जगाला हादरवणारा दिवस… हूतींवर 100 फाइटर जेट्सचा मारा, एअरपोर्टवर ताबा; हाहा:कार उडाला
यमनमधील संघर्ष तीव्र झाला असून, सौदी-समर्थित यमनी सैन्याने हूती बंडखोरांविरोधात ‘डॉन ऑफ यमन’ मोहीम सुरू केली आहे. 100 फायटर जेट्सच्या मदतीने धुबाब एअरपोर्ट आणि जिल्ह्यावर ताबा मिळवला. महत्त्वाच्या बाब अल-मंदेब सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

यमनचे हूतींविरोधात सुरू असलेलं युद्ध हे मोठ्या संघर्षमय वळणावर येऊन ठेपलं आहे. आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या यमनी सरकारच्या सैन्याने इराण समर्थित हुतींविरोधात मोठी सैन्य कारवाई सुरू केली आहे. यमनी सरकारच्या सैन्याने धुबाब एअरपोर्टवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. तसेच धुबाब जिल्ह्याचा मोठा भागही कब्जात घेतल्याचा दावाही केला आहे. या ऑपरेशनमध्ये यमन-सौदीचे कमोबेश 100 विमाने सामील झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हूतींवर 100 फायटर जेट्सचा मारा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे अख्खं जग हादरून गेलं आहे.
यमनी सैन्याने या मोहिमेला ‘डॉन ऑफ यमन’ नाव दिलं आहे. आणि त्यांचं अल मंदेब स्ट्रेटवर नियंत्रण मिळवण्याचं सर्वात मोठं लक्ष्य असल्याचंही सांगितलं जात आहे. यासाठी जमीन आणि हवेतूनही मारा करण्यात येत आहे. दोन्हीकडून अत्यंत वेगाने कारवाई केली जात आहे, असं सैन्याने स्पष्ट केलंय. सौदीच्या नेतृत्त्वातील यमनी सैन्याकडून जमिनीवरून कव्हर केलं जात आहे. बाब अल मंदेबसाठी हवाई सुरक्षाही पुरवली जात आहेत.
100 फायटर जेट, टार्गेटवर हल्ला
सौदीच्या नेतृत्वातील आघाडीच्या म्हणण्यानुसार, या ऑपरेशनमध्ये सुमारे 100 फायटर जेट सामील आहेत. यमनमध्ये 324 हाय व्हॅल्यू टार्गेटला निशाणा बनवलं आहे. तर, यमनी सैन्याच्या मते, हुतींच्या अड्ड्यांवर 1000 हून अधिक स्ट्राईक करण्यात आले आहेत. तोफा आणि रॉकेट लॉन्चरची ठिकाणं, डिफेन्स पोझिशन, सप्लाय रूट आणि लॉजिस्टिकलाही टार्गेट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याशिवाय हुती बंडखोर आणि अतिरिक्त सैन्याच्या येण्या जाण्याच्या मार्गावरही हल्ला करण्यात आला आहे.
बाब अल-मंदेब ताब्यात घेण्याची तयारी
यमनी सैन्याचं ऑपरेशन केवळ धुबाब एअरपोर्टपर्यंत मर्यादित राहिलेलं नाहीये. सैन्याने बाब अल मंदेबवर ताबा मिळवण्यासाठी घेराबंदी करण्यास सुरुवात केली आहे. हा स्ट्रेट जगातील महत्त्वाच्या सागरी मार्गात सामिल आहे. त्यामुळे याच्या आसपास चालणाऱ्या लढाईचा परिणाम खूप दूरपर्यंत पडण्याची शक्यता आहे.
सरकारी दलाने दिलेल्या माहितीनुसार, हुतींसोबत झालेल्या संघर्षानंतर धुबाब जिल्ह्याचा मोठा भाग आमच्या नियंत्रणात आला आहे. तब्बल महिनाभरापूर्वी लाल सागराच्या बेटावर आणि बाब अल मंदेबच्या आसपासच्या मोठ्या परिसरात आपली पकड मजबूत केली होती. सप्टेंबरमध्ये सैन्य कारवाई केल्यानंतर यमनमध्ये युद्ध अधिकच भडकले होते.
हूतींचाही हल्ला सुरूच
यमनी सरकारने नवीन ऑपरेशन सुरू केलं असलं तरी हूती बंडखोरही काही मागे राहिलेले नाहीत. रॉयटर्सच्या मते, हूतींनी ताइज शहराला अनेक बाजूंनी घेरलं असून अदनला जोडणारा मुख्य सप्लाय रोड बंद केला आहे. ताइज सध्या सरकारी नियंत्रणात आहे. पण हुतींचा दबाव सातत्याने वाढत आहे.
हूती हल्ल्यांचा परिणाम सौदी अरबपर्यंत पोहोचला आहे. हूती सैन्याचे प्रवक्ता याह्या सरी यांच्या दाव्यानुसार 4 ऑक्टोबर रोजी संघटनेने रियाद आणि खुरैस परिसरात सौदी अरामकोच्या स्थळांवर बॅलेस्टिक मिसाइल आणि ड्रोनने हल्ले केले. या हल्ल्यानंतर दोन्ही ठिकाणी मोठी आग भडकली होती.