जगातील 5 सर्वात खरतनाक महिला गुप्तहेर, ‘या’ महिलेमुळे झाला होता 50 हजार सैनिकांचा मृत्यू

आतापर्यंत जगात एकाहून एक सरस गुप्तहेर झाले आहेत. मात्र यातील बहुतांशी हेर हे पुरुष होते. मात्र अशा काही महिला आहेत ज्या हेरगिरी साठी प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यांची माहिती जाणून घेऊयात.

जगातील 5 सर्वात खरतनाक महिला गुप्तहेर, या महिलेमुळे झाला होता 50 हजार सैनिकांचा मृत्यू
Mata Hari
| Updated on: Aug 24, 2025 | 10:08 PM

आतापर्यंत जगात एकाहून एक सरस गुप्तहेर झाले आहेत. मात्र यातील बहुतांशी हेर हे पुरुष होते. मात्र अशा काही महिला आहेत ज्या हेरगिरी साठी प्रसिद्ध आहेत. आज आपण अशा काही महिलांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांच्यामुळे जगात मोठे बदल झाले आहे. एका महिलेमुळे तर तब्बल 50 हजार सैनिकांना जीव गमवावा लागला होता. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

माता हरी

माता हरी ही इतिहासातील सर्वात प्रसिद्ध महिला हेर आहे. माता हरीचे खरे नाव गर्ट्रूड मार्गारेट झेले होती. ती एक नृत्यांगना होती. तिला हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती. 1931 मध्ये माता हरीच्या जीवनावर चित्रपट बनवण्यात आला होता ज्यात तिच्याबद्दल माहिती देण्यात आली होती.

गर्ट्रूड मार्गारेटचा जन्म हॉलंडमध्ये झाला होता, तिने एका सैन्य कॅप्टनशी लग्न केले होते. 1905 पासून तिला माता हरी नावाने ओळखले जाऊ लागले. ती डान्सर असल्यामुळे ती वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असायची. पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मनीने तिला हेरगिरीची ऑफर दिली होती, त्यामुळे ती हेर बनली. माता हरीने कोणाचीही हत्या केली नाही, मात्र तिच्या हेरगिरीमुळे सुमारे 50 हजार फ्रेंच सैनिकांची हत्या झाली होती. त्यामुळे फ्रान्सने तिच्यावर संशय घेतला आणि तिला अटक केली. हिटलरसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

शार्लोट कॉर्डी

शार्लोटचे पूर्ण नाव मेरी अँनी शार्लोट डी कॉर्डी असे होते. ती फ्रेंच राज्यक्रांतीचा भाग होती. शार्लोट गिरोंडिन होती. गिरोंडिन असे लोक होते, जे राजेशाही संपवू इच्छित होते मात्र त्यांना हिंसाचार नको होता. यामुळे तिने विरोधी जेकोबिन गटाच्या नेत्या जीन पॉल मारतची हत्या केली होती. शार्लोटने बाथटबमध्ये आंघोळ करत असताना मारतवर चाकूने हल्ला केला होता. तिला अटक केल्यानंतर तिने देशाच्या हितासाठी हा खून केल्याचे म्हटले होते, त्यानंतर तिला शिक्षा झाली.

शी जियानकियाओ

शी जियानकियाओचे खरे नाव शी गुलान असे होते, वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती गुप्तहेर बनली होती. जियानकियाओने बौद्ध मंदिरात प्रार्थना करत असताना चुआंगफांगच्या डोक्यात गोळी घातली होती. हत्या केल्यानंतर ती घटनास्थळावरून पळून न जाता गुन्हा कबूल केला. कालांतराने तिला न्यायालयाने निर्दोष घोषित केले होते.

ब्रिगिट मोएनहॉप्ट

ब्रिगिट मोएनहॉप्ट ही जर्मनीतील खरतनाक हेर होती. ती रेड आर्मी गटाची सदस्य होती. 1977 मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये तिचा सहभाग होता. तिने अनेक अपहरण, खून आणि बॉम्बस्फोट घडवून आणले होते. 1982 मध्ये तिला अटक झाली होती. मोएनहॉप्टने कधीही तिचा गुन्हा कबूल केला नाही, 2007 मध्ये तिला जामीनावर सुटली होती.

एजंट पेनेलोप

एजंट पेनेलोपने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी काम केले. तिच्यामुळे पॅलेस्टिनी गटाचा नेता अली हुसेन सलामे याची हत्या करण्यात इस्रायलला यश मिळाले होते. 1972 मध्ये म्युनिक ऑलिंपिक दरम्यान अली हुसेनने ११ इस्रायली खेळाडूंना ओलीस ठेवले आणि त्यांची हत्या केली होती, त्यामुळे इस्रायलने अली हुसेनचा खात्मा केला होता. अली हुसेनला मारण्यासाठी पेनेलोप ही तो राहत असलेल्या अपार्टमेंटजवळ नाव बदलून सुमारे सहा आठवडे राहत होती. अली हुसेन सलामे ज्या बॉम्बस्फोटात मारला गेला त्यात पेनेलोपचाही मृत्यू झाला होता.