीनच्या ताब्यात जाणार का?
Follow us on

नवी दिल्ली: विकासाच्या नावाखाली मित्रदेशांचे भूभाग बळकावणाऱ्या चीनने (China) आता पाकिस्तान गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानमधील ग्वादर बंदरांचा ताबा यापूर्वीच चीनकडे देण्यात आला आहे. मात्र, याठिकाणी सध्या चीनकडून सुरु असलेला मनमानी कारभार पाहता लवकरच संपूर्ण पाकिस्तान चीनच्या ताब्यात जाईल, अशी चिन्हं दिसत आहेत. (China High Security Compound at Gwadar)

चीनकडून ग्वादर शहराच्या परिसरात हाईटेक कुंपण (Fencing) उभारण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे चीनच्या ताब्यात आहे. तसे या परिसरात चीनकडून 500 हायडेफिनेशन कॅमेरे लावण्याचेही काम सुरु आहे. जेणेकरून ग्वादर शहरातील लोकांच्या हालचालींवर 24 तास नजर ठेवता येणे शक्य होईल.

ग्वादर बंदराच्या परिसरात चिनी सैनिकांच्या निवासाची व्यवस्था

पाकिस्तानच्या ग्वादर बंदराच्या परिसरात चीनकडून आपल्या सैनिकांना राहण्यासाठी बराकी उभारल्या जात आहेत. याशिवाय, बंदरापासून काही अंतरावर इमारत आणि विमानतळाचे कामही हाती घेण्यात आले आहे. मात्र, या बांधकामाला बलूचिस्तानमधील नागरिकांकडून विरोध केला जात आहे. या नागरिकांना न्यायालयात धाव घेतली आहे.

चीनने ग्वादर बंदराच्या विकासासाठी 80 कोटी डॉलर्सचा निधी देऊ केला होता. आम्ही केवळ व्यावसायिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून हा निर्णय घेतल्याचे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण चीन सामरिक रणनीतीचा भाग म्हणून ग्वादर बंदरात आपले सामर्थ्य वाढवत असल्याची चर्चा आहे.

ही भारतासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. कारण, युद्धाच्या काळात चीनकडून या बंदराचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे भारतीय नौदलासमोरील अडचणी वाढू शकतात.

चीनच्या पाकिस्तानमधील वाढत्या वर्चस्वामुळे भारताच्या डोकेदुखीत भर

भारत आणि चीन यांच्यातील सध्या ताणले गेलेले संबंध पाहता ग्वादरमधील चीनचा वाढता प्रभाव आपल्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने यापूर्वीच भारताकडून हक्क सांगण्यात येत असलेला अक्साई चीनचा परिसर चीनच्या ताब्यात दिला आहे. मात्र, अक्साई चीन हा भारताचा अविभाज्य भाग आहे. चीनच्या पाकिस्तानमधील वाढत्या अतिक्रमणामुळे भविष्यात भारतासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

लडाखमध्ये भारतीय सैन्याला रसद पोहोचवण्यासाठी ऑपरेशन स्नो लेपर्ड

लडाखमध्ये हिवाळा सुरु झाल्यानंतरही भारतीय सैन्य चीनसमोर पाय रोवून उभे राहिले आहे. मात्र, तुफान बर्फवृष्टीमुळे येथील रस्ते बंद होण्यास सुरुवात झाली आहे. हे रस्ते बंद झाल्यास भारतीय सैन्यापर्यंत पोहोचणारी रसद बंद होऊ शकते.

त्यामुळे सद्या 422 किलोमीटरच्या श्रीनगर-लेह मार्गावर ऑपरेशन स्नो लेपर्ड सुरु करण्यात आले आहे. जोजिला पासच्या परिसरात सध्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशकडून उणे 10 अंश तापमानात रस्त्यावरील बर्फ हटवण्याचे काम सुरु आहे. याठिकाणी सियाचीनमधील पथक बर्फ हटवण्यासाठी हेवीवेट मशीन घेऊन पोहचले आहे. त्यामुळे हा रस्ता लवकर सुरु होईल, अशी आशा आहे.

संबंधित बातम्या :

Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?

India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?

(China High Security Compound at Gwadar)