मैत्री दिनीच जगाला आनंदवार्ता! अमेरिका-इराण युद्ध संपणार? होर्मुज खाडीविषयी करारात सर्वात मोठा फैसला

US-Iran Strait Of Hormuz: मैत्री दिनीच जगासाठी एक आनंदवार्ता येऊन धडकली आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत. त्यादृष्टाने इराण लवकरच पाऊल टाकण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी तेहराणकडे होर्मुज समुद्रधुनी लागलीच उघडण्याची मागणी केली आहे. इराणवर हल्ला करण्याची योजनाही ट्रम्प यांनी रद्द केली आहे. काय आहे मोठी अपडेट?

मैत्री दिनीच जगाला आनंदवार्ता! अमेरिका-इराण युद्ध संपणार? होर्मुज खाडीविषयी करारात सर्वात मोठा फैसला
अमेरिका-इराण
| Updated on: Aug 02, 2026 | 10:48 AM

अमेरेकिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज स्ट्रेट उघडला नाही तर इराणवर मोठ्या हल्ल्याची धमकी दिली होती. दोन्ही देशातील युद्ध चिघळण्याची भीती व्यक्त होत होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर त्यांनी एक पोस्ट केली होती. इराणविरोधात लढण्यासाठी अमेरिका तयार असल्याची धमकी त्यांनी दिली. आमचे लष्करी सामर्थ्य आणि क्षमता अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी दोन्ही देशातील कराराची आठवण करून देत होर्मुझ समुद्रधुनी सुरू करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी सौदी अरबचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी व्हाईट हाऊसला इराणवर हल्ला न करण्याची विनंती केली होती. त्यानंतर ट्रम्प यांची इराणवरील हल्ल्याची योजना बारगळली. मैत्री दिनालाच जगाला आनंदवार्ता मिळाली. युद्ध संपल्यास जगातील महागाई कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

युद्धाचा धोका टळला?

सौदी अरबने अमेरिकेची या युद्धात साथ दिली. पण सौदी अरबचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी सल्ला दिला की युद्ध आता वाढवू नका. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील मोठ्या हल्ल्याची तयारी रद्द केली. इराणचे संकट अजून वाढवण्याची गरज नसल्याचे सलमान यांनी आवाहन केले होते. सौदी अरबच्या आवाहनानंतरच ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केली. मित्राच्या सांगण्यावरून, भविष्यातील फायदे, समृद्ध इराणसाठी हल्ल्याची तयारी रद्द केल्याचे ट्रम्प म्हणाले. आता इराणही होर्मुझ संकटावर सकारात्मक पाऊल टाकले अशी आशा त्यांनी व्यक्त केली. इस्त्रायल सुद्धा आमच्या भूमिकेचा मान राखेल. सर्वांनी आता मिळून काम करणे गरजेचे असल्याचे ट्रम्प म्हणाले.


डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणही भडकला

डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन हल्ल्याची धमकी देताच इराण भडकला. जर हल्ला केला तर मग जशाच तसे उत्तर दिले जाईल. इस्त्रायलवर हल्ला करण्यात येईल. पश्चिम आशियातील अमेरिकासह त्यांना सहकार्य करणाऱ्या अनेक देशांतील ऊर्जा प्रकल्पांवर ताबडतोब हल्ले करण्यात येतील. त्यात ऑईल रिफायनरीजही असतील असे इराणने बजावले. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या आवाहनावर तेहराणची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

अमेरिकेच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची धमकी

तेहराणची सरकारी वृत्त संस्था तस्नीम न्यूजच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेने दिलेली धमकी हा वेडगळपणा आहे. वॉशिंग्टनने हल्ला केल्यास तेहराण प्रत्युत्तर देईल. अमेरिकेच्या ऊर्जा ठिकाणांना लक्ष्य करण्यात येईल. इस्त्रायलमधील महत्त्वाचे ठिकाणं आमच्या दृष्टीटप्प्यात असल्याचा दावा इराणने केला आहे. तर ट्रम्प यांची गुंतवणूक ज्या ज्या ठिकाणी आहे ती लक्ष्य करण्यात येईल असे तेहराणने स्पष्ट केले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us